Find the Latest Status about पावसात भिजायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसात भिजायला.
yogesh atmaram ambawale
खूप घाबरायचो मी पावसाला नि पावसात भिजायला, मित्रांची ही कधी हिम्मत झाली नाही मला पावसात खेचायला. वाटायचे तेव्हा असे कुणीच नसेल जे मला भिजवू शकेल. पण अचानक एक दिवस तुला पाहिले नि तुझ्या प्रेमरूपी पावसात कसा भिजलो माझे मलाच नाही कळाले. शुभ संध्या मित्रहो सकाळच्या कोलँब ला मजा आली ना? तुमचा भरभरुन प्रतिसाद बघुन खरचं आनंद झाला मला,तुम्ही जेव्हा असला प्रतिसाद देता ना तेव्हा मल
Vilas Bhoir
पावसात भिजताना मज गारवा छळतो सोबत नसताना तु मी एकट्यात असतो बरसल्या धारा जरी आज अंगणात माझ्या आठवात प्रिया तुझ्या मी अजुनही रमतो किती आले अन् गेले असे बरसून पावसाळे तरीही त्याच दिवसांना मी कित्येकदा स्मरतो वेधांळलेल्या मनाला तुझाच एक सहारा म्हणून सारखा प्रिये मी तुझ्यातच रुजतो बरसला कुठेही जरी हा रिमझिम पावसाळा जिथे भेटलो तिथेच मी पावसात भिजतो ©Vilas Bhoir पावसात भिजतना
Abhay Mohod
तू नसताना राहीले नाही भान ऋतु बदलण्याचे, यावर्षी ही राहून गेले पावसात भिजण्याचे चेहर्यावरती येऊन पडावे सडे थंडगार पाण्याचे, त्यावेळी ही स्मरण व्हावे तुझ्या बेधुंद हास्ण्याचे का वाटावे भय मनाला मुसळधार पाण्याचे, का वाटावे अप्रुप जीवाला मुकाट रिमझिमण्याचे अजुनही आहे वाट्यास माझ्या झोपेत जागण्याचे, कधी संपेल कार्य तुझे हे मला दुखावण्याचे लागे वेध पुन्हा मनाला नव्याने जगण्याचे, पण तरीही ना होई धाडस तुला विसरण्याचे पावसात भिजण्याचे....
प्रकाश साळवी
कोसळणाऱ्या पावसात आपण चिंब भिजावं आणि आपल्या मनाला पण चिंब चिंब भिजवावं ** ओल्या ओलेत्या वसनात मनसोक्त वावरवं तीच उर्मी घेऊन एक गच्चं "आलिंगन" द्यावं ** कोसळणाऱ्या पावसात येऊ देत उधाण आपल्या प्रीतीला तोच तोच गारवा घेऊन विसरू या रीतीला ** प्रकाश साळवी ०१/०६/२०२० सकाळी ०९:०१ # कोसळणाऱ्या # पावसात
Akash Kothadia
तू भिजलीस पावसात अनं माझ्याकडे छत्री नाही, असून ही उपयोग झाला असता ह्याची काही खात्री नाही आठवतं का ?? मागच्या वर्षी असाच आला होता पाऊस, मी म्हंटलं, थांब, मी छत्री आणतो, तू कुठे ही नको जाऊस, मी छत्री घेऊन येई पर्यंत केला होतास तू रस्ता पार, छत्री मध्ये बंड्याच्या उभारली होतीस खेटून फार, मला बघताच बंड्याने टॅक्सी ला हाथ केला, टॅक्सी मध्ये घालून तुला बंड्या तिथून निघून गेला, तू आज भिजलीस पावसात, अनं मागच्या वर्षी ची आठवण झाली, भरत आलेल्या जखमेवरची खपली जोरात उडून गेली, मग चुरचूरणाऱ्या जखमेवरती फुंकर घालतो आहे पाऊस मी पुन्हा एकदा सांगतो, थांब मी छत्री आणतो, तू कुठे ही नको जाऊस !! तू भिजलीस पावसात अनं .....!!
vaishali
🌹रिमझिम पावसात🌹 रिमझिम पावसात असे हात तुझा हाती पावसाच्या येण्याने ही सुगंधित झाली माती गोरे गोरे रूप तुझे पावसात ग भिजले पावसाच्या थेंबानी हे तुझे यौवन सजले पसरला हा गारवा मिठी तुझी उबदार लाज लाजुनी झालीस सखे तू ग चुर चुर लाजू नकोस ग प्रिये अशी जवळ ये माझ्या मकरंद टिपू दे ग सखे ओठातला तुझ्या नको करुस बहाणे होऊ एकरूप आज तुही घाल आज सखी माझ्या मिठीचा ग साज रिमझिम पावसात (अष्टाक्षरी कविता)