Nojoto: Largest Storytelling Platform

New जाणाऱ्या लढाउ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाणाऱ्या लढाउ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाणाऱ्या लढाउ.

    PopularLatestVideo
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

आवेशाच्या ललकारीने काताळाला कंप सुटावा
युगा–युगांच्या हुंदक्यातला विटाळ आता तरी फिटावा...

साथ–सोबत नको कुणाची नकोच उसने बळ आता
पिचलेल्या मनगटांत फिरुनी बंड पेरूया जाता जाता...

क्षणा–क्षणाला उसळत राही तप्त लाव्हां छातीमधला
पुन्हा चेतवू जुने निखारे रात्र काजळी तुम्हीच बदला...

शिंग तुतारी नौबत झडली नाद टापे गगनी भरली
लख्ख तळपत्या समशेरींना चेव, विरश्री अंगी स्फुरली...

तृणापरी पायात चिरडू यश किर्तीची शिखरे घडवू
मळभ सारुनी लाचारीचे स्वाभिमाने कोंदण जडवू...

©Shankar Kamble #Grayscale #लढा #युद्ध #अस्तित्व #लढाई #माणूस #संघर्ष #तलवार #टक्कर
4fd960950adb3e0620eddaf29bbca046

Sachin dute_official

"मी निपुत्रिक बरी होते.

होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा.
सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा.
केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे.
जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...!
 
चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला.
बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला.
आईने दंडवत देवी,जगदंबा घातला.
नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!!

फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा.
उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा.
आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया.
जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!!

येता यौवन बाळा तू, घात कसा केला.
आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला.
आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली.
क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!!

बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले.
तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले.
जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन.
गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!!

असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते.
जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते.
सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला,
कमी पडलं असेल काही,माफ कर तू  आम्हाला..!!!
                           
                                               सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

15 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

 लढाई आपली

लढाई आपली #nojotophoto

0 Love

6b8d8496fd90d3edc848efa09e41e37c

डि के कुंडकर

 जळणार्या लोकांसाठी

जळणार्या लोकांसाठी

3 Love

87e7d7a730fb843be9764d963d77f5e6

Bhagwant Mali

#लढा

14,596 Views

2e51047d4c699ecea337664bb95b443f

Ajay Dilip Ghanekar

एखाद्याचे विचार सर्वांनाच पटतील असं नाही, काहींना ते सहज अवगत होतात कळतात तर काहींना भरडून भरडून सांगावे लागतात.
पचतात मात्र मोजक्यांनाच...!

कवी मनाचा मी 🌿

©अजय घाणेकर ✒️ विचारांची लढाई 🌿

विचारांची लढाई 🌿 #मराठीविचार

11 Love

3b83a4cebcb161591e91617bea90ca1c

Mahale Nikhil

जीवनात दुःख कितीही असू द्या चेहऱ्या वर नेहमी हसू पाहिजे 
जीवनात संकटकितीही येऊ द्या
त्यांच्याशी लढा द्यायची तयारी पाहिजे #लढा
762a985e7150592bec17efb5a71560c3

Vinay Sonawane

तुला पाहण्यासाठी 
सजत असतांना ,
आरसाच बोलला
" आधी स्वतःला 
नीट पहा
इथे असतांना "

©Vinay Sonawane तिला पाहणाऱ्या प्रत्येकासाठी

तिला पाहणाऱ्या प्रत्येकासाठी #मराठीशायरी

11 Love

762a985e7150592bec17efb5a71560c3

Vinay Sonawane

असं काय बी'घडावं
अन
त्यातून बी'घडावं !

©Vinay Sonawane घडणाऱ्या प्रत्येकासाठी... चारोळी

घडणाऱ्या प्रत्येकासाठी... चारोळी #मराठीकविता

10 Love

22860903f98fd248036d56dde01917c0

Pralhad Gondhali

लढा समाज्यासाठी

लढा समाज्यासाठी

36 Views

75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

#AzaadKalakaar लढा स्वातंत्र्याचा...

एक काळ असा होता - गुलामीचा, अन्यायाचा नी अस्वातंत्र्याचा, 
कोणाला नव्हता कसला आणि कुठलाच हात मदतीचा.
झाला बहिष्कार आणि रक्तपात माणसातील माणसाचा, 
भेदभाव होत होता जाणिवेचा आणि माणुसकीचा. 

पेटून उठला होता माणसातील देव आणि सूड मना - मनाचा, 
फुटू लागल्या अन्यायाला वाचा नि तडकल्या गुलामीच्या काचा. 
अन्यायाविरुद्ध झाले शब्दप्रहार आणि काठी तलवारीचे वार,
बंधनातून मुक्त होत मिळत होता माणसाला खऱ्या माणसाचा आधार. 

लढा होता माणसाचा माणसाविरुद्ध असणार्‍या न्यायासाठी, 
अन झालेल्या गुलामीतून बाहेर पडून स्वतः च्या हक्कासाठी. 
लाखो - निष्पाप जीव लढले होते केवळ माणुसकीसाठी, 
अखेर तो सोनेरी दिवस उगवलाच मानवतेच्या स्वातंत्र्यासाठी. 

आता मात्र कुठे आहे स्वातंत्र्याची खरी ती जाणीव.? 
मज भासते कायम माणसातल्या माणुसकीची खरी ती उणीव. 
पूर्वी लढले, शहीद झाले शूरवीर अस्वातंत्र्यातील स्वातंत्र्यासाठी, 
आता मात्र लोक लढतात स्वतःच्या स्वार्थासाठी. 

वाटते कधी होऊन धाडसी झिडकारूनी द्यावेत बंधने सर्व, 
उंच- उंच पुढे जात गाठावीत खऱ्या देश स्वातंत्र्याची खरी पर्व. 
नको फक्त नावालाच आता शब्द स्वातंत्र्याचा, 
लढा लढावा माणुसकीचा नि खऱ्या देशसेवेचा.

©Miss Mangal लढा... 
#AzaadKalakaar

लढा... #AzaadKalakaar

11 Love

cf895b4e3b98e723eb1cc43976dd616c

kudaratkaynat

 स्त्री सम्मानासह रयतेचं मोल जपणाऱ्या व राज्य बांधणीचा उगम स्त्रोत असणाऱ्या, *स्वराज्यमाता जिजाऊ* यांच्या ४२३साव्या जयंतीदिनी, प्रत्येक मावळ्

स्त्री सम्मानासह रयतेचं मोल जपणाऱ्या व राज्य बांधणीचा उगम स्त्रोत असणाऱ्या, *स्वराज्यमाता जिजाऊ* यांच्या ४२३साव्या जयंतीदिनी, प्रत्येक मावळ् #nojotophoto

7 Love

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

ती अशीच आयुष्यभर स्वप्नांच्या दुनियेत रमणारी.....
तरीही वास्तवाशी दोन हात करणारी.....

©SMITA DUMBRE #ती आणि तिची लढाई.....

#Smile

#ती आणि तिची लढाई..... #Smile #Thoughts

5 Love

5d6f556a24eb21c4143f84d961666346

Kailas Gavali

आज #संत_तुकाराम_महाराज असते तर कदाचित याच शब्दांनी आपल्याला जागे केले असते.......असाच माझा छोटासा प्रयत्न.....

जगी हाहाकार नको तो विकार। जाणावे ते सार  निश्चय धरा।।१।।
करुनि उपाय नको तो अपाय। वाया न जाय हित ते करा।।२।।
रोगाचा प्रकोप रहा निकोप। होईल ते लोप निश्चय धरा।।३।।
रोग होई नष्ट टळेल ते आरिष्ठ। आहे हे स्पष्ट बंधू माझ्या।।४।।
आता तरी जाग शहाण्यापरी वाग । आपला तो सहभाग राष्ट्रहिता।।५।।
प्रधानाची हाक मनात तो धाक। नम्रपणे वाक थोडातरी।।६।।
जाणारे रीत राष्ट्राचे ते हित। कैलास धरी प्रीत सकळांशी।।७।।

आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया जरूर कळवा.

- कैलास गवळी.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अभंगवाणी - कोरोना विरुद्ध लढाई
#gokorona

अभंगवाणी - कोरोना विरुद्ध लढाई #gokorona #Life_experience #संत_तुकाराम_महाराज

2 Love

d0a7d4858608cf676c29f257d5d3cad5

Neha Shejwal

खुद्के दिलसे लढना आसान है, जिसे दिल दिया है उस्से कैसे जीत पाओगे✍🍁 #दिल की लढाई✍🍁

#दिल की लढाई✍🍁

6 Love

905af9b478c20f4c9f48439db27b84c0

Kisan Atole sir

अन्यायाशी लढा 

#Strings

अन्यायाशी लढा #Strings

37 Views

22860903f98fd248036d56dde01917c0

Pralhad Gondhali

लढा सामाज्याच्या हक्कासाठी

लढा सामाज्याच्या हक्कासाठी

42 Views

f40afba97fc423165c8ddc4599ce00b0

Gopichand Santoshkumar Sarwade

लढा.. 
आम्ही शांती सुखाने जगतो, 
तुम्ही का आम्हावर जळता? 
तुम्ही मागुन वार करुन पळता रे 
मागुन वार करुन पळता..!

                      आम्ही पेशवाई संपवुन विजयी, 
                          तेव्हापासुन आताही तुम्ही हारता..
                       कोरेगावात मागुन वार करता रे 
              तुम्ही मागुन वार करता..!

आम्हा एकट्यावर तुमचा झुंड, 
ना व्रुत्तपत्रात अन्यायी वारता..
तुम्ही नामर्द स्त्रियांना मारता रे 
आम्हाला लपुन दगड मारता..! 
    
                          विराज -अरविंद प्रकरणा नंतर,
                       राजग्रूहाची विटंबना करता..
                          तुमची लपुन मारायची परंपरा 
                         तुम्ही समोर यायला डरता..!

तुम्ही नाव घेता भलत्याच 
  सोयी  भिमाच नाव उदगरता..
               भिमानं दिलेल्या तुकड्यावर जगता रे.. 
         तुम्ही स्वत:चं नाव सांगाय घाबरता.. 

                  या आमच्याकडे लढा शिकायला.. 
                   भिडण्याचा Course लावण्यात येईल..
              अजुनही वेळ आहे सुधरा नाहीतर.. 
             तुम्हाला HORSE लावण्यात येईल...!
  
                                     -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #RAJGRUH
#jaybhim #लढा
3f7b6a3825193baf8f7a6b055a64fde6

kkpp

आपण कोरोनाशी लढायचयं...
पण घरीच राहून👍
पुढील १५ ते २० दिवस देशासाठी महत्त्वाचे आहेत.शासनाला सहकार्य करूयात.
-कुलदिप पाटील, कोल्हापूर # कोरोनाशी मानवतेचा लढा

# कोरोनाशी मानवतेचा लढा

4 Love

f6a11a1d94f4c095e993cb60245ccb8c

Sachin Dhage

 शब्दात. न सांगता येणाऱ्या भावना..

शब्दात. न सांगता येणाऱ्या भावना.. #Shayari #nojotophoto

9 Love

78489a607ee7717150ddc965bb83559d

HYDRA_ZIG__ZAG_QUOTES

 कहाँ से लाउ 😢

कहाँ से लाउ 😢 #nojotophoto #विचार

4 Love

5410205e4816c0aee546336694f90e75

Pradeep Kumar

मंदिर में जाऊं या मस्जिद में जाऊं, 
तेरी मोहब्बत मिल जाए मुझे इसके लिए कहां सर झुकाऊ,
अल्लाह को मनाऊं या राम को मनाऊं
तेरी रूह मेरी रूह से मिल जाए इसके लिए किस की फरियाद लगाऊं ।। तेरी मोहब्बत के लिए कहां फरियाद लगाउ

तेरी मोहब्बत के लिए कहां फरियाद लगाउ #शायरी

8 Love

e79d0a46faff1e47ca0cec0c17dd29ec

Madhuri Chavan

पडला‌ तरी लढा जिंकण्यासाठी....

पडला‌ तरी लढा जिंकण्यासाठी.... #विचार

146 Views

62b8b23d9dacac4817581acbf6eb70ec

हृदयारविंद

 जा माणसा लढा दे...

जा माणसा लढा दे... #poem #nojotophoto

3 Love

d3cca52a965d693692485469f78fd801

Burhan kadiyani

उम्मीद है तुझे गले लगाउ         उम्मीद है तुझे गले लगाउ              बरसो की थकान को थोड़ा आराम दिलाऊ उम्मीद है तुझे गले लगाउ         उम्मीद है तुझे गले लगाउ              बरसो की थकान को थोड़ा आराम दिलाऊ

उम्मीद है तुझे गले लगाउ उम्मीद है तुझे गले लगाउ बरसो की थकान को थोड़ा आराम दिलाऊ

5 Love

e0b14da6620978028f3ed9736710f6d1

राजकारण

धर्माच्या नावावर प्रचार करणाऱ्या उमेदवारांनो जरा दमान

धर्माच्या नावावर प्रचार करणाऱ्या उमेदवारांनो जरा दमान #मराठीविचार

198 Views

eb5898ed59760a26f3accd6a05f0e406

Trishila Salve

*रडणाऱ्या माझ्या मनाला*

रडणाऱ्या माझ्या मनात,तुझ्या भावनेची साथ दे
अंधारमय माझ्या जीवनाला,तुझ्या संगतीचा आधार दे    
दे एक श्वास मलाही,तुझ्या श्वासात गुंफलेला
गंध मलाही मिसळू दे ,त्यात जरासा भांबावलेला    

होवू दे मला एक थेंब रक्ताचा,ह्रदयातून शरीरभर वाहणारा
फिरु दे तुझ्या भावनेतून ,कधी हळूच अश्रू बनून
तुझ्या सुंदर डोळ्यात राहणारा

दे ना एक अबोल अनुभूती, तुझ्या बोलक्या पवित्र स्पर्शातली
वचन दे एक आज मजला, निर्मिण्या कल्पनेतील नवस्त्रुष्टी
होवू दे मजला शब्द तुझ्या ओठीचे
भावना व्यक्त करणारे कधी हळूच कविता बनून
तुझ्या सुंदर लेखणीतून पाझरणारे
तुझ्या माझ्या प्रीतीचे गीत फुलवणारे 

त्रिशिला साळवे
९९२२३६३६२८/९११२८५९६६९ कविता जीवनाची...
रडणाऱ्या माझ्या मनाला
कवयित्री त्रिशिला साळवे#

कविता जीवनाची... रडणाऱ्या माझ्या मनाला कवयित्री त्रिशिला साळवे#

4 Love

ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

शोषितांचा, उपेक्षितांचा हुंकार दबल्या वेदनांचा
लेखणीने घडविली क्रांती सम्राट शोभे साहित्याचा

घाव घातला अन्यायांवर थाप देवूनी अशी डफावर
रान पेटले असे चेतले अंगार पेरले मनां-मनांवर

उभारिला लढा चळवळीचा हक्क मागण्या श्रमिकांचा
दुवा संयुक्त महाराष्ट्राचा मोडीला कणा प्रस्थापितांचा

साहित्यातील चमकता हिरा तुम्ही प्रसवला तो फकिरा
इतिहासाच्या पानोपानी अजरामर झाला वीर खरा

बा भीमाच्या वारसदारा  जग बदलण्या सज्ज हो
क्रांतीची हाती मशाल घे शांती, समतेचा पाईक  हो

©Shankar kamble #विद्रोह 
#लढा 
#जयंती 
#अण्णाभाऊ साठे


#AWritersStory
loader
Home
Explore
Events
Notification
Profile