Find the Latest Status about मानाचा मुजरा फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानाचा मुजरा फोटो.
vaishali
🌷 मानाचा मुजरा 🌷 शिवनेरीवर जन्म हा शिवबाचा झाला जिजाऊ मातेला अन् प्रजेला आनंदी आनंद झाला || उत्तम संस्कार त्या मातेन बिंबविले त्यांच्या मनी रोज सांगे शौर्य आणि पराक्रमाची कहाणी || घडवावे तू स्वराज्य मातेने हीच दिली शिकवण हिंदवी स्वराज्य उभे करेल दिले शिवबाने ही वचन || किल्ले रायगडावर शिवबाचा अभिषेक हा केला पूर्ण करण्या स्वप्न मातेचे शिवबा सज्ज झाला || मूठभर मावळ्यांना घेऊन राजे मुघलांशी लढले जिंकुनी गड किल्ले मुघलांना परतीच्या वाटेला धाडले || या सह्याद्रीचा छावा हा महाराष्ट्राचा असे अभिमान तळपता सूर्य जणू राखली त्यांनी या मातीची शान || शूर पराक्रमी सर्वगुणसंपन्न असा राजा नाही कोणी असे सदा त्यांना मानाचा मुजरा प्रत्येक हृदयातूनी || 🙏 मानाचा मुजरा 🙏
Tejas Jadhav (TAJ)
आज ३ एप्रिल.... आजच्याच दिवशी रायगडावर सूर्य मावळला तो कायमचा... हिंदवी स्वराज्याचा सूर्य....!! अठरापगड जाती-जमाती व बारा मावळातील पोर सोर एकत्र करून स्वतःच्या राज्याची अवघड संकल्पना ज्यांनी सत्यात उतरवली.... तो सूर्य मावळला....!! पाच-पाच शत्रूंशी एकाच वेळी लढून देखील स्वराज्य ज्यांनी शाबूत ठेवले.... तो सूर्य मावळला...!! आपली ताकद कमी असेल तर शत्रूशी लढताना गनिमी कावा वापरावा, हि शक्ती ज्यांनी जगाला दिली.... तो सूर्य मावळला...! हिंदू धर्माचे रक्षण करून देव-देवतांचे अस्तित्व ज्यांनी अबाधित ठेवले.... तो सूर्य मावळला...! जिवंतपणी ज्यांना देवाची उपाधी मिळाली, ज्यांची तुलना त्यांच्या शिवाय आणखी कोणाशीही होऊ शकत नाही.... तो सूर्य मावळला...तो सूर्य मावळला...!! मात्र...मात्र, तो सूर्य मावळताना देखील आमच्या सारख्या सह्याद्री च्या पाखरांच्या असंख्य मनात ज्योत पेटवून गेला...!! मावळलेला सूर्य आजही मावळ्यांच्या मनात तेवत आहे...तेव्हड्याच प्रखरतेने...!! (मावळा तेजस अभिमान जाधव) आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!
Kishor Rokade
"एकी" आता कुठे आपण एक होतोय...संघटित होताना पूर्वी सारखा आनंद ही जाणवतोय.. जरी नाही येत सोबत तुमच्या ,धावता मला...साथ नक्की राहील तुमच्या त्या योग्य वेळेला..! आठवण मनात आहे अजूनही त्या गोड दिवसांची... येईल का पुन्हा संधी इतिहासात जाऊन नांदण्याची..! काय होत ते वावरणं,एकमेकांना सावरण ,प्रत्येकाची बातच निराळी होती.. स्वराज्याच्या मातीत आपुलकीची ओढ होती.! पंचवीस तीस वर्षामागे सणांची जणुं पैजच लागायची... मात्र शिवरायांची जयंती सर्वांना एकत्र आणायची..! जुना गड नवा गड म्हणुन स्वराज्याची ओळख असायची.. हर एक गडावरील मातीतील मजा ही रांगडीच रहायची..! दृष्ट लागण्याची खात्री आता मला पटली.. शहरीकरण ओद्योगिकतेच्या नावाखाली,काही शहरात मराठी आटली..! स्व स्वार्थात बुडालेली अधिक आपलीच माणसे आहे.. आज च्या जातीवादाला सांग फुस कोणाची आहे..??? आवर घालुन भावनांना..साद घालतो साऱ्यांना..भविष्य विचार करण्याला ..या मराठी एकीकरणाला.. जोडा मराठी बोला चळवळीला..यश वाढेल.. बळ लाभेल.. मराठी अस्मितेला..मराठी माणसाला..! 🚩🚩समर्पित🚩🚩 मराठी एकीकरण समिती मराठी बोला चळवळ मराठी अस्मिता श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा "जय शिवराय"
Chaitali Yengade
युगप्रवर्तक शिवराय:- उगवली सोनेरी पहाट शिवनेरी किल्ल्याचा तेजस्वी थाट जिजाऊच्या पोटी जन्मले शिवराय शिवनेरीत आनंदाची भरभराट.... ✍ ✍कु. चैताली प्र. येंगडे 🚩🚩#राजे मानाचा मुजरा#जाणता राजा#🚩🚩
Abhishek Panchal
............ छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि नमन 🚩😇🙌🙏 YourQuote Taai
Nil Kharkar
छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमीत्त त्रिवार मानाचा मुजरा ....…. जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमीत्त त्रिवार मानाचा मुजरा ....…. जय महाराष्ट्र #शिवाजीमहाराज