Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणींचा मोहोर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणींचा मोहोर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणींचा मोहोर.

ChetaN Gangurde

#पाऊस आठवणींचा .....

read more
पावसाने आज परत शिकवलं की...
इतकंही कमजोर नाही व्हायचं...

कितीही भरून आलं...
तरी अस लगेच कोसळून नाही जायचं...😔

                        ✍🏻ChetaN..... #पाऊस आठवणींचा .....

कवी - के. गणेश

आठवणींचा पाऊस..

read more
मी आजही प्रयत्न करतोय
तुला पूर्ण विसरण्याचा..
मनात तसाच पाऊस येतोय
तुझ्या आठवणी बरसण्याचा..! आठवणींचा पाऊस..

Rashmi Hule

आठवणींचा पाऊस

read more
ओलावा मनाचा तुझ्यासह भिजलेला
आठवणींचा पहाड बर्फासम थिजलेला
भेटीसाठी तुझ्या हा जिव आसुसलेला
येशील तेव्हाच दिसेल पिसारा
मनमोराचा फुललेला.  आठवणींचा पाऊस

somnath gawade

आठवणींचा मळा

read more
      आठवणींचा मळा
जेंव्हा खुप सारं वाहून येतं
आठवणींच्या डोहात
तेंव्हा एक-एक घागर घेऊन
ओतावी प्रत्येक झाडापाशी
आणि कालांतराने बहरून यावी फळे-फुले
त्याला कडू, गोड, तुरट आठवणींची
चाखावी ती चव पुन्हां-पुन्हा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
असंच काही आठवणींना साठवावं,         
रुजवावं,बहरून येऊ द्यावं..
असाच जपावा आठवणींचा मळा
अगदी शेवटच्या प्रवासापर्यंत...


 आठवणींचा मळा

Akshay

निखरा आठवणींचा #Winter #मराठीकविता

read more
निखरा आठवणींचा सखे
आज ही पेटतो आहे
एकटा बसलो असता 
मनाला हुन्दका 
आज ही फुटतो आहे

अचानक बेचैनी आण
डोळ्यातून पाणी वाहत आहे
चार माणसात  बसलो असता
एकटेपणाचा भास होत आहे

निखरा आठवणींचा सखे 
आज ही पेटतो आहे

ओठांवर तुझे नाव आणी
डोळ्यांन समोर तुझा चेहरा
का ग येत आहे
जीवनात नाहीस तु माझ्या
तरी पण तुझा भास वारंवार
का ग होत आहे
सर्व काही जवळच असून
काहीतरी हरवलंय
अस वाटत आहे

निखरा आठवणींचा सखे
आज ही पेटत आहे

तु माझ्यापासून दुरावल्याच्या पाठीमागे 
चुक तुझी का माझी
या प्रश्नाचे उत्तर आज ही 
शोधत आहे
डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूनी
तुझी आठवण पुसण्याचा 
प्रयत्न करत आहे

निखरा आठवणींचा सखे 
आज ही पेटतो आहे 
एकट्यात बसलो असता
 मनाला हुंदका
 आज ही फुटतो आहे

©Akshay निखरा आठवणींचा

#Winter

Sachin Zanje

आठवणींचा क्षण #Yaari

read more
भेटीचा तो क्षण..
  भरून आले मन..

शब्दांनी सांगावे लागत नाही कि 
तू माझी कोण आहे.
भावनाच सांगुन जातात की
 तुझा मी आहे.

डोळेच दाखवत होते
मी कोण आहे.
ऐकणारे कान साठवत होते
ते बोल किती महत्त्वाचे आहे.

ते हास्य पाहताना वाटे
आनंद तो माझा आहे. 
क्षणभर विसावा तो भासत सांगे
आपुलकीचा स्नेह किती आहे.

मला नाही माहीत मी 
तो काय आहे.
पण तुझा होऊन राहण्यात
सदैव मी तो वेडा तुझा एक आहे.

तुझ्यातील तो मी - सचिन झंजे. आठवणींचा क्षण

#Yaari

मयुर लवटे

आठवणींचा हुंदका, #SAD #Love #for #you

read more
आठवणींचा हुंदका 


आज तिचा status ला फोटो पाहून 
तिला nice dp असा msg केला, 
Msg माझा पाहताच तिने मला 
चटकन thanks असा reply दिला. 

इतक्या दिवसांनी तिचा msg पाहून 
अगोदर मी थोडा स्तब्ध च झालो, 
राहालं गेलं नाही म्हणून मला 
कशी आहे?, असा msg करू पाहलो. 

Msg करताच तिने 'चांगली आहे' 
Reply असा केला, 
Chatting करता करता तिच्यासोबत 
पुष्कळ वेळ निघून गेला. 

बोलता बोलता तिने 
जुन्या आठवणी ताज्या केल्या, 
बघता बघता माझ्या 
डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. 

खरंच वेळ निघुन गेली होती 
अनमोल ती आज, 
आठवत होता तिचा माझ्यासाठी 
सर्व beauty plus चा शृंगार आणि साज. 

Chatting करता करता दोघेही Whats app वरून 
जुन्या मुक्त करत होतो द्वेषाच्या सर्व गाठी, 
दोघे पण आज emojis पाठवून खुप रडलो 😭
कारण कळलंच नव्हतं, 
चूक कोणती झाली, आपल्याला दूर होण्यासाठी. 

विचारता विचारता मधात संपली. 
माझ्या मोबाईल ची battery, 
Reply तिने दिला नाही 
कारण मी msg केला होता अर्ध्या रात्री... 

मयुर लवटे आठवणींचा हुंदका, #SAD #Love #for #you

DNYANESWAR DHAKRE

तुझे ते प्रेमपत्रे अन् भेटवस्तू हा आठवणींचा खजिना आहे . . . नसली जरी जवळ तू. . तो आठवणींचा खजिना कायम माझ्या जवळ राहे. . .

read more
तुझे ते प्रेमपत्रे अन् भेटवस्तू

 हा आठवणींचा खजिना आहे . . . 

नसली जरी जवळ तू. . 

 तो आठवणींचा खजिना कायम माझ्या जवळ राहे तुझे ते प्रेमपत्रे अन् भेटवस्तू

 हा आठवणींचा खजिना आहे . . . 

नसली जरी जवळ तू. . 

 तो आठवणींचा खजिना कायम माझ्या जवळ राहे. . .

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

गंध आठवणींचा कवी अविनाश चव्हाण यांची एक अप्रतिम रचना #nojotovideo

read more
mute video

Santosh Jadhav

#पाऊस आठवणींचा... पाऊस आठवणींचा...! चिंब चिंब भिजवून जातो.. पाऊस धुंद आठवणींचा.. थेंब थेंब सांगून जातो.. भाव तो बेधुंद मनींचा.. अजूनही स्

read more
पाऊस आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा..
थेंब थेंब सांगून जातो..
भाव तो बेधुंद मनींचा.. 
अजूनही स्पर्श तरूण तो.. 
तुझ्या माझ्या मिलनाचा... 
दूरदेशी जागवतो.. तो.. 
ध्यास मनी साजणीचा..! 

आठवतो तो पाऊस पहिला.. 
सुगंधाचा दरवळ ओला...
तहानेल्या या भूईला... 
अमृताचा स्पर्श झाला...
कोंब कोंब अंकुरला तो...
ऋणी झाला तो धरणीचा..
चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा....! 

खट्याळ ते थंड वारे.. 
शहारले अंग ते सारे... 
तुला मला भिजवून गेले.. 
प्रेमाचे ते रंग सारे...
रिमझिम तो गीत गातो...
बहर सोबती रातराणीचा... 
चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा....! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #पाऊस आठवणींचा...
पाऊस आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा..
थेंब थेंब सांगून जातो..
भाव तो बेधुंद मनींचा.. 
अजूनही स्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile