Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi poem for wife Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi poem for wife from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

Siddharth KB_

 #kavitaprem #prem #love 
#maharashtra #indialove #marathi#maratha #premachiparibhashachekvegali
#fakttuanime #life

SP

वादळवेडी रात.....🌃 #marathi poem nojoto #poems #marathi

read more
आला तो परत घेऊन 
ती रिमझिम बरसात
त्या सोबत झाली सुरू
ती वादळ वेडी रात....

झाडे झुडपे हलू लागली 
सुटला तो वारा सोसाट
जीव सारे भांभरून गेले
झाली मनाची हुरहूराट....

आसमंत गीलबलू लागला
शांत झाला पाखरांचा किलबिलाट
मेघराजा ओसंडत होता
त्यात विजेचा कडकडाट....

डोंगर दऱ्या चमकत होत्या
चमकत होते गगन सारे
काळ्याभोर त्या नभान मागे
फितूर झाले चंद्र तारे....

त्या गडद कळ्या अंधार रात्री
धडकी भरली होती मनात
हळू हळू सारे शांत झाले
सरली ती वादळवेडी रात.....(२) वादळवेडी रात.....🌃
#Marathi poem #nojoto 
#poems #marathi

Sandhya Kuchekar-sanjh

#WinterEve #marathi #poem life

read more
गैरसमज होता माझा मैत्री आणि नाती तेव्हाच टिकतात जेव्हा विचार जुळतात,
खरं तर नाती तीच टिकतात जे नात्याना जपून हाताळतात,
ऐकून आहे मी माणूस जात फार स्वार्थी आहे
पण जितक निस्वार्थी रहाव तो माणूस कधी एकटा पडत नाही,
अहो कोणास ठाऊक हा माणूस जन्म पुन्हा एकदा वाट्याला येइल की नाही?
एक क्षण असाही येइल जो नको होता नजरे समोर त्यालाही अखेर पहायला डोळे पाणावतील, 
कोणास ठाऊक त्याला न भेटण्याची खंत त्या माणसपर्यंत पोहचेल का नाही, 
आयुष्य माझ अर्ध संपत आलं हजारो लोकांना आजमावून मला एकच समजल जो नात्यांना संभाळून ठेवतो तो जगातून संपला तरी लोकांच्या जबानीतून अखंडपणे जिवंत राहतो,
नात्यांबद्दल मला खूप काही लिहावस वाटत पण शब्द संपणार नाही,
शब्दांना जरी अंत नसला तरी माझा अंत कधी न कधी असणार आहे,
मी हायात जरी नसेल माझी कविता कधी संपणार नाही, 
कारण मी जोडलेली प्रत्येक नाती माझी अपूर्ण माझ्या कवितेला अंत नाही खात्री देतील,
कारण,मला अंत असला तरी माझं शब्दांशी असलेल नात कधी संपणार नाही...
                लेखिका-संध्या कुचेकर(सांज)

©Sandhya Kuchekar-sanjh #WinterEve #Marathi #poem #life

kishor A Gutte

जीवनाचा प्रवास कुठून चालू होतो
कुठे जाऊन संपतो कसलाच थांग लागत नसतो
आपल्याला फक्त ज्या वाटेने जायचे आहे
तीच वाट दिसत असते
खुप वळणे येतात झाडे झुडपे येतात
तरीही न थांबता कधी
फुलांतून तर कधी काट्यांतून चालायचे असते
प्रवासात खुप माणसे भेटतात
कोणी अनोळखी तर कोणी
मित्र बनतात
असेच चालता चालता असे वाटते
Thank God आता प्रवास संपत आला आहे
आणि मग अचानक मोठे वळण येऊन समजते
 
आता तर प्रवास कुठे सुरु झाला आहे
आता तर प्रवास कुठे सुरु झाला आहे.....

©kishor A Gutte #Life❤ #poem #marathi #Life

Ritesh Gadam

#मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #Best marathi poem. #मराठीकविता

read more
आयुष्य •••
किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात
कधी भविष्याच्या  स्वप्नाच्या रंगात
 तर कधी प्रेम भंगात...
कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात
तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात.

कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते
तर कधी मैत्रीच्या मोहात...
कधी मायेच्या ममतेत फुलते
तर कधी बापाच्या प्रेमात बहरते.

कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे
तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे
कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते
तर कधी एकट्या एकट्यात हस्ते.

कधी सुखाच्या किनार्‍यावर शांत बसते
तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते
कधी चंद्रावाणी सौम्य वाटते
तर कधी सूर्या वाणी कठोर भासते...
                        
                              _ रितेश गडम

©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.

Omkar Pandav

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile