Find the Latest Status about इकडे तिकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इकडे तिकडे.
yogesh atmaram ambawale
दोघेही समोरासमोर..मनात घुसमट.. दोघांनाही काही सांगायचंय,दोघांनाही काही ऐकायचंय.. दोघेही लाजत आहेत,कशी सुरुवात करावी ह्या गुंत्यात आहेत. काल छान बोलले आजची भेट ही ठरली. नेहमीच समोर येतात बोलतात,पण आज मात्र बोबडी वळली. नजरेला नजर भिडते,लाजतात इकडे तिकडे पाहतात. पुन्हा एकदा काही सांगण्याच्या प्रयत्नात, ऐक ना म्हणत दोघेही एकदम सुरुवात करतात. मनातल्या मनात हसत पहिले तु बोल वर अडकतात. शेवटी तिच बोलते ऐक ना म्हणत मनातले गुपित खोलते. तेव्हा कुठे त्याला थोडे हायसे वाटते, ऐक ना वर अडकलेली गाडी पुढे सुसाट निघते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMin
Prerana Jalgaonkar
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट (लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम
Prerana Jalgaonkar
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट (लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम
Harshada Bhangale
लेक्चरला दांडी..😜! #कॉलेजमधली एक हास्यास्पद घटना😉❤️ ..#KGCE🎓 Read Caption..🖤 कॉलेजला असतांना लेक्चर्सला दांडी मारणं, म्हणजे सर्वांसाठीच गंमती गोष्ट!..आणि त्यात जर विद्यार्थी इंजिनीअरिंगचा असेल तर विचारायलाच नको! नेह
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
sandy
❤️💛❤️💛❤️💛❤️💛 पहिला स्पर्श असा का झाला? 💛❤️💛❤️💛❤️💛❤️ ७/८ खोल्यांचा मोठा वाडाच म्हणा. चौकोणी. त्यात रहायला संपतराव-मालतीबाई आणि एकुलती शितल.
sandy
परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी
अल्पेश सोलकर
तिकडे .. पावसाचा कहर पिकांचं नुकसान.. इकडे.... रोषणाईत न्हाली शहरी उत्साही "दिवाळी".. तिकडे.. पावसाचा कहर पिकांचं नुकसान.. इकडे.. रोषणाईत न्हाली शहरी उत्साही "दिवाळी".. © अल्पेश सोलकर
अल्पेश सोलकर
तू डोळे मिटून मोकळी होतेस... इकडे बघ .. ओठांनी ओठांना काय केले तू डोळे मिटून मोकळी होतेस... इकडे बघ .. ओठांनी ओठांना काय केले © अल्पेश सोलकर