Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातील प्रेम भावना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातील प्रेम भावना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातील प्रेम भावना.

    PopularLatestVideo

Rahul Salve

मनातील भावना #poem #nojotophoto

read more
 मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
टाळ,मृदुंग,हाती वीणा
अन् मुखी अभंगाची गोडी...

तुझ्या सावळ्या रूपात गुंतले
तुझ्या चरणी मी झुकले...

चंद्रभागेत नाहले 
तुझ्या भक्तीत मी वाहिले...

तुझ्या जयघोषात रंगले  
भक्तीच्या सागरात मी दंगले... 

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा 
माझ्या अंतःकरणात रूजले...

तुझाच हेवा,तुझाच ठेवा मजला
तुच माझा मायेचा झरा!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
अवचित पणे मनाला ठेच लागते.
 असंख्य व्यक्ती त्या दुःखाच्या सागरात स्वतःला सामावून घेतात.
दुःखाच्या खळखळत्या लाटांन सोबत आयुष्य काटतात .
 तर मोजके व्यक्ती नव्याने ऊभारी घेऊन स्वछंद गगनभेदी भरारी घेतात .
अलिप्त कला,गुणांना आत्मसात करून नव्याने स्वप्न रंगवतात .
एक ठेच.........
किती काही शिकवते ना?? मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
मिणमिणत्या वाती आज विझल्या होत्या...
आशेचे किरण आज निजले होते....... 
चमकणारा काजवा देखील 
आज स्वतःच्या अस्तित्वाला मुकला होता....
अंधाराच्या भयाण सावटा पुढे 
आज सर्वांनी हात टेकले होते !!!
................. Dip मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
**मैत्री**
 गप्पांच्या रंगलेल्या मैफिली तुने ....
ती डोळ्यात कचरा गेल्याचे कारण सांगून दुसऱ्या दिशेला गेली ..
तीच्या पाठोपाठ तिची जिवलग मैत्रीण ???
मी आलेच .....
असे बोलून.... 
तिने तीच्या कडे धाव घेतली...
खरं तर डोळ्यात कचरा जाण्याचे फक्त कारण होते ..
गप्पांच्या ओघात नकळत जखमे वरील खपली अलगद काढली गेली होती...
आणि जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असणारी मैत्रीण ...
डोळ्यातील कचरा काढण्यासाठी नाही तर ???
मनावर झालेल्या घावा वर प्रेमाची फुंकरी मारण्यासाठी आली होती!!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
गजबजलेल्या वाटी,
अंधारलेल्या रात्री ....
मला माझे अस्तित्व जपायचे आहे...
नजर न लागो कोणाची... 
मला माझे रूप लपवायचे आहे!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
तु आई.....
तु जगद जननी....
तु हसर्‍या घराची किंकाळी....
राखीची मानकरी तु.....
तु दोन्ही घरांची लक्ष्मी....
असंख्य ऋणानुबंधांचे वेल तुझ्या हाती...
गुंफुणीया नाते वेली वर उमलते सुखाची फुले....
अन मनमोहक सुगंध दरवळे चोहीकडे...
तु कर्तव्यनिष्ठ...
तु तत्पर....
मायेचा सागर तु....
स्वप्नांन वर स्वार होऊन यशाचे शिखर 
गाठते तु...
सदैव गगन भरारी घे तु!!!!!
जागतिक महिला दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
माझे-माझे करता-करता
सोडायचे आहे जग सारे
तरी किती धडपडतोय तु.....

अंथरुणाशी खेळता-खेळता 
सुन्न पडणार आहे अंग सारे 
तरी किती धडपडतोय तु....

सरणाचे चटके भोगता-भोगता 
हाडांचा सापळा उरणार आहे
तरी किती धडपडतोय तु ....

चार लोक चार अश्रु गाळतील
नंतर त्यांना ही विसर पडणार आहे
तरी किती धडपडतोय तु ....

रिकाम्या हाती आला तु 
अन् रिकाम्या हाती जाणार तु 
तरी किती धडपडतोय तु....

माझे-माझे करता-करता 
सोडायचे आहे जग सारे 
तरी किती धडपडतोय तु!!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
आत्ता तरी जगू द्या???
 तुमच्या वाईट नजरांपायी
घरात मला डांबले...
मुलगी आहे तु??
म्हणून बंधणे माझ्यावर 
लादले...

आत्ता तरी जगू द्या???
स्वतःच्या अस्तित्वाला शोधू द्या .
मनाशी बांधलेले स्वप्नांचे इमले..
सत्यात उतरू द्या. 
उंच भरारी घेऊन...
यशाचा स्वाद 
मला हि चाखू द्या.

आत्ता तरी जगू द्या???
पायातील बेड्यांपासून मुक्त होऊन.... 
स्वच्छंदी,मनसोक्त,मनमुराद उडू द्या.
फुलपाखरा प्रमाणे बागडू द्या. 
सप्तरंगी आयुष्याच्या रंगात .....
मला हि रंगू द्या.

आत्ता तरी जगू द्या???
तुमच्या वाईट नजरांपायी 
घरात मला डांबले ...
मुलगी आहे तु???
म्हणून बंधणे माझ्यावर 
लादले... मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
अंधारलेली रात्र आपलीशी भासते....
 जे अश्रू उजाळ्यात हास्यच्या पांघरूणा खाली लपवतो..
ते अश्रू अंधारलेल्या राती वेदना होऊन ओसंडून वाहतात !!! मनातील भावना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile