Nojoto: Largest Storytelling Platform

New शेतकरी हैराण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेतकरी हैराण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेतकरी हैराण.

    PopularLatestVideo
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

सुगी सराईचं दिस नाही इसावा पायाला माय माळ तुडविते                   चार मोत्याच्या दाण्याला..   
भर उन्हाचा काहूर भिजं घामानं पदर
 आग पोटात पेटली  चिल्या-पिल्याचा इचार...
  धाटं-धाटं जमवूनी भारा जोंधळ्याचा डोई लयी तापली ढेकळं भार संसाराचा वाही...
  काट्या-कुट्यात चालता देह -मनाला जखमां* 
  *घाली फुंकर स्वतःच चिंधी बांधते त्या कर्मा* ...
    अंग मोडूनियां काम नाही घडीचा आराम* 
   वात तीळ तीळ जळे दिव्यासंग ज्योत ठाम...* 
 *घोट पिऊनिया पाणी दूर सारते भुकेला* 
  शिळ्या तुकड्या संगती पचविते नशिबाला...* 
 सांज ढळता-ढळता रास सरली-सरली* 
 ऊत आला तुझ्या दारी झोळी अर्धी भरली...* 
   मोती झोळीत की डोळा    दोन्ही नाहीत येगळा* 
 * घास भरविते माय सारा अमृत सोहळा...*

©Shankar kamble #सुगीचे #रास #शेतकरी #🎑शेती #शेती 

#SunSet
6a4f03e941733199e1361f4ffbe09d14

Abhijeet Jagtap

निसर्ग अन् शेतकरी

 निसर्गाला वाटते दमला आहे
  माझा शेतकरी...
तेव्हा तो बरसवतो सरी आपुलकीने..
किलबिलाट तव उठतो पावश्या घुम पावश्या घुम्
जणू धरणीमाय कवटाळते त्याला लेकराप्रमाने..

साथीला येतात बुबुळासारखे ढग..
अन् कथ्थक करतो तो मोर नाचरा..
बरसतात सरी एकामागून एक..
जणू वसुजानकीचा तो कृष्ण हासरा..

शेतकरी आणि निसर्ग म्हणजे जणू सख्खे भाऊ..
एकत्र आले तर बनतील हे अख्ख्या गावाचे राव..
अन् गेले विरोधी एकमेकांच्या..
तर यांना रंकाचाही मिळणार नाही भाव..

साथ दे निसर्गा , वाट दे निसर्गा..
कष्टाची होऊदे चीज त्याच्या..
आजवर झेलली खूप दुःखे त्याने..
त्यास दिसुदे एकदा सुखाची पहाट निसर्गा...
त्यास दिसुदे एकदा सुखाची पहाट निसर्गा...

                                   -अभि...✍ #मायमराठी #मराठी #मराठीकविता #शेती #शेतकरी #गावाकडची_रानफुलं #कष्ट
dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

लढत होतो जीवनाशी जेव्हा गरिबीत उपाशी जगत होतो
काम मिळेना पोटाले तेव्हा माणसातल्या माणूस शोधत होतो
लेकर रडत होते लहान भूक त्यांची लयं मोठी
दोन घासाच्या भाकरीसाठी वावरात राबराब राबत होतो

जीव सोकुन जाई सारा अनवाणी नांगर हाकत होतो
रगत गाळूनी घामाचे उन डोईवर झेलत होती
सपान डोयात उद्याच्या चांगल्या दिसाच
याच सुखाच्या सपनात मी रमून जात होतो

दिस भराभर निघून उपाशीच घालवत होतो
कर्जाचा सावकार रोज उंबरठ्यावर पायत होतो
आज देतो उद्या देतो पैसा देऊ तरी कुठून 
आजचा दिवस फक्त उद्यावर टाकत होतो

जगाच्या नजरीतला काय त मग मी पोशिंदाच होतो
मायाच लेकरासाठी मी जवारी उधार मागत होतो
पैश्यापायी मले कोणी दे ना जवरी
आसवे पुसत मी माणसातला माणूस शोधत होतो #शेतकरी
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

शेतकरी...

शेतकरी...

7,735 Views

e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

विषय - व्यथा शेतकऱ्यांची.

पैसा मिळवण्याचे
सर्व साधन आता थांबले.
जगण्याचे महत्व किती आहे 
हे प्रत्येकाने जाणले.

हौस मज्जेच्या जगण्याचे
सुत्रे गेलीत बदलून.
जगण्यासाठी काय लागते 
हे प्रत्त्येकास आले कळून.

नाही प्रतिष्ठा मोठी आमची
तरी दिन रात्र आम्ही राबतो.
पिकाचा अन त्या भुकेलेल्याचा विचार मनी 
म्हणून समाजाशी आम्ही जास्त नाही लढतो.

नाही करत वाढावे वेतन
असा आम्ही प्रचार.
भाजीपाल्याचा  वाढला दर आमच्या 
 तर समाज चार पैशाला होतो तेव्हा लाचार.

खते,पिक,इत्यादी आर्थिक किंमतीचे
दर असतात तुमच्याच हातात.
त्यावेळी सुचत नाही का ? 
किंवा येत नाही ? हा विचार तुमच्या मनात.

निसर्गाशी लढतो आम्ही
आणि परिस्थितीशी करतो दोन्ही हात.
सांगत नाही कधी कुणाला
आर्थिकतेवर आम्ही कशी करतो तेव्हा मात.

काळया मातीची लेकरं आम्ही
म्हणून जग म्हणत आम्हाला भुमीपुत्र.
अन्नदाता आहे तो सर्वांचा 
समजु नका त्याला एकतीळमात्र.

कवी - कु सचिन सदाशिव झंजे.
          कोल्हापूर.. शेतकरी....

शेतकरी....

8 Love

1c48dd37a3d5ab7bf1f091bfb62aeb69

RUDRA Hd

#शेतकरी
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

जग पोशिंदा..

ठाऊक नाही जगास 
आम्ही काय करतो.
शेतकरी आहे असं म्हटलं कि,
गरीब, लहान वर्गीय,हया नजरेने समाज आम्हास पाहतो.

ज्या शेतात आम्ही राबतो
त्यावर भारत देश माझा जगतो.
सरकारी नोकरीचा नादी न लागता
त्याचा मुलगा देशासाठी ताठ मानेनं सिमेवर लढतो.

अभिमान गर्व करू नका 
तुमच्या नोकरीतील भरमसाठ पैशाचा.
घरच्या जेवणाशिवाय पोट भरत नाही
ते कुठून येते विचार कर त्या अन्नाचा.

कंपनी ,उद्योगांमुळे
झालो आम्ही मालोमाल.
त्याच कंपनीला कच्चा माल तयार करण्यासाठी
किती होतात माहीत आहे आमच हाल.

अशा अनेक लिहायच्या आहेत कथा.
त्यात कळेल माझ्या शेतकरी राजाची व्यथा.

  धन्यवाद कवी - कु सचिन सदाशिव झंजे. शेतकरी

शेतकरी

9 Love

a1580695d13cc52d669c5721aa563c40

Pratiksha Surwade

शेतकरी

शेतकरी

451 Views

cee1767d824ec3cc00a08473d11f8ba0

Dipak Khekare

शेतकरी माझा  बाप


शेतकरी बाप माझा राबे राणा वनात
नाही त्याच्या पोटी तूप रोटी साखर
खातो चटणी भाकरी चालवितो नागर
माझ्या बापाची मात्र नाही कुन्हा रे कदर...

अंगावरी ऊन घेऊन  चाले अनवाणी पायांनी
वाट सजली होती काट्या काळ्या गोट्यानी
त्यांच्या अंगावरील सदरा फाटक फुटका
त्यांच्या नशिबी मात्र ऊन वाऱ्याच्या आसरा

खाऊन चटणी भाकर राबे दिवस रातर
खांद्यावरी रे नांगर जसा नभात इंद्रधनुष्य
अंगावरी घाम त्यात इंद्रधनुष्याचे रंग
त्या रंगानी सजले माझ्या बापाचे रे अंग

कधी भेटणार भाव शेतकऱ्याच्या मालाला
सांगे हमी भाव देऊ मग चुकते कशाला
आम्ही आहो दानादिन म्हणूनच ही गत्ती 
एकवटूनचं आलो तर होईल तुमची सुट्टी
पण एकत्र होण्यात भ्रष्ट आमची बुद्धी

आता तरी एकत्र येवून लढूया
एकमेकांचे सारथी आपण बनुया.....


दिपक खेकारे
खिर्डी,चंद्रपूर-८८८८३२४१५६ शेतकरी

शेतकरी

4 Love

e89e5e2266404c02c504250a433d2f8a

Pravin Rathod

शेतकरी

शेतकरी

46 Views

4ca06a6019092f357ae48a7a1edbce88

Sanika Gaikwad

#शेतकरी राजा 👑

तू लेक काळया मातीचा
मर्द रांगड्या छातीचा

पोशिंदा तू जगाचा 
मानकरी तू कामाचा

कष्ट नशिबी तुझ्या फक्त
 पेरायचंआणि काढायचं तू नुसत

घामाचं शून्य मोल तुझ्या 
बेभाव जातो माल
निसर्गाचा समतोल बिघडला 
की होतात तुझे हाल

अंधाऱ्या राती सोबतीला
 विंचव आणि साप
तरी दुसर्‍याच्या हाती
 तुझ्या किमतीच माप

सर्जा राजाची नादर गाडी 
तुझी वेगळाच थाट
राबतोस कळ्या आईसाठी म्हणूनच 
देशाचा कणा आहेत ताट

©Sanika Gaikwad शेतकरी

5 Love

e464a0e53e3ad34a933d6b0139fc5dce

Kiran Sabale

स्वभाव शांत रुबाब एक नंबर रॉयल शेतकरी

©Kiran Sabale
  शेतकरी

48 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

शेतकरी

46 Views

406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

तो राबराबतो शेतामध्ये फार

अन पर्जन्याचा त्याच्यावरती वार

बीज पेरलेले वाया जाते सारे

पण गडी कधीही मानत नाही हार


थांबून राहणे माहित नाही त्याला

अविश्रांत मेहनत आलेली नशिबाला

रोवून घट्ट तो पाय उभा मातीत

कामास सज्ज जोडून बैलजोडीला 


राबतात त्याच्या कुटुंबातले सारे

झेलतात सगळे अंगावरती वारे 

थकतो जीव तरी थांबत नाही कोणी

डोळ्यांमधुनी वाहतेच पाणी खारे


भाव मिळत नाही इतके करून त्याला

तो सर्व धान्य विकतो कवडीमोलाला

धूळधाण उडते मग स्वप्नांची त्याच्या  

कष्टाने तो सावरतो आवेगाला


सगळ्या पृथ्वीचा तो असे अन्नदाता

पण क्षुल्लक किंमत येते त्याच्या हाता

हे चित्र बदलणे गरजेचे आहे ना?

एवढा करा की विचार जाता जाता

--- ३१/०७/२०२३

©उमा जोशी #शेतकरी
8aa0fe407327c4d02b832ff57f13e12b

Pawan Patil (कपिसतनय)

शेतामधे राब राब राबणारा
पाऊसाची आतुरतेने वाट बघणारा
तो  आपला शेतकरी असतो.

शेतामधे घाम गाळणारा
घामचे मोती उगवणारा
तो आपला शेतकरी असतो.

स्वत: उपाशी पोटी झोपनारा 
मात्र कुटुंबाचा तोंडी निवळा घालणारा 
तो आपला शेतकरी असतो.

कुटुंबाला छाया देणारा 
जगाचा पोशिंदा असणारा 
तो आपला शेतकरी असतो.

पण ह्याच पोशीद्याचा पाठीत खंजीर घूपस नारे
भूमिअधिग्रहन कायदा लागू करु पाहणारे 
आपले भारत सरकार असते.

                   पवन पाटील(कपिसतनय)
                   दिनांक- 03/06/ 2015 शेतकरी

शेतकरी

12 Love

1cf9277315f74d05333210e63cfd2b83

Vaibhav Jadhav

शेतकरी

शेतकरी #nojotovideo

27 Views

f6b8e8ddabe660bf5ce47d809d304a92

Shubham Ghadge

शेतकरी

शेतकरी #story

47 Views

f6b8e8ddabe660bf5ce47d809d304a92

Shubham Ghadge

शेतकरी

शेतकरी #poem

30 Views

e7adacc75070ece0e3fd637d83b62b3f

Shraddha Yadav

आशा भयान रानात 
कसा चाले औतकरी
होरपळ नशिबाने 
कष्ट घेतो शेतकरी
        -श्रद्धा रघुनाथ यादव शेतकरी

शेतकरी

40 Love

33ff49633f6cfe4e08d396a53cbfca5d

ankit karmilkar

शेतकरी

शेतकरी

58 Views

c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

राजा बळीराजा॥ सखा सर्जाराजा
नाही गाजावाजा ॥राबराबे॥१॥

भरवसा त्याला॥ घेतला तो वसा॥
थाबे ना जरासा॥ घाम गाळे॥२॥

जनतेचा वाली॥ सदा हास्य गाली॥
सर नभी आली॥ पावसाची॥३॥

पुजन करावे॥ गोडवे ते गावे॥
बैलजोडी सवे॥  बळीराजाचे॥४॥

©Mohan Somalkar
  # शेतकरी#

# शेतकरी# #मराठीकविता

57 Views

18780138dc5c55b50ee1e2f9e6252b21

om Garole

#शेतकरी
7c721842cc7e8386686f6998f7ddf47c

Rohit more

#शेतकरी #
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

शेतकरी स्वतः साठी
कधी पिकवत नसतो;
इतरांसाठी पिकविण्याचा
धर्म तो कधी विसरत नसतो. #शेतकरी
8d07e8a5e852b2ce42b29e946d672917

Sanjay Baindle

#शेतकरी
fcb4ae8ddfdd5c2e1bf3769382d732d1

Gajanan Talpate

ओन्ली शेतकरी

ओन्ली शेतकरी

5,664 Views

462195f5ab9cb35687069ba222a65a84

HANAMANT YADAV (कवीराज)

हिरवं सोनं...  

शिवाराला देवा माझ्या, हिरवं सोनं लेवू दे...
झुळू झुळू पाटात पाणी, आमृतावाणी वाहू दे...

खुलूनीया आलं मन, मोतीयाचं दिल दान.
सर्जा राजा संग मला, सुगीचं दिस पाहू दे...

दाटून ये मेघराजा, भिजव माझ्या शिवारा यां.
मातीमध्ये रुजूनं बी, अंकुर नवा येवू दे...

कष्टकरी आम्ही देवा, कष्टची आमुचा ठेवा.
भेगाळलेली काळी आई, घामासंग न्हावू दे...

कवीराज शेतकरी गीत...

शेतकरी गीत... #Music

6 Love

6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

जगावर कितीही संकटे आली तरी फक्त एकच मानूस
सदैव तुम्हाला घास भरवण्यासाठी उभा असलेला दिसेल.
तेव्हा म्हणजे जगाचा पोशिंदा "शेतकरी राजा"....!! #शेतकरी #मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile