Find the Latest Status about तुळस कधी लावावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुळस कधी लावावी.
Nishant Tendolkar
मर्त्य.. माझ्याच चांदण्यांचा मलाच नाही ठाव देशील कधी तू मज नक्षत्रांचा घाव.. घनदाट अभ्रकांचा, दे पदर तू जरासा कुशीत सावल्यांचा, दे खेळ तू नवासा जे राहून गेले मागे,सोडून दे तिथे तू रांगोळीचे पान ते,राहू दे रिते तू.. टपले इथे जरी ते, अंधार कोंदण्याला दे श्वास तू जरासे, तुळशीच्या अंगणाला - निशांत तेंडोलकर #तुळस
Vishal Chavan
तुळस... अंगणात तुळस जशी सजते, सात्विक सौंदर्य घेऊन.. मला तुला बघितल्यासारखं वाटतं, तुळशीकडं पाहून... अलगद तुळशीला बघून, हलकेच नजरेने नमन करतो.. मन म्हणतं जा आणि दर्शन घे, मी मनाला आवळून धरतो... तुळस जशी गुणकारी, तू देखील रामबाण आहेस.. तुळस रत्नासमान आहे, तू रत्नांची खाण आहेस.. रोज सायंकाळी खुर्ची घेऊन, तुळशीजवळ जाऊन बसतो. लोक म्हणतात, अंगणात काढलेल्या फोटोत; तू सुंदर दिसतो.. Vishaal/Aadinaath 12-07-21 . ©Vishal Chavan #तुळस
gauri kulkarni
कधी कधी मी मांडते जुन्या आठवणींचा पसारा हरवते काही क्षण मिरवते काही क्षण कधी कधी उलगडतो पट अलवार जपलेल्या नात्यांचा गुंत्यात गुंतते नकळत मन सापडतात मग सोनेरी पान कधी कधी झेपत नाही अपेक्षांचं ओझं लुटुपुटूच्या भांडणात होतंच की तुझं-माझं अश्रूंचा बांध फुटला की आवरता आवरत नाही अन् अबोल्यातुन काही सावरता सावरत नाही कधी कधी मात्र आकाश निरभ्र असतं स्वच्छशा मनाच्या तळाशी प्रेमच साठलेलं दिसतं हळुवार हातांनी तू त्या प्रेमाला कुरूवाळतोस स्पर्शाच्या भाषेतून सगळं दुःख विरघळून टाकतोस कधी कधी भेटतो आपण अनोळखी होऊन अन् वळणावरून चालताना जातो एकमेकांत हरवून तुझं माझं अस्तित्व आता वेगळं उरत नाही सुखं दुःख वाटून घेताना आयुष्य आपल्याला पुरत नाही #कधी कधी
its.vedee
कधी कधी.. शब्द नाही ,भावना असाव्या लागतात ओढं नाही,साथ हवी असते संवाद नसला तरी विश्वास असावा लागतो अबोला असलं तरी प्रेम असावं लागत.. ©its.vedee कधी कधी..
कवी - के. गणेश
कधी रात्र रात्र जागून शब्दांना कुरवाळत असतो, शब्द कागदावर उतरताना मनात दरवळत असतो.! @kganesh कधी कधी शब्दासाठी..
क.वि
तुझ्या टपोऱ्या हसण्याचं गालावरच्या खळीच किती गोड हसणं गं तुझ्या हसण्याच्या जादुचं जादुगाराने प्रेमाच्या जादुत थोडसं फसणं गं तुझ्यात मी फसण्याचं कारणचं असे तुझे उगाचं तुला पहायाचं गं -क.वि प्रेम होत कधी कधी