Nojoto: Largest Storytelling Platform

New अर्धी ओंजळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अर्धी ओंजळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्धी ओंजळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Raju Lokhande

ओंजळ..

read more
ओंजळ रिकामी दिसली की,याचक आणि 
दाता या दोन्ही वृत्तींचा गैरसमज तयार होतो.
                     -राजू लोखंडे ओंजळ..

उमा जोशी

#ओंजळ

read more
ओंजळभर पाणी एक वेळची तहान भागवतं
ओंजळभर स्वप्न पाहून मनही आयुष्य जगतं

ओंजळीनेच अर्घ्य सूर्यालाही मिळतं
ओंजळभरून सुख मन देवाजवळ मागतं

ओंजळभर प्राजक्ताने मन सुगंधित होतं
ओंजळ सैलावली की सुख निसटू लागतं

भरल्या ओंजळीने मन कसं अगदी सुखवतं
रीत्या ओंजळीत कोणाचं तरी दुःख सामावतं

रित्या ओंजळीत जे भरली ओंजळ रिती करतं
तेच मन भरल्या ओंजळीसारखं नेहमी सुखानं फुलतं....
          भरल्या ओंजळीसारखं नेहमी सुखानं फुलतं....
© उमा जोशी ०७/१०/२०२०

©उमाच्या मनातलं #ओंजळ

sameer

ओंजळ #मराठीविचार

read more
ओंजळ
ओंजळीत मावेनासा झालो मी
तरी ही तुझी ओंजळ रिकामी कशिग आई.

©Hey Hii ओंजळ

Manish Kanade

ओंजळ #poem

read more
अश्रूंच्या प्रत्येक थेंबात 
मला शोधण्याचा प्रयत्न करतेस
अन बघता बघता तुझी ओंजळ 
माझ्या आठवणींनी भरते...
                           - मनिष ज्ञानदेव कानडे ओंजळ

Archana Pol

ओंजळ #मराठीकविता

read more
शोधत फिरते आनंदाची ओंजळ इवली
दु:ख पावलांसोबत माझ्या रांगत येते.

मी आताशा पडते उठते सावरतेही..
मनात कातर भिती अनामिक दाटुन येते.

जीवन म्हणजे अवघड कोडे असे वाटते,
नजरेमध्ये  स्वप्न कोवळे तरी भेटते.

जुन्या स्मृतींच्या जखमा नाही कुरवाळत मी,
रोज नव्याने नवीन वाटा शोधत जाते.

कधी गवसतो आनंदाचा सूर अचानक,
कधी आडवे दु:ख अचानक गाठुन येते.

तरारलेली कळी कोवळी खुडली जाते
जीवन म्हणजे खेळ घडीचा शिकवुन जाते.

©Archana Pol ओंजळ

Rajendrakumar Shelke

रिती माझी ओंजळ Wish #Wish #poem

read more
*विषय:-रिती ओंजळ*
*मुक्तछंद काव्य*
*दिनांक :-१८/०१/२०२१*
*********************
संपत्तीच्या जोरावर
खुप काही *मिळाल,*
समोर असूनही मी
सार काही *गमावलं.*

माझीच माणसे होती
नितांत प्रेम *करणारी,*
धनदौलतिच्या नादात
आपलेपण *विसरणारी.*

प्रत्येक वेळी फक्त 
माझाच स्वार्थ *पाहिला,*
रक्ताच्या नात्यामध्ये मी
आरोष  सारा *ओढावला.*

माझ्या संकट काळात
सतत सगळे पळत *होते,*
पण माझ्या डोळ्यांवर
अहंकाराचे मळभ *होते*

सगे सोयरे प्रत्येकवेळी
माझाच विचार *करी,*
पण स्वभाव दोषापायी
मन वेगळाच विचार *धरी,*

आज साऱ्यातल सार आहे
पण माझी माणसेच *नाही,*
गतकाळातील चुकीमुळे 
रिती ओंजळ रिकामी *राही.*
------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke रिती माझी ओंजळ

#Wish
loader
Home
Explore
Events
Notification
Profile