Nojoto: Largest Storytelling Platform

New धुक्यात हरवली वाट कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धुक्यात हरवली वाट कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धुक्यात हरवली वाट कविता.

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

धुक्यात हरवली वाट #CalmingNature

read more
ओथंबल्या क्षणास पहाट साद घाली 
प्रहर होताच नव्याने सकाळ अवतरलेली 
दंगलेल्या स्वप्नात रंगून मन गेले 
निद्रिस्त देहालाही हलकेच जाग आली 

मंद वाऱ्याच्या झोक्यात तरु सावली 
भास्कराच्या येण्यात क्षणात फुलली कळी
पानाफुलांवर दवबिंदूंचा ओलावा धुसट दिसे 
हरित-तृणांवर शोभती थेंब धुक्याचे मखमली 

रातराणी उमलून गंध पसरला अवेळी 
पांघरून धुके पूर्वेस आली लाली
कधी सोनेरी कधी केशरी रविकिरणे
अंगणातूनी थेट दारावरी अलगद न्याहली 

कुजबुज पाखरांची कधी अबोल पाखरबोली
मोकळ्या आभाळी थव्यांनी नक्षी रेखलेली 
कोवळ्या उन्हाची झळ अंगावर बागडते 
शितल होऊनी पुन्हा दुरवर विरघळली 

धुक्यात हरवली वाट चंचल स्वप्नातली
चालताच पुढे वळणावरी पाऊले उमटलेली 
दाटलेले धुके विरण्यास सज्ज झाले 
जवळपास जाताच वाट मोकळी झाली
  

                              ~ विलास भोईर
                              ( धुक्यात हरवली वाट ) धुक्यात हरवली वाट #CalmingNature

Santosh Jangam

#lovefingers कविता "पाहीन वाट" #मराठीकविता

read more
mute video

Santosh Jangam

#Hope कविता "पाहीन वाट" #मराठीकविता

read more
mute video

बी.सोनवणे

वाट हरवली नाही रे दिसणार तुम्ही कधी संपवले सर्वच काही जगण्याची नाही उमेदी #alone

read more
वाट हरवली नाही रे 
दिसणार तुम्ही कधी, 
संपवले सर्वच काही 
जगण्याची नाही उमेदी...!

©बी.सोनवणे वाट हरवली नाही रे 
दिसणार तुम्ही कधी 
संपवले सर्वच काही 
जगण्याची नाही उमेदी

#alone

Rajendrakumar Shelke

का हरवली माणुसकी #poem

read more
*का माणुसकी हरवली..!*

*वर्णसंख्या(९/७/९/७)*
***************************
का हरवली माणुसकी
कळत नाही *खरे,*
स्वार्थासाठी सरसावले
ढोंगी पहा *चेहरे.*

मीपणात विसरून गेले
नात्यातील *अंतर,*
मनालाही कळले नाही
प्रेमातील ते *सार.*

आज कुठे देव राहिला
कोणालाही ना *कळे,*
माणसातील खरा भाव
सतत दूर *पळे.*

रक्ताची नाती खरंतर
फसवीच *निघाली,*
समोरासमोर देखील
खोटे बोलू *लागली.*

स्वतःच्याच त्या स्वार्थासाठी
माणुसकी *सोडली,*
आपलेपणात मनाची
व्यथा सारी *मांडली*

-----------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke का हरवली माणुसकी

RJ कैलास नाईक

माणसा माणसातील हरवली माणुसकी ....

read more
 माणसा माणसातील हरवली माणुसकी ....

Sujata Darekar

सुप्रभात मित्रानों आजचा नवीन विषय आहे कालच्या मिड नाईट पोयम ची एक ओळ, कधी हरवली वाट... #कधी #हरवली #वाट #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
कधी हरवली वाट धुक्यात
कधी हरवली कुशीत रे
गंध फुलांचा दरवळ होऊन
निजले स्वप्न उशीत रे

निळ्याशार डोळ्यांमधली
शाई सरसर गळू लागली
अन् स्पंदनांचे वेग कसे ते 
राहिले ना मुशीत रे

कुजबूज झाली अधरांची
गजबजले हे हृदय वेडे
आनंदल्या आज असंख्य
मनभावना खुशीत रे

रगडता हे देह ओले
वसंताची ती रम्य पहाट
प्रसन्न झुलती वादळ वारे
राहिले ना दुषीत रे

स्वच्छ भोर निरभ्र नभी
चांदण्या या खुलू लागल्या
आलावरच्या खळीमधूनी
सांगून गेल्या गुपीत रे सुप्रभात मित्रानों
आजचा नवीन विषय आहे
कालच्या मिड नाईट पोयम ची एक ओळ,
कधी हरवली वाट...
#कधी #हरवली #वाट 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

STREET WRITER

वाट.... #nojotophoto

read more
 वाट....

pratiksha's poem

वाट.. #Gif

read more
वाटतं असं सारख की इंद्रधनुसारखा येऊन सारं आयुष्य सावरशील..
हात हातात घेऊन स्वप्नांना रंग देशील..
नाही येणार तु कधी हे माहीत असुनही वाट तुझी पाहीन..
आणि वाटेवर तुझ्या नेहमीच नजर माझी राहीन... #gif वाट..

Amita Kolgaonkar Mirkute

वाट

read more
मनीची ही वाट सख्या
तुलाच येवून मिळते
कुठवर पाहू वाट तुझी
नभ धरणीला भेटून जाते वाट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile