Find the Latest Status about उद्याचा परिपाठ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उद्याचा परिपाठ.
gauri kulkarni
#ज्याचा त्याचा प्रश्न चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. #गौरीहर्षल ७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न
gauri kulkarni
#ज्याचा त्याचा प्रश्न फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. #गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न
Vasudev Dalvi
नाही तू त्याचा होतीस आणि नाही तू माझा आहेस नाही तू आत्ता ज्याचा आहे त्याचा आहेस
somnath gawade
# स्वप्नं उद्याची# आम्ही पाहत बसतो स्वप्नं उद्याची, महासत्ता होण्याची... आणि आमची तरुणांची येथली अवस्था ना नोकरी, ना धंदा बेरोजगारी आणि हालाकीची.. एकतर आम्ही स्वप्नं पाहणं बंद केलं पाहिजे किंवा स्वप्नं पाह्यला लावणारी कुचकामी यंत्रणातरी.... माथी भडकवायला टपलेली आहे येथे असंतुष्ट राजकारण्यांची टोळी असल्या अराजकतेतही ते संधी पाहत आहे स्वतःची भाजेल कशी पोळी तो झेंडा नको, त्या घोषणाही नको फक्त उदरनिर्वाहचं साधन द्या आई-बापाने पाहिलेली स्वप्नं साकार करण्याची संधी तेवढी मात्र द्या. वीट आलाय येथल्या भ्रष्ट व्यवस्थेचा म्हणून मी काही विट उचलणार नाही उचलायचीच असेल तर मी 'लेखनी' उचलेल कारण तिने डोकं न फुटता ते सुधारेल तरी. स्वप्नं उद्याची
yogesh atmaram ambawale
उद्याची चर्चा महत्त्वाची,ज्यात भविष्याची कास असते, भविष्य चांगले घडावे,सर्वांच्या मनी हीच आस असते. उद्या येईल हे सत्य,ह्यात काही शंका नाही, म्हणून आजचे काम उद्या करू,हे काही बरे नाही. उद्याची चर्चा व्हावी,पुढील आखणी ही व्हावी, पण उद्याच्या चर्चेत,आजची मेहनत व्यर्थ न जावी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची चर्चा... #उद्याचीचर्चा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y
उद्याचे हवामान
उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य ©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल
Archana Pol
ती स्वप्न उद्याचे जगते. ओठावर हसरे गाणे काळाच्या पडद्यावरती ती भविष्य रेखत जाते. राखेतुन पेटुन उठते ती होते भगवी ठिणगी ती विझल्या डोळ्यांमधल्या स्वप्नांना फुलवत जाते. सांजेला मावळताना ती मशाल घेते हाती ती आशा.. स्वप्न उद्याचे.. भाळावर मिरवत येते.. ©Archana Pol ती आशा.. स्वप्न उद्याचे
ѕαи∂ιρ ѕнιи∂є
डीयर प्रिये.... तू फक्त आज माझी रहा.. मी उद्याचा हट्ट धरणार नाही.... #NojotoQuote डीयर प्रिये.. तू फक्त आज माझी रहा.. मी उद्याचा हट्ट धरणार नाही....