Nojoto: Largest Storytelling Platform

New गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

    PopularLatestVideo

_suruchi_

नमस्कार शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आजचा विषय आहे गुरुवंदना... #गुरुवंदना #गुरुवंदना१ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गुरु महाराज, नितांत सुंदर
न बोलता ऐकती, स्वये विश्वम्बर

भेद हे मनी चे, मनाने जाणीले
मार्ग ही दाविलें, आई च्या मायेने

ध्यान हे करता हाती धारियेले
नित्यची दाविली तीर्थक्षेत्रे

हातासी धरुनि, विश्व ची दाविलें
अबोध बालकासी, दिले गुप्त ज्ञान

प्रेमी वाहियेले, पयावरी पुष्प
दाविले मजसी, शिव स्वरूप

एकांत तो आता,भंगला भंगला
चरणां वरी आता आत्माची वाहिला

मनाचे जाहले, सुंदर मंदिर
तेथे प्रेमे बैसविले, माझे गुरु महाराज
_suruchi_ नमस्कार
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आजचा विषय आहे
गुरुवंदना...
#गुरुवंदना 
#गुरुवंदना१

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आजचा विषय आहे गुरुवंदना... #गुरुवंदना #गुरुवंदना१ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more


हे गुरु तुझ्या आभाळात मी छोटे हे पाखरू |
मज दाही दिशा झेप , यश रहस्य गुरु  ||
निळ्या आकाशात इंद्रधनुष्याचे सात रंग |
शिष्याचा आयुष्यात ज्ञानाचे भरले बहुरंग ||१||

माता-पिता सम ज्ञान देत गुरु |
ज्ञानाचा कळसमुळे उत्तम आयुष्य सुरु ||
शिक्षकाचे शब्द कानी नेहमी येत आणि आयुष्य कळे  |
कठीण काळात मोकळे करतात शिक्षकाचा शब्दांचे मळे ||२||

गुरू शिष्य परंपरेचा आदर ,होई गुरु चरणी शिष्य नतमस्तक|
जीवनाचे पान उत्कृष्ट घडले, नवविचारांचे पुस्तक ||
प्रत्येक पाऊलावर नवे काही शिकत |
तर कधी पायाला ठेच लागत कधी चुकत ||३||

हारताना देखील जगणे शिकवले |
यशाचा  दरवाजापर्यंत मार्गक्रमण शिकवले ||
गुरुचरणी नेहमी नतमस्तक नेहमी |
गुरु मिळाले उत्कृष्ट जीवन सार्थक ||४||
-✍️काव्यशितल✍️





 नमस्कार
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आजचा विषय आहे
गुरुवंदना...
#गुरुवंदना 
#गुरुवंदना१

Rashmi Hule

नमस्कार शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आजचा विषय आहे गुरुवंदना... #गुरुवंदना #गुरुवंदना१ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व गुरूंना
ज्यांनी चांगले वाईट धडे दिले...
आणी ताई तुम्हाला, Yq दिदी, Yq Baba, 
जे रोज माझ्या विचारांना चालना देऊन
लिहिण्यास प्रोत्साहन देतात
त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻🤗😍😊 नमस्कार
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आजचा विषय आहे
गुरुवंदना...
#गुरुवंदना 
#गुरुवंदना१

DRx. Shital Gujar✍️

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #वसादेणारागुरू

read more
जगी जन्म झाला सार्थक |
मज गुरू कृपा लाभली ||
माझ्या गुरु चरणी नतमस्तक |
ज्ञानाची पेटी सदैव लाभली ||
✍️- काव्य शितल✍️ शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्म दिला ती आई महत्वाची,
पालन कर्ता बाप महत्वाचा,
शिक्षण दिले म्हणून शिक्षक (गुरूजी) महत्वाचे,
समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे.
ह्या प्रत्येकाने माझ्या जीवनात,
मला प्रत्येक वेळेस काही न काही शिकवण दिली.
शिकवण देणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरुसमान असते,
म्हणूनच ह्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गुरु...
#प्रियमाझेगुरु
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुरुपूर्णिमा #स्वरचितकाव्य #वसादेणारागुरू

read more
 सप्तसागराचा उदारू  पादुकाभ्यो साष्टांग नमो.....
 नितळ झरा जणु ब्रम्हांडाचा कैवारी.....
    श्वाच्या कणाकणाचा आधार ज्ञानाचा प्रखर प्रकाशी.....
चरणांत अवघे दर्शन झुकली माण त्या ह्रदयाची तळमळ बघुन.....
  ‌‌वसा ज्ञानाचा काढा पाजला आजचा दिवस दर्शनाचा, भाग्य अवघे उजळलेल्या मनाला.....
   पवित्रेचा रंगीत धागा शक्तीला आधार बांधलेला.....
कंगण ह्या हाताला जयघोष गुरू उत्सवाचा......
दैव शक्ती की लाभलेली तणु काया ज्ञानाचा झळकणारा दिवा.....
    कणांत शक्तींच्या गुरुचा ध्यास मना.....
अंधारी वाट जणु अडवलेली वेडी काया.....
          पाझर प्रकाशाचा कंदिल हाती गुरूचा......
ज्ञानाचे सप्तकोटी भांडार पाजळलेल हे प्रखर समयी.....
   ज्ञानाचे अमृत जसे ज्वालेचे सागर अवतरले......
ज्ञानाचा वसा अवघा पामर देहाला.....
       वाहतो ज्ञान पुष्प गुरूच्या ज्ञान चरणाला..... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

vaishali

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #वसादेणारागुरू

read more
माय बाप माझे  |  असे आद्य गुरू |
जीवन हे सुरू   |      तयामुळे    ||१||

धारूनिया बोट  |  शिकविला धडा |
संस्काराचा घडा |    दिला मज    ||२||

जगण्याचा मंत्र  |  बाप माझा देई  |
भार सारा घेई   |     डोईवर     ||३||

शिकताना गुरू  |  भेटले अनेक   |
दिले ज्ञान नेक   |    प्रत्येकाने    ||४||

नियतीने दिले    |   अनुभव धडे   |
सुटले ते कोडे    |      जीवनाचे   ||५||

पदोपदी मज     |   भेटले ते गुरु   |
कशी मी विसरू |    ऋण त्यांचे   ||६||

चरणी सर्वांच्या  |  झुकविते माथा  |
गुरुशिष्य गाथा   |      निरंतर     ||७|| शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

सरफिरी®

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी एक छोटंसं
चिमणीचं पिल्लू होते..
तुम्ही जीव फुंकला या पंखांमध्ये
एक गरूड घडवलात तुम्ही... सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गुरु...
#प्रियमाझेगुरु
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

somnath gawade

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्यात तुमच्याकडून खूप शिकायला मिळाले;
तुमची कृती नेहमीच उत्कृष्टपणाकडे झुकणारी, समोरच्याला समजून घेऊन समजाविण्याची कला, सर्वांशी सहजतेने केलेला मैत्रीपूर्ण संवाद, आणि बरेच उत्तम गुण......... तुमच्या व्यक्तिमत्वाचे 
अनेक पैलू प्रकाशित करतात आमच्या सारख्या नवशिक्या मंडळींचे आभाळ. सर, तुम्ही खरेच ग्रेट आहात. आपणास गुरुपौर्णिमेच्या मनस्वी शुभेच्छा💐💐💐 
 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गुरु...
#प्रियमाझेगुरु
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #yqtaai

read more

आकाशाला गवसणी घालायला शिकवणाऱ्या, माझा पंखांना बळ देणाऱ्या प्रत्येक क्षणाला शिकवणाऱ्या, माझ्या जीवनाला योग्य तो आकार देणाऱ्या, माझ्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या लहान-मोठ्या ,माझ्या सर्व परमपूजनीय गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे नेहमी मला मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा ,मी नेहमी तुमची ऋणी राहील.



🙏🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🙏
                                    -✍️Shital K. Guj@r
                                 



 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गुरु...
#प्रियमाझेगुरु
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile