Nojoto: Largest Storytelling Platform

New जाणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाणार.

    PopularLatestVideo

Mahesh Mali

जाणार्याला जाऊद्या #romanticmusic #मराठीविचार

read more
mute video

sandy

✍️ सँडीच्या लेखणीतून....वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट... #मराठीप्रेम

read more
❤️प्रेम किती प्रकारे होऊ शकतं?

१) शारिरीक प्रेम :- कोणत्याही पुरुषाची किंवा स्त्रीची शरिरयष्टी आवडली की, ती भोगण्याची लागणारी आस म्हणजे प्रेम. यात त्या पुरुषाला किंवा स्त्रीला फक्त ती शरिरयष्टी हवी असते. बाकी ती नक्की कोणाची आहे याच्याशी काहीच देणघेणं नसतं. कां? कारण, समोर येऊन गेलेली व्यक्ती ही फक्त काही क्षणांसाठीच दिसलेली असते आणि ते काही क्षण देखील पुरेसे ठरतात त्या व्यक्तीच्या शरिरयष्टीवर प्रेम करण्यासाठी. हे प्रेम थोडं जास्त आंधळ असतं आणि ते प्रत्येकाकडे असतं. दिसत्याक्षणी ती किंवा तो कसला मस्तच दिसतोय म्हणून आपसूक तोंडातून उद्गार निघणे म्हणजेच फक्त शरिरयष्टी बघीतली आणि पडलं प्रेमात. या प्रेमात एकदा मनसोक्त भोग भोगला की, शरीरातील इच्छा मरते आणि नवीन शरीराचा शोध सुरु होतो. त्यामुळे, हे प्रेम काही क्षणाचं असतं. हे कधीच दिर्घकाळ नाही चालत. 
२) मानसिक प्रेम :-  मानसिक म्हणजेच काय? तर, एखाद्याव्यक्तीचा स्वभाव आपल्याला आवडतो. तो/ती प्रामाणिक व हळव्या स्वभावाचा असतो. कधीच कुणाला फसवायचं नाही, दुखवायचं नाही, सगळ्यांना आपलंसं करून घ्यायचं. हे दिसायला अल्प असतं पण याची व्याप्ती फार मोठी असते. असं हे मानसिक किंवा स्वभावावर केलं गेलेलं प्रेम.
३) व्यक्तिमत्व प्रेम :- समोरील व्यक्तीचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं, खाण, पिणं अगदी प्रत्येक गोष्ट जी अतिशय सुंदर आणि नीटनेटकी असते. क्षणात ती व्यक्ती आपल्या मनाचा ठाव घेते. यात वरील शारिरीक प्रेम हे किंवा पहिल्या प्रथम शरिरयष्टी आवडणं ही गोष्ट आपण ग्राह्य धरून चालू. कारण, व्यक्ती दिसली तेव्हा तर तुम्हाला तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. नंतर जर ती व्यक्ती दिर्घकाळ तुमच्या नजरे समोर असेल तर तुम्हाला तिच्याबद्दल अजून जास्त जाणून घेण्याची संधी मिळते. यातूनच तुम्हाला ती व्यक्ती सगळ्यात ईतकी उजवी कां? याचं उत्तर मिळतं. तिचं शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे भाग असते. कारण, शिक्षणामुळे आणि त्या व्यक्तीवरील संस्कारामुळे ती ईतकी उजवी असते. याला आपण सर्वोत्तम व्यक्तिमत्व म्हणू शकतो. कारण, ते दिसतं, ते जाणवतं, ते जाणून व समजून तसेच आत्मसात करून घेण्याची इच्छा होते. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. अशा ह्या व्यक्तिरेखा असतात की, जितकं घ्याल तितकं कमीच. पण, अशा व्यक्तिरेखा किंवा सर्वोत्तम व्यक्तिमत्व कसं ओळखायचं? त्यासाठी आपण रत्नपारखी असणं गरजेचं असतं. इतकं ते सोप्प नसतं. ते जन्मतःच असावं लागतं. ते अस शिकून नाही येत. अशा व्यक्तिरेखा रोज रोज नाही मिळत. 
यात देखील दोन प्रकार असतात प्रेमाचे.
पहिल्या प्रकारात तुम्ही फक्त त्या लोकांच अनुकरण करण्याचा प्रयत्न करता. पण, ज्या व्यक्तीच अनुकरण करताय ती व्यक्ती नक्की कोण आहे हे देखील महत्वाच आहे. म्हणजेच, एक पुरुष हा एखाद्या पुरूषाच अनुकरण करत असेल तर काहीच हरकत नसते. पण, जर पुरुष स्त्रीच आणि स्त्री पुरूषाच असं असेल तर दोन भिन्न लिंग समोर आल्यामुळे तसेच ते जर एकमेकांच्या जास्त संपर्कात असल्यामुळे शारिरीक प्रेम देखील निर्माण होऊ शकतं. कारण, दोन वेगवेगळी ध्रुवं नेहमीच एकमेकांच्या दिशेने खेचली जातात आणि याला उपाय नसतो. हा निसर्गाचा नियमच आहे. 
हे निव्वळ एक प्रेम असतं दुसरं काहीच नसतं.
मला आवडणारं प्रेम हे तिसऱ्या म्हणजेच व्यक्तिमत्व प्रेम या कक्षेतील आहे. कारण, त्यात खुपकाही शिकायला मिळतं. खरंच जर प्रेम करण्याची इच्छा असेल तर हेच तिसऱ्या कक्षेतील प्रेम करावं.
यात धोका फक्त एकच असतो आणि तो म्हणजे तुम्हांला कधीच तुमच्या वयाच्या व्यक्तीबद्दल हे प्रेम निर्माण होणार नाही. नेहमीच ती व्यक्ती तुमच्या पेक्षा वयाने जास्त असणार पण सर्वोतम असणार.

🍁मन एक लेखणी

©Sandy Beher ✍️ सँडीच्या लेखणीतून....वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट...

sandy

✍️ सँडीच्या लेखणीतून...वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट... #मराठीविचार

read more
Depression म्हणजेच निराशा,
पण, निराशा म्हणजे नक्की काय? शाळेत असताना शब्दाची फोड करा शिकवलं जायचं तेव्हापासूनच या शब्दांचे अर्थ समजू लागले. निराशा म्हणजेच निरर्थक आशा. म्हणजे आपण आस तर लावतो पण, मनापासून नाही. म्हणजेच एखादी गोष्ट व्हावी असं वाटतं पण मनापासून नाही. आणि जे काम आपण मनापासून नाही करणार ते यशस्वी तरी कसे होणार? ते काम यशस्वी झाले नाही की मग आपण निराश होतो. 
आपण सर्वचजण काहींना काहीतरी काम करत असतो. कोणी गरज म्हणून तर कोणी आवड म्हणून. जे गरज म्हणून काम करतात त्यांनाच बहुतेक वेळा निराश हताश झाल्यासारखं वाटतं. ते काम उत्तम पद्धतीने करतात पण त्यातून समाधान नाही मिळत. आणि असमाधानी माणूस हा फक्त निराश हताश होऊ शकतो. सुरवातीला त्याचा फारसा त्रास नाही जाणवत पण जेव्हा आपण इतरांना आनंदी बघतो तेव्हा मात्र मत्सरापोटी हे नैराश्य अजून वाढतं. बराच काळ लोटून गेल्यानंतर आपण इतके निराश होतो की आता आर या पार. एकतर स्वत:ला संपवतो किंवा ज्यात आपलं मन रमेल असं एखादं काम शोधून ते करतो. 
सगळ्यांनाच यातून मार्ग काढायला नाही जमत. आणि जरी मार्ग काढून बाहेर पडलात तर तो शेवटचा असतो. कारण नंतर परत इतर कोणत्याही कारणामुळे जर परत नैराश्य आलं तर मात्र देवाच्या हाती. 
पण, असं कां होतं?
कारण एकच. जर आपल्याला सुरूवातीपासूनच संकटांना सामोरे जाण्याची सवय नसेल तर नैराश्य हे आपल्या आयुष्यात लिहून ठेवले आहे. पण जर आपल्याला संकटांना सामोरे जाण्याची सवय असेल तर नैराश्य काय असतं हे समजणार सुध्दा नाही. 
पण मग नैराश्य आल्यावर माणूस जीव देण्याचा विचार कां करतो?
स्वाभाविक आहे. नैराश्य म्हणजे संपूर्णपणे नकारात्मकता आणि जेव्हा संपूर्ण नकारात्मकता जवळ येते तेव्हा मनात फक्त वाईट विचार येतात आणि वाईट विचार हे कधीच चांगला मार्ग दाखवत नाही फक्त वाईट मार्गच दाखवतात. त्या क्षणी आपण संकटांपासून दुर पळण्याचा मार्ग शोधत असतो आणि जीव देणे हा सगळ्यात सोप्पा आणि जवळचा मार्ग वाटतो. 
अशा क्षणी काय करावं? 
आपले जे कोणी निकटवर्तीय असतील त्यांच्या सोबत रहावं. असे निकटवर्तीय फक्त आपल्या भल्याचा विचार करतील. आपला गैर फायदा नाही घेणार. आणि असे आपले निकटवर्तीय फक्त दोनच. एक आपले आई-वडील आणि दुसरें आपले जोडीदार नवरा-बायको. 
पण मग असं कां?
कारण, जर चुकून आपण काही वेडावाकडा विचार करून चुकीचं पाऊल उचललं तर फक्त तेच आपल्याला रोखू शकतात. कारण ते स्वत: पेक्षा जास्त आपला विचार करत असतात. 
LockDown मध्ये बरेच जण आयुष्य संपवत आहेत. तुमची निराशा इथे व्यक्त करा. बोलल्याने मन हलकं होतं आणि मार्ग निघण्याचा मार्ग खुला होतो. 

🍁मन एक लेखणी...

©Sandy Beher ✍️ सँडीच्या लेखणीतून...वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट...

sandy

✍️ सँडीच्या लेखणीतून...वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट #मराठीप्रेम

read more
🍁जीव झुरतो तुमच्या साठी🍁

स्वतःच्या जीवाला जपा स्वतः साठी नको  तर निदान आपल्या माणसांसाठी,
तुम्हाला तुमच आयुष्य स्वस्त झाल असेल कदाचित पण ध्यानात घ्या तुम्हीच असता तुमच्या माणसांच्या आधाराची काठी.

तुमच्या असण्याचा आधार वाटो न वाटो तुमच्या नसण्याच्या विचाराने पायाखालची जमीन सरते,
तुम्हाला कळत कसे नाही...? नाते म्हटले कि तुमच्या जीवासाठी समोरच्याचे मन किती झुरते.

तुम्हाला जपतो एवढं जीवापाड त्याची तुम्ही जरा तरी जाण ठेवा,
एक ठेच लागल्यावर आता तरी तुम्हाला जगण्याचा अर्थ कळायला हवा.

थोडस बदला स्वतःला आपल्या माणसांच्या सुखा साठी; डोळे उघडा आता स्वच्छंद जगण्यासाठी,
जपुया आपल्या जीवाला आणि घट्ट करु आपल्यातल्या रेशीम गाठी.

🍁मन एक लेखणी...

©Sandy Beher ✍️ सँडीच्या लेखणीतून...वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट

sandy

🍁मन एक लेखणीतून वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट #मराठीविचार

read more
विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणे चूक की बरोबर हे मला माहीत नाही पण लक्षात ठेवा तिच्या विश्वासाचा धागा कधी तोडू नका. तिच्या घरातील मोती कधी तोडू नका तिच्या भावना समजून घ्या‌ आणि तिचं दुःख जपा तिचं प्रेम शरीरासाठी नसतं तिला हवा असतं काही वेळ स्वतःसाठी काही शब्द माझ्यासाठी काही गोड तरंग माझ्यासाठी काही अस्पर्शित क्षण स्वतःसाठी काही सांगता येत नसलेले कोणीतरी ते ऐकण्यासाठी कोणालातरी ते शेअर करण्यासाठी...

🍁मन एक लेखणी

©Santosh Sandy kamble 🍁मन एक लेखणीतून वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट

roshan

येणार असशील तर ये जाणार असशील तर जा

read more
येणार असशील तर ये  जाणार असशील तर जा
गुढग्यावर बसून तुला मनवण
सांग शोभेल का मला?

पाण्याच नाही नाव
भाजीला नाही भाव
गोल्डनचा नेकलेस तुला सांग देऊ कसा?
सुकलीय विहीर
नदीचा नाही ठाव
 तुझ्या प्रेमसागरात सांग पोहू कसा?

येणार असशील तर ये  जाणार असशील.. तर जा

निर्जीव दगडा कडे
नेवेद्यच ताट न नेता
तुझ मागण त्याकडे मागू कसा
भावुक मी खूप आहे
तुझंच हृदयात रूप आहे
पाणी वाचवताना अश्रु वाया घालवू कसा?

गूढग्यावर बसून तुला मानवण
सांग शोभेल का मला?
येणार असशील तर ये जाणार असशील तर जा
---रोशन देसाई---
11/02/20 येणार असशील तर ये जाणार असशील तर जा

Komal Pardeshi

न जाणारा #सर्दी खोकला उपाय , #झटकन सर्दी #खोकला मोकळा , #sardi khokala #gharguti upay #मराठीसंस्कृति

read more
mute video

sandy

✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट ✍️ सँडीच्या लेखणीतून #मराठीप्रेम

read more
✍️ सँडीच्या लेखणीतून

©Santosh Sandy kamble ✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट
✍️ सँडीच्या लेखणीतून

sandy

✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट ✍️ सँडीच्या लेखणीतून #मराठीविचार

read more
✍️ सँडीच्या लेखणीतून

©Santosh Sandy kamble ✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट
✍️ सँडीच्या लेखणीतून

sandy

✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट ✍️ सँडीच्या लेखणीतून #मराठीप्रेम

read more
✍️ सँडीच्या लेखणीतून

©Santosh Sandy kamble ✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट
✍️ सँडीच्या लेखणीतून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile