Find the Latest Status about सकाळ पेपर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सकाळ पेपर.
yogesh atmaram ambawale
मला आज ही आठवतो तो शाळेचा पहिला दिवस, १ली इयत्तेपासून १० वि इयत्तेपर्यंत मला नेहमी सकाळचीच शाळा असायची, घरापासून साधारण १५/२० मिनिटाच्याआत मी शाळेत पोहोचायचो,तसा शाळेत मी एकटा कधी गेलोच नाही,नेहमी दादा (वडील) सोडायला यायचे, त्या वेळेस इतक्या प्रमाणत गाड्या नव्हत्या जितक्यायाआज आहेत,मस्त रस्त्यांनी चालत मजा करत जायचो. आमची शाळा म्हणजे एक चाळ होती,एक ऑफिस आणि तीन वर्ग,शाळेची चावी शाळेला लागून असलेल्या चाळीत एका काकांकडे राहायची. मला सर्वात अगोदर शाळेत पोहोचायचे सवय होती त्यामुळे शाळेत पोहोचल्यावर त्या काकांकडून चावी घेऊन वर्ग मीच उघडायचो. शाळेच्या पहिल्या दिवशी तर खूप वेगळाच आनंद यायचा नवीन मित्र क्वचितच असायचे, सर्व जुने मित्रच पास होऊन नवीन वर्गात यायचे, वर्ग उघडल्यावर सर्व फळ्यावर स्वागत किंवा सुविचार लिहायची जबाबदारी माझी असायची,वर्ग उघडून झाल्यावर ऑफिस साफ करायचा बहाणा करून मी ऑफिस मध्ये सकाळ पेपर यायचा तो वाचायचो आणि शब्द कोडे सोडावयचो कारण गुरुजी येण्यास २० मिनिटे तरी लागायची. खूप लिहायला आहे पण पाहिजे तितके आठवत नाही. राहून फक्त एकच गोष्ट सांगता येते, माझी शाळा मला खूप आवडायची आज ही आवडते आज ही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला मी न चुकता माझ्या शाळेत जातो. शाळा सोडून आज २६/२७ वर्षे झाली पण त्या वेळेस चे काही वर्गमित्र आज ही सोबत आहेत अधून-मधून आम्ही भेटतो सुध्दा, खूप आनंद होतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे 26 जुन. या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस असायचा. चला तर मग आजच्या या विषयावर लिहा. आणि तुमच
Saraswat Dev Mohit
जब भी किताबों से इश्क होता है कमब्ख्त फोन प्रपोज कर देता है ।। #पेपर
Shama patil sanghvi
रात्र सरली दिवस उगवला गत सारुनी सत्य प्रकटला आसवांना पापण्यांनी कवेत घेतले रुदनास अलिंगन ऋदयाने घातले .. प्रभा घेऊनी रविकर अवतरता सोनेरी शालूत शोभली धरतीमाता दवबिंदुनी पादस्पर्श हळुवार केले गार वाऱ्याने हळूच कुंतल सावरले .. भेटीत वसुधेच्या रवी झाला उतावीळ झोपेची चादर झटकून मीलनास व्याकूळ वाऱ्याची गाणी वृक्षवेलींनी गाईली ऐकून फुलेही सुगंधाने न्याहली.. इवलेसे मन प्रकृतीची पाहून लिलया विसरले सारी दु:खे अन् मोहमाया मागते मृत्यूनंतरचे जीवन असावे कोणासम हीच प्रकृती घ्यावी मलाही अणूरेणूच्या कणासम.. #सकाळ
Dileep Bhope
सकाळ झाली पाखरांचा चिवचिवाट रंगात येतो. डोळ्यावर झोप तरी उत्साह नवा झिंगाट होतो. ©Dileep Bhope सकाळ
Pushpraj Patil
क्षितिजापलिकडून या उगम सुर्याचा होत आहे पाहून हे दृश्य मज मना हर्ष ओसंडत आहे हळूच स्पर्श हा गार वाऱ्याचा या देहाला भासत आहे होई सकाळ प्रकाशमई नव्या पर्वाची, वसुंधरा वाट ही पहात आहे सुमधुर आवाज पक्ष्यांचे एक नवीन संगित देत आहे ऐकुन हे सुर नवे जणू कृष्ण बासरी वाजत आहे हिरव्या हिरव्या पिकावरी दव बिंदु मोती भासत आहे पाहून हे सौंदर्य सृष्टीचे मन बेधूंद गाणी गात आहे विसरुनी सारे अपयश कालचे एक नवी सुरुवात होत आहे सोडूनी घरटे मनुष्यराज एक नवी वाट शोधत आहे मिळेल यश तुज मानवा भास्कर ही साक्ष देत आहे होई सकाळ प्रकाशमई नव्या पर्वाची, वसुंधरा वाट ही पहात आहे #सकाळ
कवी दिपक सोनवणे
धुक्यांच्या सानिध्यात उगवलेली अशी ती रम्य सकाळ मनाला हारवून भारावून टाकणारी कित्येक जीवांच्या आशा आकांशा नवचेतना पल्लवीत करणारी सकाळ
VishakhaBorkar
Safar शुभ सकाळ सुंदर पर्वणीची प्रभात घेऊनी आनंदाची सुरुवात जावो दिवस तुमचा खास हीच मनी हळवी आस #शुभ सकाळ