Nojoto: Largest Storytelling Platform

New गझल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गझल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गझल.

    PopularLatestVideo

Shankar Kamble

विरहात चांदण्यांच्या गोंदणात दिसतेस तू
नाही म्हणू कशास दर्पणी त्या हसतेस तू

नांदलीस झोपडीत या हाव ना महालाची
महाल ही मग भग्न भासतो जेंव्हा नसतेस तू

सावलीच माझी झाली अंधार झेला यला हा
सांगितले मी उन्हाला त्यालाही पुरतेस तू

रांधलेस किती कष्ट झिजली अशी दिन राती
गंध केवडा हिरमुसला जेंव्हा खुलतेस तू

रापले हे हात तुझे माझ्या कमनशिबी झळाने
अंकुर पुन्हा नव्याने सूर्यात पेरलेस तू

©Shankar Kamble #गझल #गझले #गझलेची #तू #तू_आणि_मी #प्रेम #प्रेम #प्रेमकवि 

#FindingOneself

Shankar kamble

mute video

Shankar Kamble

*न केलेल्या गुन्ह्याची रोज शिक्षा भोगतो मी* 
 *देवून श्वास उसने मरणांस रोखतो मी* 

*सांगून गूज कानी अंधार पेटलेला*
*चेतवू नको स्मशाने राखेत शोधतो मी*

*डोळ्यांत दाटलेल्या सरी कैक शांत गहिऱ्या*
*बरसू नको अवेळी वळीवास सांगतो मी*

*संवाद साधण्याला प्रतिसाद सादास द्यावा*
*भाषा अबोल आहे मौनास जाणतो मी*

*मातीत पेरलेल्या अंकुरास धाप लागे*
*तोडून नाळ ओली प्राणास शिंपतो मी*

*पानांस गर्द हिरवा माखून साज रंग*
*भाळी उदास रेषा कुंकास रेखतो मी*

*लपेटून नशिबाच्या लक्तरात आयुष्याला*
*दोष कोणता ?कुणाचा? कोड्यात गुंततो मी*

*जपले उरांत त्यांनी कवटाळूनी घराला*
*केल्या उभ्याच भिंती दगडांस भांडतो मी*

©Shankar Kamble #Travel #गझल #गझलेची #जीवन #माणूस #जीवन #अनुभव #धोका

Shankar Kamble

....गझल....
सुकलेल्या पात्यास सांगा पावसाळे सरून गेले
कशास झुरणे आता अवेळी बेट ढगांचे दुरून गेले

सप्तरंगी इंद्रधनुला नजर लागली कशी कुणाची
गंध उडावा जसा अत्तरी रंग जीवनी विरून गेले

उमटलेल्या पायखुणांचा मागमूस ना आता उरावा
रिती करावी ओंजळ वाटे डोह मनाचे भरून गेले

चोरपावली सांज दाटते गडद गहिरी तरुतळी
भावनांचे रम्य पिसारे अलवार एकदा फिरून गेले

पुसू कुणाला प्रश्न किती ते उत्तरावीन जरी तिष्ठले
गूज मनींचे मनांस ठाऊक नजरेने ते कळून गेले

आणाभाका मधु प्रीतीच्या वचनांची ती पुन्हा उजळणी
शिंपले आता अमृत जरीही कोंब कोवळे मरून गेले

©Shankar Kamble #प्रेमकवि #विरह #गझल #मराठीशायरी #कवी #प्रेम #गझलेची 

#diary

पद्मवैखरी

एक गझल आस धरुनी... गझलेचा हा पहिलाच प्रयत्न #PoeticAntakshri

read more
mute video

Jaysing Gadekar

गझल-गाता गाता जाता यावे गझलकार जयसिंग गाडेकर 9970341646 #specialone

read more
mute video

Jairam Dhongade

का असा भाळतो? 

पाहता मी तुला का असा भाळतो?
वाटते आतुनी पार प्रेमाळतो! 

ओढ ती वाढली गंध वाटे नवा,
झिंगतो दंगतो रोज गंधाळतो! 

काय जादू अशी खास झाली बरे?
काम ते सोडुनी ठार झोपाळतो! 

छंद आता तुझा रातदिन लागला,
का कळेना मला फार चेकाळतो! 

होत जा लाडकी ठाव घे तू असा,
दे कळू 'जय' गझल खास हाताळतो!





 

® जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #गझल_जयराम

Nisha Dange

गझलेतून #Quote

read more
बोलू नकोस खोटे तू बोल सांत्वनांचे

कळतात अर्थ सारे डोळ्यात भावनांचे



निशा डांगे गझलेतून

Jairam Dhongade

डोळ्यातला इशारा पाहून गार झालो
सखये असा तुझ्या मी, प्रेमात ठार झालो! 

गजऱ्यास माळले तू संकेत मज कळाला,
करणार काय आता, उठलो नि स्वार झालो! 

आवड तुला कशाची मी जाणतो खरेतर,
नकली नको गळी तो, बघ मीच हार झालो! 

तू सांगतेस ते ते पुरवेल लाड सारे,
लाडात रोज येता, खासा तयार झालो! 

झोपेत काय भारी हे स्वप्न पाहिले मी,
खेकून तू उठवता, मी थंडगार झालो! 






® जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #गझलकार_जयराम

Jairam Dhongade

मित्रा! 

मित्रामुळेच आहे जगण्यात शान मित्रा,
कामात जोश अन् तो अंगात त्राण मित्रा! 

ती संकटे अताशा बिथरून पार गेली,
गोतावळ्यात असता नाहीच ताण मित्रा! 

मित्रात ठेवला ना मी भेदभाव काही,
सारेच यार माझे यारीत प्राण मित्रा! 

आहेत ते निराळे असतील मानभावी,
हाकेस धावणारी भारीच खाण मित्रा! 

हातात घेतलेल्या कामात जोड त्यांची,
लागेल ते कराया नाहीच वाण मित्रा! 

देवास पाहिले ना दिसणार तो कधीही,
त्यानेच हे बहूदा दिधलेय दान मित्रा! 

मित्राशिवाय जगणे हा घोर शाप वाटे,
सारे असून काही नसणार मान मित्रा! 

® जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #गझलकार_जयराम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile