Nojoto: Largest Storytelling Platform

New विजेचा लपंडाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विजेचा लपंडाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विजेचा लपंडाव.

Related Stories

    PopularLatestVideo
c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

आता तर वाटायला लागले होत पोस्टमन प्रेमात पडतो की काय आमच्या.... दुसर्‍या दिवशी निरोप मी शाळेत यायच्या आधी माझ्या बेंच मध्ये पोहोचलेला होता अब तो बस पोस्टमन भी इशारो मे बात कर रहा था. मला टास्क म्हणुन तिला Red rose द्यायचे होत. मी म्हंटले येवढंच ना मग काय त्यात. आता मीही तिच्या सारखं स्मार्टली काहीतरी करायचे ठरवले अणि thank god आता ह्या सगळ्या गोष्ठी मध्ये तिकडून पोस्टमन अणि इकडून राजा भागीदार होता. In short त्यादिवशी च्या मॅटर नंतर मी राजाला सगळी स्टोरी सांगितली होती. आता तिला बघताना मला ह्याला सांगायची गरज नव्हती मागे सर ती दिसत नाही मला म्हणुन. पुढच्या चिठ्ठी मध्ये मी तिला ही गोष्ट सांगितली. तीच काहीच नव्हते उलटे मला बोलली मला तर तुझ्याशिवाय काही दिसतच नाही. अरे ही साधा सुधा नाही डायरेक्ट अणूबाँब च फेकायची. मग काय मी तिला trap करायला सुरुवात केली त्याच दिवशी. तिला बोललो तुझ अभ्यासात अजिबात लक्ष नाही मला तुझ्या नोट books दाखव. तिला आयडिया पण नव्हती मग मी बोललो यार हे तु चांगले लिहिलाय आजच्या दिवस दे ही वही तुझी. उद्या देतो. नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता लपंडाव..

लपंडाव.. #story

12 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

खर तर आम्हाला एकमेकाला बघायची येवढी सवय झाली होती त्याच उदाहरण म्हणजे सकाळी प्रार्थना 5 वी ते 10 वी सगळ्यांची एकत्र असायची त्यावेळी त्या लाइन मध्ये उभे राहताना पण आम्ही असे रहायचो की एकमेकाला दिसलो पाहिजे आता तुम्ही म्हणाल काय हे पण setting असच होत. त्यानंतर एक अतिविशेष कार्यक्रम असायचा म्हणजे कोणीतरी येवून न्यूज पेपर मधील दिनविशेष वाचून दाखवायचे. आता यायचे कोणी हे volunteer होत मग मी आठवड्यातील 7 दिवस मीच का तर इकडून तिकडून बघणापेक्षा समोरूनच हल्ला केलेला बरा. माझ लक्ष्य फक्त एका विशेष कडे असायच नशीब त्यानंतर कोणी कधी विचारले नाही की काय विशेष होत नाहीतर नाव तिचेच घेतले असते. आता चाचणी परीक्षेची नोटिस पण मीच वाचून दाखवली. इकडे ही परीक्षा अणि तिकडे ती परीक्षा....पण काहीही असो मी आता तयार होतो कोणताही हल्ला झेलायला.. 😬😬 लपंडाव..

लपंडाव.. #story

11 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

आपण खरच किती अनभिज्ञ असतो ना त्या काळात आपल्याला खरोखर माहीतच नसते सांगणारे खूप जण असतात. शाळेचे जे अंगण सोडून आपल्याला कॉलेज च्या आकाशात झेपवायची इतकी ओढ झालेली असते की आपण खूप गोष्ठी नकळत सोडून देतो. मला कोणीतरी बोलले होते आयुष्याचा रस्त्यावर 10 वी, 12 वी अणि लग्न ह्या तीन ठिकाणी जर गाडी नीट वळली तर पुढे कुठेही अपघात होण्याचा चान्स नसतो. ते खरोखर पटले आता. माझी शाळा ही खेड्यातली होती. ते जग इतके छोटे अणि सुंदर होत की आता वाटले उगाच पुढे आलो. सहज एकदा गेलोही होतो शाळेत तेव्हा पाहिले तर बाक बदलली आहेत जरा चांगल्या डिझाईन ची होती चेहरे पण वेगळे होते आता काळानुसार सगळे बदलतेच पण माझ्या आठवणी अजून आहेत तिथेच त्या बाकावर करकटकने ओरबडलेले नाव बघितली अणि पाणी तरळले डोळ्यात. तो माझा वर्ग मी अणि माझे मित्र तिथेच बसलो होतो तोच दंगा चालू होता अणि हो ती पण तशीच नेहमी प्रमाणे माझ्याकडे बघत होती.. लपंडाव

लपंडाव #story

12 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

आता थोड दुसर्‍या भागाकडे वळूया म्हणजे ग्रुप ग्रुप थोडक्यात ही आमची पार्टी ती त्यांची पार्टी. Unusual असे असतेच प्रत्येक शाळेत वर्गात in short दोन ग्रुप असतातच. आता exactly माहीत नाही पण इथे वेगळी परिस्थिती होती. त्याचे स्तर वेगळे होते. म्हणजे एक ग्रुप असा की जो वर्ग शिक्षकांच आवडता ग्रुप म्हणजे त्यातली गँग नेहमी पुढे पुढे करणारी होती. काहीही असो त्यांनी बोलले की हे लोक होच बोलणार अणि बाकीच्यांच प्रॉब्लेम होणार एक ही गोष्ट पक्की होती. परत एक गँग म्हणजे टवाळ अणि हुशार. तसच काही एका आळीचे अणि काही दुसर्‍या आळीचे ह्यावरून पण तयार झाले होते. अजून छोट्या छोट्या अश्या गँग ग्रुप अणि थोडक्यात काय तर प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या स्ट्राँग नेटवर्क मध्ये असणार्‍या नेटवर्क बरोबर सेट होते. लपंडाव

लपंडाव #story

9 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

मी कोणी लेखक वैगेरे नाही पण कदाचित मी पण ह्या सगळ्या टप्प्यातून निघून गेलोय हा फक्त अनुभव शेअर करतोय असे समजा. एक नवीन दिशा एका नवीन पद्धतीने विचार केला म्हणुन फक्त सांगतोय. शेवटी नात्यांमधे प्रेम किती हे महत्त्वाचे असते मग ते कोणताही असो. आपण नकळत इतके selfish झालोय त्यात मी पण आहे की आता आपण फक्त फायदा बघतो प्रत्येक relation मध्ये. ह्याच एक उत्तम उपरोधिक उदाहरण म्हणजे आजकाल बॅंका मध्ये Relation manager केलेत ग्राहकांच्या सोयीसाठी. आपण खरोखर ग्राहक झालोय का प्रत्येक relation indirectly manage करतोय आपण. खरच तुम्ही पण शोधा उत्तर ह्याच अणि वाटले तर मला तुमच मत पण शेअर करा. आता राहता राहिले तर जे खरे मित्र असतिल ना तेच तुमच्या बरोबर शेवट पर्यंत राहतील अणि त्या पण पलीकडे असतात काही नाती अशी जी सांगता येत नाहीत पण असतात बरोबर तुमच्या. पण तुमचा अनुभव नक्की सांगा.. लपंडाव..

लपंडाव.. #story

13 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

फायनली आमच्या चाचणी परीक्षा झाल्या होत्या. ह्या वेळी किती मार्क पडणार होते माहित नाही कारण पण तसच होत. शेवटी काय तर बर्‍यापैकी ह्यातून निसटून पण गेलो म्हणजे ठिकठाक पास झालो होतो. आता परत काय तर ह्यावेळी काही नव्हते अणि मी तिच्या उत्तराची नेहमी प्रमाणे वाट बघत होतो. दुसर्‍याच दिवशी मला उत्तर आले ना चिठ्ठी मधून 
"ये इट का जवाब पत्थर जो से जो दिया हे हमे दिल से पसंत आया हे,
कोई तो हे जिस ने हम से टकराने का दिल दिखाया हे... Impressed
आता काय तर मोका बघून मी तिला परत साफ साफ लिहले होत
I Love U...🥀 लपंडाव...

लपंडाव... #story

11 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

आता हे कोड सोडवणे म्हणजे पण एक कोड होत. काय नक्की होत हे मला काही केल्या कळत नव्हते. आता  मी एका माणसाची मदत घ्यायची ठरवले होत अणि त्याप्रमाणे मी आमच्या पोस्टमन ला side ला घेवून मला ह्याच उत्तर सांग किवा नक्की तिच्या मनात काय चाललय येवढे सांग म्हणुन खुप request केली. पण काय उपयोग नाही झाला हे असे होत की बुडत्याला काडीचा आधार. त्यावेळी मोबाईल नव्ह्ते ते एक बरं झाल नाहीतर ही मजा कधी अनुभवता आली नसती. आता माझा संयम संपला अणि मी हार मान्य केली. अणि तिला दोन ओळीत विचारले कोणत्याही एका प्रश्नाच उत्तर दे नाहीतर माझ जगणे तुझ्या शिवाय अवघड होवून बसलाय. कशी का होईना मला बोलली उद्या सांगते तुला... लपंडाव..

लपंडाव.. #story

9 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

ती पटकन माझ्या जवळ आली अणि आमची दोन ओळींची जी पत्रकारिता होती त्या स्टाइल मध्ये माझा हात एका हातात घेवून बोलुन निघून गेली...


इतनी जल्दी मिल जायेगा जवाब ये सोचा भी कैसे आपने,
ये इश्क का सफर हे साजन जी चलने दो ना इसे धीरे धीरे... लपंडाव..

लपंडाव.. #story

14 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

दुसरा दिवस पण प्रश्ण उत्तरांचा होईल असे वाटले नव्हते. तिने एक इशारा केला अणि आम्ही एकमेकाकडे बघायला सुरुवात केली. पण थोड्या वेळातच सरांच्या लक्ष्यात आले अणि तिला खडू मारला अणि उभे केल. पहिला प्रश्ण इतका वेळ माग वळून काय बघत होती? उत्तर सर माझ काहीतरी खूप महत्त्वाचे हरवले आहे. दुसरा प्रश्ण - असे काय हरवलाय ते मोठ्या आवाजात सांग म्हणजे सगळे मिळून शोधू. आता बोला काय बोलायचे? पण ह्या महाराणी चा confidence सातवे आसमान पण होता. म्हणाली ते सगळ्यांना नाही सांगता येणार. तिसरा प्रश्ण - मग मला सांग आता जे उत्तर गालाला एक नकारार्थी झटका मारून जे दिल. तुम्हाला नाही कळणार सर राहू द्या.... लपंडाव..

लपंडाव.. #story

8 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

खडू मारला होता तिला पण लागला होता मला त्या नादात पैज तर मीच हरली होती. आता काय तर कोणाला कळो ना कळो पण राजाला आमचे competition लक्षात आले होत. आता मांजराला वाटत होत आपण डोळे झाकून दूध पितोय तर कोणी बघत नाही. म्हणजे असेही काही नव्हते पण आता ह्या स्टोरी मधील काही नवीन पात्रांची मी ओळख करून देतो. आता हा राजा कोण? प्रश्ण पडला असेल तुम्हाला तर राजा म्हणजे माझा दहावीतला बेंच friend. आता आम्ही दोघ एका बेंच वर बसायची पण कथा आहे. राजा म्हणजे त्या काळातला आमच्या शाळेतला गुंड विद्यार्थी (सगळे सर म्हणायचे). होत पण तसच. आता ह्याचा अणि माझा 10 वी च्या आधी कधी ही संबंध नव्हता. हा गुंड अणि मी हुशार असे करून एक कॉम्बिनेशन आमच्या क्लास टीचर नी तयार केल अणि त्याला माझ्या शेजारी बसवला. सुरुवातीला दोघानाही अवघड जागेच दुखणे झाल होत. आता बास पुढे सांगेन आमची येवढी चांगली मैत्री का झाली ते पन. इथे टेंशन पैज हरली त्याच होत... लपंडाव

लपंडाव #story

10 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

आता बारी वर्गातल्या चॉकलेट बॉय ची. सचिन म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन होत. मस्त macho body दिसायला गोरा पान, muscles तर विचारू नका hair स्टाइल पण म्हणजे केसांचा भांग हा नेहमी हवेच्या उलट्या दिशेलाच पाडलेला असनार अणि चालायचा रुबाब तर बोलूच नका ह्याने किती पोरींना घायाळ केल ते माहित नाही पण एकीने पूर्ण विकेट घेतली होती ह्याची. दुसरे म्हणजे 24 hr मेक अप रेडी असणार ह्याचे ती लांबून जरी येताना दिसली तरी ह्याच्या वरच्या खिशातील पावडर  लगेच लावून instant रेडी होणार. पण असा कोणीतरी असावाच ना ग्रुप मध्ये तसा हा एक body builder back up होत. उद्या कोणी आलेच तर आपला सचिन होताच. अणि सचिन अजून ही macho man च kam करतोय आता तर Jr macho man पण आलाय. जोडी फिट आहे. पण कधीही बोलवले अगदी तुम्ही emergency म्हणुन ambulance बोलावली तरी सचिन आधी येणार येवढी खात्री असणारा अणि येणारा.. लपंडाव..

लपंडाव.. #story

9 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

प्रशांत - नावाप्रमाणे हा खूप शांत अगदी पहिल्या पासून. हा पण ह्या आमच्या  गावच्या Oxford university मध्ये शिकायला आला होता. मला तर वाटायचा हा म्हणजे लाजाळूच झाड होत आमच्या वर्गातील पण आता नाही. आता झाड लाजतील ह्याला आता पूर्ण बदलला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचे तर आहे ना. वर्गातील अतिशय सुंदर मुलीने आमच्या समोर बोलली होती तू खूप आवडतो मला अणि ह्याच्या गालाला असा एक नाजूक चिमटा घटला अणि तेवढा लाजला की म्हणाला तस काही नसते. आता सांगा आहे की नाही लाजाळू च झाड. सॉरी म्हणजे त्यावेळचे म्हणतोय आता खरोखर तो पण त्या मुलीला शोधतोय. पण कधीही बोलावले तर हा नाही म्हणणार नाही पण त्या वेळी का नाही म्हणाला त्यालाच माहीत. लपंडाव

लपंडाव #story

7 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

वामन - आता ह्याच नाव म्हणजे देवाचेच की नाव वर्गातील उच्च कोटीचे जे तीन चार सज्जन मूल होती त्यापैकी हा एक. पण ह्याचा एक वेगळा टॅलेंट कालानुरूप समोर आला आमच्या. मग मला वाटले हा भूगर्भशास्त्रज्ञ का नाही झाला? ह्याला ज्या खालच्या गोष्ठी दिसायच्या त्या कोणालाच दिसायचा नाहीत. थोडक्यात काय तर हा मैदानावर जरी बसला असला तरी तो स्टाफ रूम मधील कोणाची पँट वैगेरे फाटली असेल तरी सांगू शकेल येवढी भेदक नजर. आज फक्त बायकोला घाबरतो म्हणुन नाहीतर हा नक्की नासा मध्ये कोणाचे कुठे काय दिसतय हे बघण्याचा काम नक्की करत असता. लपंडाव..

लपंडाव.. #story

7 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

गुरुवार चा रंगीत ड्रेस असायचा शाळेत. सगळे कसे एकदम झाकपाक दिसायचे. एकदम कलर फुल दिसायचे समोरून बघितले तर. मी त्या दिवशी हमखास ते दिनविशेष वाचायला जायचो अणि सगळ्यात चांगले कोण दिसणार दुसरे मला म्हणुन फक्त. ना कसली फॅशन त्यावेळी ना कसला ट्रेंड ना कसला हॅश टॅग. खर सांगायचे तर किती फालतू जगात आहोत आपण. किती साध सरळ होत जीवन नाही त्या भानगडी करून बसलोय. खरा कलर तर गावातल्या त्या डोंगराचा, तिने मळलेल्या गुलाबाच्या फुलाचा, काळ्या फळ्यावर हिरव्या कलर ने लिहिलेल्या "सुविचार " ह्या शब्दाचा. खर तर गुरुवार नेहमीच विशेष वाटायचा कारण त्याच दिवशी ती मस्त अश्या तिच्या गुलाबी ड्रेस मध्ये यायची अणि अजूनच सुंदर दिसायची. खर तर एकदा सांगायचे होत तिला की ह्या ड्रेस वर ती मला एकदम माधुरी दीक्षित वाटायची. राहिले ते पन नाही सांगता आले. आता मात्र त्या गुरुवार ची फक्त आठवण आहे. कलर वैगेरे म्हणाल तर आता काही वाटतच नाही... लपंडाव

लपंडाव #कहानी

3 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

प्यार का पहला खत लिखने मे वक्त तो लगता हे,
नये परींदो को उडने मे वक्त तो लगता हे,
जिस्म की बात नही थी उनके दिल तक जाना था,
लंबी दूरी तय करने मे वक्त तो लगता हे..
ही जादू शब्दांची ही जादू गजल सम्राट जगजीतसिंहाची पण. ही गजल ज्याने ऐकली नसेल त्याच जगणे व्यर्थ म्हंटलं पाहिजे. पण गजल अणि हे त्यावेळी ना माहीत होत ना त्याचा येवढा अर्थ माहीत होता. होत ते फक्त दोघांच एकमेकावर प्रेम जे आमच्या दोघांच्या व्याख्या मधील. असो पण पहिले प्रेम पत्र खरच अवघड असते लिहायला अणि ते त्या व्यक्तिला द्यायला. म्हणजे आजकाल काय राहिल नाही मी सांगतोय ती गोष्ट आहे 2002 ची त्यावेळी तरीपण ठीक होत हे टेंशन होत खरोखर आजच्या सारखे नाही 3 massge मध्ये स्टोरी संपली. आता तो दगड आजही लक्ष्यात आहे म्हणण्या पेक्षा ते जे लिखाण होत दगडाने  दगडावरती लिहलेली... Can u people imagine that letter of love written with stone. असे म्हणतात की लोग पत्थर दिल होते हे. पण आमची दिल की स्टोरी ही पत्थर पे लिखी थी.. लपंडाव

लपंडाव #story

17 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

तिने लिहिलेल्या दोन ओळी किती जबरदस्त होत्या माझ्यासाठी तसही आपल्या आवडत्या व्यक्तींची प्रत्येक गोष्ट आवडतेच ना आपल्याला.
"पत्थर की लकीर हो या लकीरो का पत्थर,
हम तो आपके हे कल भी आज भी और जिंदगी भर". तिच्यामुळे शाळेत जायची येवढी सवय झाली होती की घरातल्यांना पण doubt झाला होता की मी नक्की शाळेतच जातो का? ही स्टोरी फक्त प्रेमाची आहे. प्रेम प्रत्येकाचे दोघांचे, मित्रांचे अणि शाळेचे. आता ह्याच काय उत्तर द्यायचे त्यापेक्षा मी किती स्पेशल होतो तिच्यासाठी ही feeling ch खूप प्रेमळ होती. सगळ्यानी feel केली असेलच. आताची जी race आहे त्यापेक्षा मला त्यावेळी शाळेत येतानाची रेस खूप भारी वाटते. हे विसरून कस चालेल प्रेम तर सगळ्याच लोकाना होत. आता माझ्या सारखीच सगळ्यांची स्टोरी होती त्यावेळी फक्त एकमेकाला न सांगता गुपचूप चालू होत. सगळीच मांजरे होती डोळे झाकून दूध पिणारी जस की कोणीच कोणाला बघत नव्हते... लपंडाव

लपंडाव #story

12 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

"आसान बहोत हे बाते करना
निभा सके तो मानू तेरा कहना"
  बस हे माझ उत्तर होत तिला तिने लिहिलेल्या त्या पत्राला. आता ह्या सगळ्या गडबडीत आमचे लक्ष गेल नाही ते म्हणजे अर्जुन च्या नावाने लिहलेली एक चिठ्ठी कोणीतरी त्याच्या आवडत्या मुलीच्या दफ्तरात ठेवली होती अणि ती येवढी शहाणी निघाली की तिने ती त्याला परत माघारी दिली होती. No pain no gain. पण हा मान्य करायला तयार नव्हता त्यान लिहिलय म्हणुन. खर की खोट ते जावू द्या कोणाची आयडिया होती की अर्जुनाचा स्वतःचा मारलेला बाण होता हे प्रकरण चर्चेत आले होत. कधी कधी bad publicity कामाला येते तसाच काहीतरी पण त्याच्या फायदाच झाला होता. ती खरोखर आता भिडू लागली होती अणि योगायोग म्हणजे तो राहत होता त्याच रस्त्याला तीच घर होता मग काय होणार येता जाता तिने पण मागे वळून बघायला सुरुवात तर केली होती लपंडाव..

लपंडाव.. #story

11 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

"बैलपोळा" किंवा "बेंदुर "
आजकाल च्या भाषेत सांगायचे झाल तर "बैल डे" म्हणा हव तर. ह्याची किती excitement असायची हे शब्दांत सांगायचे आता तर खूप अवघड आहे. 2 बैल आमच्याही घरी होते. शेतकर्‍याची गाडी खरोखरच पार लावत ही बैल. पेरणीचा येवढा रगडा असतो की त्यांना खरोखर एक दिवस आराम तर दिलाच पाहिजे. किती प्रेम आणि काळजी असते त्यांची ही गोष्ट दाखवू तर नाही शकत पण व्यक्त करायला एक संधी असते. आदल्या रात्री पासूनच खर सुरुवात व्हायची खांदा मळण्यापासून. अरे दुसर्‍या दिवशी एकदम पहाटे पहाटे त्यांना शाही आंघोळ डोंगराकडेच्या तलावात. एक स्पेशल lifebuoy च्या साबणाने ते पन. पांढरी शुभ्र धुवून निघायची  जोडी एकदम. तिथून घरी गेल्यावर मात्र टेंशन की गोठ्यात खाली बसला तर परत कस धुणार ह्याच अंग खराब करून घेतले तर. मग त्यांची रंग रंगोटी. अंगावर उठवलेले छाप तर एकदम बघण्यासारखे असायचे. झूल अंगावर टाकल्या नंतर तर नाद खुळा. सगळ्यात राडेबाज भाग म्हणजे त्यांची मिरवणूक. प्रत्येक आळीची एक वेगळी शान असायची. त्याच्यावरून होणारी भांडणे पण मजेदार असायची. ह्या सगळ्यात 2 - 3 बेवडे असणारच अणि त्यांचा स्पेशल नागिन डान्स शिवाय तर मिरवणूक पूर्णच होवू शकत नाही. गावातील देवापुढे त्यांना बुजवण्यासाठी जी मजा होती ती काही औरच. ते सगळे झाल की एक फोटोग्राफी चा सेशन्स पण असायचा. ते फॅमिली फोटो खरे जबरदस्त होते. ती खरी complete फॅमिली होती.... लपंडाव

लपंडाव #story

12 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

प्रेम आपले राहून गेलाय आपल्या दोघांच्या डोळ्यात जेव्हा भेटशील तेव्हा तुझ्या नजरेतून मला दिसेल ते. राहिले होत त्यावेळी सगळच बोलायचे सांगायचे व्यक्त करायचे. होत नव्हते धाडस खरोखर त्यामुळे. खूप भीती होती तुला गमावून बसण्याची अणि त्यापेक्षा जास्त तर समजा तू बोललीच नाहीस तर याची. कळत होत सगळे दोघांनाही हे मला त्यावेळी ही माहित होत आज किती वर्षानंतर ती भेटली अणि वाटले आता बोलुया पण आज तर आणखी टेंशन होत आता काय सांगून उपयोग? पण आज मी धाडस केल अणि सांगितले एकदाच आता तिचे उत्तर काय असेल? खूप छान बोलून निघून गेली ती बोलली राहू दे ना आपले प्रेम जस होत तस नको बांधायला ह्या छोट्या शब्दात ते होत आहे अणि राहील पण फक्त तुझ्यावरती... लपंडाव

लपंडाव #story

12 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

तुझ्या नजरेत राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे होती खरी पण खरच त्याची उत्तरे आपल्याला आता हवी आहेत का? आपली भेट होणे खरच योगायोग होता की खरच आपण भेटाव हे त्याच्याही मनात होत? पण आता तरी तू बोलावसं वाटत होत मला, तुझ अवघडून जाणे अणि न सांगता येण दिसत होत मला तरीपण तू सांगाव वाटत होत मला, ज्या पण वेळी आपण भेटतो तू तशीच आठवतेस मला शाळेच्या ड्रेस  मधली. शेवटी मी बोललोच की आता तरी सांगशील का किती प्रेम होत तुझ माझ्यावर? थोडा उसंत घेवून बोलली अरे मी नाही बांधू शकत त्याला एका शब्दात... 'प्रेम ' लपंडाव...

लपंडाव... #story

9 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

देवाने अचानक येवून विचारले सांग तुला काय पाहिजे जे मागशील ते देणार? मी थोडा वेळ विचार केला. गोंधळून गेलो होतो ना एकदम अचानक काय सांगायचे मग मी सांगितले न संपणारी एक भेट हवी आहे तिच्या सोबत, आता तो गोंधळला तरी पण तथास्तू बोलून निघून गेला मग काय ती अणि मी त्या झाडाखाली होतो, पहात होतो एकमेकाला अणि अचानक काय तर ती मला बोलली मी आज तुझ्या आवडीचा काहीतरी घेवून आलीय, अरे हिला कस माहीत मला काय आवडते ते? बघितले तर काय ते कॉफी बाइट च चॉकलेट (आमच्या वेळेच) मग काय तर एकसाथ 2 दिली मला अणि बोलली आज हे अणि उद्या ते खायचे. अरे काय हे? मी घरी जाताना ते उघडले तर त्या आतल्या कागदावरती ILU लिहले होत. आता परत एकदा मी हवेत होतो दुसर्‍या दिवशी मीही ILU लिहून दिले तिला ते चॉकलेट तिने ते तिथेच उघडले अणि मग काय सांगू आता मला कोणीतरी झोपेतून उठवले......... लपंडाव

लपंडाव #story

13 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

आज गोष्ट सचिन ची...
हा जरा जास्तच रोमँटिक अगदी पाहिल्या पासून. तिच्यासाठी खिशात powder ठेवायचा तेव्हापासुन ते आता काही दिवसांपूर्वी आम्ही तिच्या घरी गेलो होतो तिथ पर्यंत. पोरगा मनाने वाईट नव्हते पण त्या महेश च्या नादी लागले तेव्हापासुन बिघडले म्हणजे शेवटी वर्गात नाही पण एका आळीतले असल्या मुळे शाळा सुटल्या नंतर ह्यांच सूत जरा जास्तच जुळायचे. खैर ती तेव्हाची गोष्ट पण अजूनही आहेत दोघ तशीच. आपण बोलतो की काही गोष्ठी काळानुसार बदलतात पण हे दोघ फक्त अंगापिंडाने बदलले बाकी तो दहावी मधला virus अजून आहे ह्यांच्यात अगदी जसाच्या तसा. सचिन वर त्यावेळी एका व्यक्तीचा खूप प्रभाव होता त्याच नाव नाही सांगत पण अक्षरशः एकलव्य होता तो त्याचा. त्याने जे पण सांगितले ह्याने तंतोतंत ऐकले. असते कधी कधी नशीब खराब. त्याला ह्याच्याकडून काहीही काम करून घ्याच असले की तो फक्त एकच वाक्य बोलणार - ये सच्या ती फक्त तुझ्याकडेच बघते अणि तीच फक्त तुझ्यावर प्रेम आहे. येवढाच काय ती काल रस्त्याने चालली होती अणि सहज ओरडलो सचिन तर तिने लगेच वळून बघितले. आता काय आले ना ह्याच्या अंगात सात हत्तीच बळ..... लपंडाव..

लपंडाव.. #story

9 Love

54650b62f83d5a4515717fc25bcbeb00

Alewar A

अठवणी चा सागर ओसरून येतो..
थकलेल्या, कोरड्या मनाला सुखाचा गारवा देवून जातो...
क्षण हे रुसतात..क्षण हे हसतात...
क्षणात गोडवा...क्षणात रुसवा कधी..
कोणी ही न् जाणे संपणार लपंडावचा हा खेळ कधी...! लपंडाव

लपंडाव #thought

26 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

आज विचार केला तर वाटते अरे काय ही स्पर्धा चाललील अरे का धावतोय आपण सगळे? कुठे थांबायचे एकमेकाच्या पुढे जावून? बर कोण येणार पहिला? ह्याची खरच काही उत्तर नाहीत बघायला गेल तर. जगणे महत्त्वाचे की स्पर्धा? म्हणुन मग आता ह्या धावपळीत मी ते क्षण आठवतो अणि मला जगण्याचा अर्थ सापडतो. त्यावेळी कसा विचार यायचा मग आता नक्की जास्त शिकून आपण mature होतो की आपण जगायचा अर्थ कमी करत जातो. जबाबदारी नोकरी family सगळे ठीक आहे पण ह्या सर्वात आपण हे का विसरून जातो. पण मला personally एकच कळले ज्या शाळेने तुम्हाला शिकवले ना त्याच शाळेत तुम्ही परत परत जा. शेवटी शाळाच ती खाली हात नही तो कभी नही भेजेगी. आज मी ह्यावर लिहतोय ह्याच कारण पण हेच की आता जीवघेणी स्पर्धा आहे ह्यात जर खरोखर टिकायचे असेल तर फक्त शाळेला विसरू नका. मी लॉजिक लावतोय खर पण शेवटी ज्याला पटेल नाही पटेल तो ज्याचा त्याचा प्रश्ण.. नाही का? लपंडाव

लपंडाव #story

9 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

हे सगळे चालू असताना अचानक पावसाने धडक दिली. भयाण गरमी ने वैतागलेल्या लोकाना सुखाचा दिलासा भेटला. अर्थातच पहिला पाऊस हा कायमच सुखावह असतो, आठवणी जागा करणारा असतो. तो मातीचा सुगंध हा जगातल्या कोणत्याही अत्तरापेक्षाही सुगंधी असतो. वातावरण एकदम रोमँटिक झाल होत. शाळा, पहिला पाऊस, मातीचा सुगंध, गावातले हिरवेगार डोंगर हे जगातले most beautiful deadly combination असते. खर ना? जिकडे तिकडे शेतीच्या कामांना वेग आला होता. तेच खड्डे पडलेले गावातले रस्ते पुन्हा नव्याने पावसाच्या पाण्याने भरलेले होते. शेवटी गावातले विद्यार्थी काही झाल तरी त्यामुळे थोडा focus आता पेरणीच्या कामावर शिफ्ट झाला होता. सगळेच आपापल्या शेतात काम करण्यात गुंग झाले होते. मग ह्यातच बर्‍याच दांड्या पडायला लागल्या होत्या माझ्या मित्रांच्या पण दुनिया से परे आम्ही दोघ मात्र न चुकता शाळेत येते होतो. जस जसा पावसाचा जोर वाढत होता तसा इकडे प्रेमाचा बहर पण वाढत होता... लपंडाव

लपंडाव #story

14 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

तुम्हाला कोणाला आठवताय का की तुमच्या आयुष्यातील पहिली शायरी तुम्ही कधी ऐकली होती. माझ्या आयुष्यातला हा तो दिवस होता. मला खर तर माहित नव्हते पण तिला सगळे माहित असायचे कस काय ते माहित नाही.   मला कोणी विचारले ना की ह्या जगात सगळ्यात जास्त चमत्कार कोठे झाले तर मी बिनधास्त सांगितले असते 10 वीत असताना सायन्स च्या प्रॅक्टिकल्स ला 😁😁 खर आहे त्यादिवशी आमचे प्रॅक्टिकल्स होत ते पन कुठे तर आमच्या शाळेच्या टेरेस वरती. ते कसली दुर्बीण का काय ते लांबचे जवळ कस दिसते ते बघायचे होत. आता नेमके काय ते सरांना माहीत इकडे तिच्या अणि माझ्या मध्ये एकच दुर्बीण होती हे कस सांगणार कोणाला... लपंडाव..

लपंडाव.. #story

12 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

तिने खूप स्मार्ट उत्तर दिले त्याच एका वाक्यात बोलली मुलींना असे प्रश्ण विचारायचे नसतात त्या कश्या ह्या वयात असे डायरेक्ट नाव घेतील? अणि हसताना चे दोन स्मायली त्या काळातल्या 😁😁. उलट मलाच बोलली तुला झेपणार असेल तर एक चॅलेंज तुला करायचे आहे असे समज तुझी परीक्षा घेतय कोणीतरी. आता तिचा अणि माझा बेंचे बघितला तर असा तिरकस angle मधेच होता. मला बोलली आपण एकमेकांकडे बघायचे ज्याची पापणी आधी पडेल तो हरला अणि बदले मे जो मांगा वो देना पडेगा. मजूर हे तो बोलो... येवढ्या शॉर्ट टाइम मध्ये दुसरे काय बोलणार. मी पण बोललो ना मंजूर हे... पण रात्री खरच विचार आला हरलो तर काय अणि जिंकलो तर काय करायचे? अर्थातच मूड रोमँटिक होता..... लपंडाव..

लपंडाव.. #story

12 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

अपेक्षा होती की राजा सुरुवात करेल विचारायला काय भानगड आहे म्हणुन. वर्गात घुसतो तोवर पोस्टमन ने धमकी दिली संदेशा बेंच च्या तिथे अडकवला आहे. समोरून त्यात मला दोन ऑप्शन दिले होते. Reply मध्ये फक्त खुणावून तिला सांगायच होत 1 की 2. आता पहिला ऑप्शन सर्वासमोर प्रपोज करायच. दुसरा ऑप्शन होता अजून एकदा हेच competition करायचे पण ह्या वेळी हरला तर no ऑप्शन डायरेक्ट जे सांगेल ते करायचे. तिची गाडी ज्या स्पीड ने चालली होती माझी काय मजाल आडवे यायची. मी पण मिथुन च्या चित्रपटासारखा कायम संकटात असल्या सारखं ऑप्शन 2 सांगून मोकळा झालो अणि तिने त्याच क्षणी डोक्याला हात लावला. इकडे राजाला काही कळत नव्हते हा काय खेळ चाल ला  आहे. आईला काहीही म्हणा ती ज्या नजरेने बघायची ना म्हणजे direct murder ch व्हायचा माझा... लपंडाव

लपंडाव #story

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile