Find the Latest Status about श्री स्वामी समर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्री स्वामी समर्थ.
जितू
वंदन करतो तुम्हास आम्ही पडतो हो पाया सदा कृपेचा हात पाठिशी असो स्वामीराया मूढ आम्ही जन अडकलो या मोहपाशात मन आमचे गुंतून बसते नेहमीच त्यात शरण आलो तुम्हा आता मार्ग दावा या जखडून ठेवी आम्हा पामरा ठकवी ही माया शिणून जाई आमची धावून मन आणि काया कृपासिंधू हो तुम्हीच यावे आम्हास ताराया क्षमा करावे तुम्ही आमचे अनंत अपराध हे भक्तवत्सल कृपा करावी तुम्ही महाराज तुम्हीच द्यावी शक्ती भक्तीचा मार्ग चालाया हृदयी आमुच्या नित्य राहो तव भक्तीचा ठेवा आमच्या हातून नित्य घडावी तव चरणांची सेवा अखंड आम्हावरी राहूदे तव कृपाछाया ©Jitendriya Oka #Art # श्री स्वामी समर्थ #
Alewar A
"विसरू कसे उपकार ते... लाचार होते मझ जीव हे.... स्वामी अनंत कोटी उपकार.. दिला या जीवाला आधार...! पळवून लावले संकट सारे... स्वामी जीव माझा तुमच्यात वसे... हाक देता...एका क्षणी... स्वामी धावत येतील हो वाऱ्यावणी...! स्नेह तुमचे पाहून हे... नतमस्तक होई तन-मन हे.. स्वामी साथ हवी क्षणोक्षणी.. मिळो प्रसाद सेवेचा जन्मोजन्मी..! " श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ