Find the Latest Status about काळाचे उदाहरण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळाचे उदाहरण.
jayram More
डोळ्यात साठवू दे अंदाज काजळाचा कळणार मग मलाही आवेग काळजाचा जयराम मोरे सोनगीर ©jayram More डोळ्यात साठवू दे अंदाज काजळाचा कळणार मग मलाही आवेग काळजाचा *जयराम मोरे सोनगीर*
Narendra
कणा पोखरला तरी, अजूनही आहे ताठ! जगण्याची जिद्द मोठी, जरी मरणाशी गाठ! माझ्या कण्याकण्यामधे, किती रहातात पक्षी! जणू बासरी वाटावी, अशी काढलेली नक्षी! त्यांच्या टोचायच्या चोचा, मला पाडताना भोक! त्यांची पहायचा कला, माझा आवरून शोक! वारा येतो तेव्हा वाटे, त्यांचे कोसळेल घर! सरावाचा झाला आहे, त्यांच्या टोचण्याचा स्वर! जाता गाठाया आकाश, नाही जमीन सोडली! पूल करून देहाचा, माती-आकाश जोडली! वय जाणवते आता, माझा नाही भरवसा! जगण्याच्या कौलातून, मरणाचा कवडसा! घरं सोडा सांगताना, करकरतो मी मऊ! पाखरानो शोधा आता, माझा तरूणसा भाऊ! सावळांचा भारी भार, आता मला पेलवेना! तरी निरोपाचा शब्द, काही केल्या बोलवेना! पंख फुटलेले नाही, नाही डोळे उघडले! अशा पिल्लासाठी माझे, प्राण देहात अडले! जन्म माहेरीचा सरे, आता चाललो सासरी! भोकं म्हणू नका देहा, मी त्या कान्ह्याची बासरी! कवी - श्री. प्रमोद जोशी - देवगड. ©Narendra "माडाचे मनोगत"
Vilas Bhoir
अशी काजळाची रात्र सय चांदण्याची असे तिमीरात चालताना जसे उमलती ठसे फुल पाकळी होऊन रातराणी दरवळेल गंध आपुल्या नात्याचा बाहुपाशी बहरेल शांत सागर तटाशी मन चंचल पाखरू नजरेत एकाएकी कसे स्वतःला सावरू शशी माघारी फिरला वाट पश्चिम दिशेची तम बाळगण्या आता पूर्ण तयारी मनाची जिथे गारवा मायेचा अलवारशी फुकंर दाटलेल्या नभापरी सारा अंधार अंधार ~ विलास भोईर ( अशी काजळाची रात्र ) ©Vilas Bhoir अशी काजळाची रात्र
"Kumar शायर"
पल - पल हर पल ज़िंदगी उदाहरण देती है, कभी - कभी समस्या, समस्या का ही निवारण करती है...! ✍️.✍️.✍️ "Written:- by ©Umesh kumar #समस्या का उदाहरण
"Kumar शायर"
Every moment exemplifies life, Sometimes the problem, Troubleshoots the problem itself…! "Written: - by ©Umesh kumar #समस्या का उदाहरण
Vilas Bhoir
सुख दुःखाच्या वाटेतील दुःखद क्षण वेचून ती... घेते लहान असो किंवा मोठी भावासाठी पाठराखीण बनते सासर माहेरच्या नात्यांना प्रेमाच्या धाग्यात ती... विणते कधी मायेचा झरा तर कधी सरिता बनून वाहते तिने दादा म्हणताच ताई म्हंटलं की ती... सुखावते आपल्या लाडक्या भावाला वेळप्रसंगी प्रेमाने सावरते मोकळ्या मनाने बोलण्यासाठी कधी कधी मैत्रीण ती... बनते रागवलीच कधी भावंडांवर तर समजूतदारपणे समजूनही घेते नारळी पौर्णिमेच्या सणाला माहेरी येऊन औक्षण ती... करते भावाचं रक्षण व्हावं म्हणून हातात प्रेमाचा धागा बांधते आनंदाच्या प्रत्येक घडीला मायेचा घास ती... भरवते चुकलंच कधी काही तर मोठ्या मनाने माफ करते धन दौलत काही नको मज देवापाशी मागणं ती... मागते असेच अतूट राहू दे जन्मोजन्मी आम्हा बहीण भावाचे नाते ~ विलास भोईर (बहीण भावाचे नाते ) बहिण भावाचे नाते