Find the Latest Status about आठवते ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवते ना.
Pankaj Patle
अजूनही आठवतात ते दिवस.. शाळेत जाताना आई 50 पैसे द्यायची, आणि त्या 50 पैशाची किंमत अजूनही काही कडली नाही. पंकज.✍🏻 अजूनही आठवते
Rutik jiddewar (R.J)
आठवते अजूनही ते पोठदुखीचं कारण सांगून शाळेला सुट्टी होण्याअगोदर घरी पळत येनं आठवते अजूनही ते. आईने स्वच्छ धुवून दिलेले कपडे घरी येतांना नियमित मळत होते आठवते अजूनही ते रविवारला शेजारच्या काकाच्या शेतात जाऊन संत्रे चोरून खाणं आठवते अजूनही ते बाबांचा मार खाऊन रुसून बसणं व ते केव्हा जेवायला बोलावतील याची वाट बघत बसणं आठवते अजूनही ते एखादी गोस्ट मिळवण्यासाठी बाबा जवळ हट्ट न करता आई जवळ हट्ट करणं आठवते अजूनही ते बाबांनी आणलेलं खाऊ ताईला न देता स्वतःच फस्ट करनं आठवते अजूनही ते बाबांशी खोटं बोलून पेपर लपविनं आठवते अजूनही ते त्या इतिहासातल्या पुस्तकातील इंग्रज अधिकाऱ्याला दाढी मिश्या काढणं आठवते अजूनही ते। -ऋतिक लक्ष्मण जिड्डेवार आठवते अजूनही ते......
Smita Jawale
किती दिवसांनी भेटणार आहोत आपण ? एक नाही दोन नाही चक्क वीस वर्षानंतर .आठवतात का तुलाही सोबत घालवलेले क्षण .अगदी काल भेटल्या प्रमाणेच सारे वाटते आहे . College ची आपली पहिली भेट ...आपन कॉलेज मध्ये ग्याद्रीगला सोबत केलेली नाटके, कार्यक्रम ,डान्स सोबत घालवलेले दिवस .off lecture ला बसायला जागा नाही म्हणून तासंतास गणपतीला आणि तुळशीबागेत घालवलेला वेळ आठ्वतोका तुलाही .….माझ्या प्रमाणेच. ©Smita Jawale आठवते का तुलाही #feather
Durga Deshmukh
*भेट आपली* भेट आपली आठवते अजुन त्या दिसाची क्षण होते गुलाबी, साथ विश्वासाची झोंबे थंड वारा,आगेचा डोंब सारा मुक्या शब्दातुन वाहे, मुकाच सुस्कारा मनाला चाहुल नव्हती जरा ही कशाची गेले होते भांबावुन लाज ही गाली डोळ्यावर तेज आहे गुलाबी लाली भावना सांभाळुन चाख गोडी ऊसाची अवचित भेट आपली सहज घडे मनात नसतांना नजरेवर नजर पडे फुले उमलून आली मधाळ रसाची नजरेवर भिडता नजर गेले मोहरुन शुभ्र चांदण्यात आले अंग शहारुन बिलगुन तुझ्याशी यावी धुंदी पावसाची गुलाब साक्ष त्या दिसाची आठवण विश्वासाने घेऊन यावे ती साठवण दरवळ अजुनही वाहे त्या सुवासाची दुर्गा देशमुख, परभणी दि 3/5/21 ©Durga Deshmukh आठवते भेट त्या दिसाची