Nojoto: Largest Storytelling Platform

New जगू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगू.

Related Stories

    PopularLatestVideo

nisha Kharatshinde

जगा अन् जगूद्या #मराठीकविता

read more
जगा अन् जगूद्या

सध्या पन्नाशीही पार करणे
खूप अवघड झालंय
अन् आत्महत्या करणे
अगदी सोपं झालंय

पंचवीस वर्षाच्या नात्याला
किंमत राहिली नाही
दोन वर्षाच्या प्रेमासाठी
कुणी आईचाही उरला नाही

रागापुढे सर्व शून्य
अहंकाराने डाव साधला
वेदनांनी आवाज न करता
भावनांचा गळा घोटला

दुनियेचं हसू होईल
अन् इज्जतीचा पंचनामा
समजून घेऊ जग म्हणतं
अन् पडद्याआडून जाहीरनामा

इथं कुणी कुणाची निंदा करते
स्तुती मात्र क्वचित
तिरस्काराने एकमेकांच्या
संपली माणुसकीही निश्र्चित

अफवांवर पांघरुण घालणारे
पडतात फसवणुकीत बळी
माहेर आहेर संपलय आता
जन्मत:च खुंटते कळी

जगा अन् जगूद्या सर्वा
या महामारीच्या परिस्थितीत
अत्यल्प आयुष्य उरले
बदला आता मनस्थितीत

✍️ निशा खरात/शिंदे
       (काव्यनिश)

©nisha Kharatshinde जगा अन् जगूद्या

nisha Kharatshinde

जगा अन् जगूद्या #Memories #मराठीकविता

read more
mute video

Rasika Patil bhande

¿¿¿जगून घे #SushantSinghRajput

read more
कश्याला कोणापासून आशा करतो
क्षण मोलाचे जगून घे 
सारे काही मागून घे ¿¿¿जगून घे

#SushantSinghRajput

vaishnavi jadhao

जगून पाहू #admiration #Life_experience

read more
mute video

Gayatri Sonaje

जगू या #Stars #मराठीकविता

read more
कसं जगावं ?

कसं जगावं कसं मरावं 
ठरवू या, का आपण आपले 
किती हसावं किती रुसावं 
ठरवू या, का आपण आपले 

मित्र मैत्रिणी किती जोडले 
त्यातील किती आपण सोडले 
ताळेबंदाचे गणित मांडले 
सोडवू या, का आपण आपले 

स्वार्थासाठी किती दुखविले 
मोहासाठी किती फसविले 
पैशासाठी  सुख हरविले 
मिरवू या, का आपण आपले
 
कर्तृत्वाचा हिशोब मांडला 
अहंकाराचा स्वभाव जडला   
माणुसकीचा विसर पडला 
आठवू  या, का आपण आपले

जगण्यासाठी नाते जपले 
विनम्र होता जगणे कळले 
कसं जगावं कसं मरावं 
गिरवू या का?  आपण आपले

कसं जगावं कसं मरावं 
ठरवू या का आपण आपले
प्रत्येकाशी प्रेमाने वागून
मिटवू या का वाद  आपण आपले

किरण सोनार , नाशिक
20 मार्च 2021

©Gayatri Sonaje जगू या

#Stars

Akash Kumbhar

थोड जगू द्या

read more
एक पंख मलाही द्या.. भरारी घेऊ द्या..
एक आशा मलाही द्या...मला जगू द्या
नाहि म्हणल तरि अनेक वेदना द्या..जरा सक्षम होवू द्या..........
जरा रडू द्या....जरा हसू द्या..जरा पडू द्या..जरा बिगडू द्या..थोड का होईना थोड घडू द्या थोड जगू द्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile