Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्ञानेश्वर महाराज संत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्ञानेश्वर महाराज संत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्ञानेश्वर महाराज संत.

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

संत ज्ञानेश्वर #मराठीकविता

read more
°स्वर्ण सुख°

ज्ञानाची समाधी । त्रैलोक्यी पावली ॥
धन्य धन्य झाली । इंद्रायणी ॥ 

अलंकापुरी ती । झालिया महान ॥ 
किती गुणगान । माऊलीचे ॥ 

भरे कार्तिकीस । वैष्णवांचा मेळा ॥
याची देही डोळा । पहा तुम्ही ॥

टाळ नि मृदंग । कीर्तन गजर ॥
सारे सान थोर । वाळवंटी ॥ 

गळीयासी वीणा । ध्वजा खांद्यावरी
मुखी नाम हरी । चाले घोष ॥ 

जो तो दिसतोचि । हरी नामा दंग ॥ 
गाती ती अभंग । भक्तजन ॥

असा हा सोहळा । चाले रात्रंदिन ॥
भूक नि तहान । विसरुनी ॥

देवा वाटे सुख । काय काय वर्णू ॥
जणू स्पर्श स्वर्णू । झाला असे ॥

©® •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav संत ज्ञानेश्वर

Dinesh Chaudhari

माऊली ज्ञानेश्वर महाराज #Krishna

read more
सगुणाची सेज निर्गुणाची बाज ।
सांवळी विराजे कृष्ण-मूर्ति ॥१॥

मन गेले ध्यानीं कृष्ण चि नयनीं ।
नित्यता पर्वणी कृष्ण-सुखें ॥२॥

हृदय-परिमळी कृष्ण मनो-मंदिरीं ।
आमुचां माज-घरीं कृष्ण बिंबे ॥३॥

निवृत्ती निघोट ज्ञानदेवा वाट ।
नित्यता वैकुंठ कृष्ण-सुखें ॥४॥ माऊली ज्ञानेश्वर महाराज

#Krishna

Lokesh Late

संत नामदेव महाराज #वारी #संत सावता महाराज

read more
धन्य ते अरण रत्नाची ती खाण ।
जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर प्रेमाचे आगर।
घेतला अवतार माळिया घरी।।
धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता।
साठविला दाता त्रैलोक्याचा।।
नामा म्हणे ज्याचा जन्म सफळ झाला।
वंश उद्धारिला माळियाचा।।.
- संत नामदेव महाराज संत नामदेव महाराज
#वारी
#संत सावता महाराज

Sumit Hansarian

संत गाडगे जी महाराज #Thoughts

read more
mute video

सुशील Sushil

संत रामपाल जी महाराज #समाज

read more
mute video

Hemant Hondrao

शब्द .... संत तुकाराम महाराज #MyPenStory #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile