Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हातारपण आल्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हातारपण आल्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हातारपण आल्यावर.

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

बापाचं म्हातारपण #oldage #बाप #वृद्धाश्रम

read more
बापाचं म्हातारपण....

बाप मुलाला कंटाळत नाही
मोठ करतो
मुलगाच कंटाळतो बापाला
वृद्धाश्रमात ठेवतो..

हलाखीच्या परिस्थितीत
बाप स्वतः खात नाही
मुलाचं पोट भरतो
आणि मुलगाच नंतर त्याला , वृद्धाश्रमात ठेवतो...

लहानपणापासून मुलगा
बापाच्या घरात राहतो
मोठ्या झाल्यावर मुलगा
त्यालाच बाहेर काढतो....

बाप मुलावर संस्कार करतो
कमवायला शिकवतो
आणि नंतर मुलगा त्यालाच
वेडा ठरवतो....

जन्मभर मुलाला
बापाची किंमत कळत नाही
जेव्हा कळते
तेव्हा बाप दिसत नाही... बापाचं म्हातारपण
#oldage 
 #बाप 
#वृद्धाश्रम

संतोष विजय उईके

गझल..तू आल्यावर #poem

read more
तू आल्यावर..!

मनास माझ्या नवे धुमारे तू आल्यावर..
दुःख नाहिसे क्षणात सारे..तू आल्यावर...!!

अंधाराने थिजल्या होत्या जीवनवाटा,
झोपडीतही फुलले तारे..तू आल्यावर..!

संकट संकट खेळूनी मी थकलो होतो
मनगटात मग बळ संचारे..तू आल्यावर..!

दुःखाची नित वाहत होती गंगा दारी
आनंदाचे वाहे वारे..तू आल्यावर..!

साखरेहून आज गोडवा मला लाभला 
स्वप्न लोचनी लवलवणारे..तू आल्यावर..!


©संतोषकुमार विजय उईके, 
गोंडपिपरी जिल्हा.चंद्रपूर गझल..तू आल्यावर

राज श्री

एक म्हातारी

read more
अशी एक म्हातारी 
पडीक तिची झोपडी
झोपडीत चार भांडी
दोन साड्यांची गाठोडी
पदरात नव्हते मुलं 
ऊबेला मातीची चुल
मुसळधार तो पाऊस आला
झोपडी वाहे घळाघळा
झोपडीभर भांडी मांडली 
म्हातारी जाऊन कोपऱ्यात बसली 
छताकडे एकटक बघतच राहिली 
तरी ना पावसाची 
सर ती थांबली 
अंगावर पांघरली फाटकी गोधडी
कप्प्याकप्प्यांनी शिवलेली
भोकाभोकांनी सजलेली
पावसाचा तो पूर भारी
गेला सोबत घेऊन 
झोपडीत आन् म्हातारी एक म्हातारी

Sangeeta Kalbhor

असल्यावर बाप आभाळं जणू आपलं असतं हसल्यावर बाप त्रैलोक्यातील जणू घबाड घावतं..... मी माझी..... #शायरी

read more
mute video

Bhargav Nale

उडणारी म्हातारी 😅

read more
mute video

pooja d

म्हातारपण आलं मला
यात माझा काय गुन्हा ।।
याच विचाराने, माय
रडते मी पुन्हा पुन्हा ।।
 #म्हातारी #गुन्हा #चारोळी #दुःख

©vrem_lecture

मेल्यावर स्वर्ग #nojotophoto #Life_experience

read more
 मेल्यावर स्वर्ग

Sainath Ghadi

*सुंदर चेहरा म्हातारा होतो, #qoutes #viral

read more
mute video

Swapnali Gurabe Dhonukshe

पाऊस पडून गेल्यावर..... #poem

read more
mute video

suresh dhotre

मी गेल्यावर #Journey #कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile