Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणींचे ढग रंगीबेरंगी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणींचे ढग रंगीबेरंगी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणींचे ढग रंगीबेरंगी.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

आठवणींचे पक्षी..

read more
निर्विकार आठवणींना
नसतात कोणतेच रंग..
पण त्यांच्या अगतुक येण्याने
चेहरा मोहरतो अन्
जीव होतो दंग..! आठवणींचे पक्षी..

prayag pawar

आठवणींचे गाव.... #poem

read more
आठवणींचे गाव

जसे मोठे झालो
दूर आम्ही गेलो
गाव पाठी राहिले
आम्ही पुढे निघालो

छोटेसे कौलारू घर
त्याला बांबूचे दार
नेहमी सणासुदीला,
सडा-रांगोळी दारोदार

बहरली फुलझाडे 
दारी सजली तुळस
प्रात:भक्तीचा प्रहर
पाहता मंदिराचा कळस

गाव आठवणींचे गाठोडे
घट्ट पाठीवर घेतलेले
व्याकुळ परतीच्या ओढीने
क्षण अंतरी गुंतलेले...
                   © प्रयाग पवार आठवणींचे गाव....

कवी - के. गणेश

आठवणींचे क्षण..

read more
तुझ्या आठवणींचे क्षण
पाखरासारखे वेचत बसतो,
जसा मनात आनंदाचा
मोर नाचत असतो..! आठवणींचे क्षण..

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

read more
mute video

कवी - के. गणेश

आठवणींचे पक्षी.... #nojotophoto

read more
 आठवणींचे पक्षी....

बी.सोनवणे

आठवांचे ढग साठले, अन् हृदयांतरी दाटले।। क्षण ते सुखाचे जीवनी, अश्रू ही गोठले नयनी।। Love

read more
आठवांचे ढग साठले, 
अन् हृदयांतरी दाटले।।

क्षण ते सुखाचे जीवनी, 
अश्रू ही गोठले नयनी।।

©बी.सोनवणे आठवांचे ढग साठले, 
अन् हृदयांतरी दाटले।।

क्षण ते सुखाचे जीवनी, 
अश्रू ही गोठले नयनी।।
#Love

Devanand Jadhav

ढग आणि प्रेम #मराठीकविता

read more
°ढग आणि प्रेम°

ढगात आणि प्रेमात 
एकच साम्य असतं 
भरभरून आलं की 
बरसावंच वाटतं 

तो ढग बरसताना 
धरणी चिंब करतो 
नि प्रेम बरसताना 
भावनां न्हाऊ घालतो 

कधी ढग बरसून 
इंद्रधनू प्रकटतो 
त्याच सप्तरंगी जगी 
प्रेम... सुंदर स्वप्ने पाहतो 

मनीचे गूज विजेला 
ढग गर्जून सांगतो 
प्रेम मात्र मूकपणे
हळूच साद घालतो 

दोहोंचही बरसनं 
वेडं‌ ते वेडं‌ असतं 
हवं असतं थांबणं 
पण थांबत नसतं 

ढगाच्या बरसन्यानं
धरणी बहरा येते
प्रेमाच्या बरसन्यानं 
तन्मन मोहरूं येते 

©®•देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav ढग आणि प्रेम

Vishal Chavan

mute video

Satish Deshmukh

ढग पांढरा #faraway #मराठीकविता

read more
ढग पांढरा......... !

एक पांढरा ढग म्हणाला वाटोळीतला,
"पुरोगाम्यांचा समुद्र झाला मुंबईतला!

त्या पाण्याचे बाष्पही नको जरा आम्हाला
घास घेतला, काटा रुतला सुरमईतला!

मातोश्रीच्या नभात नाही 'राम' राहीला
,हिंदूत्वाचा चहाच घेऊ गुहाटितला!"

जेष्ठामधले ढग पांढरे असेच फसवे
पैशासाठी सुर हरवला बासरीतला!

                       कवी -सतीश दिलीपराव देशमुख
                                 शेंबाळपिंप्री,ता.पुसद 
                                 जि‌.यवतमाळ.

©Satish Deshmukh ढग पांढरा
#faraway

Devanand Jadhav

ढग आणि प्रेम... #मराठीकविता

read more
°ढग आणि प्रेम°

ढगात आणि प्रेमात 
एकच साम्य असतं 
भरभरून आलं की 
बरसावंसं वाटतं 

तो ढग बरसताना 
धरणी चिंब करतो 
नि प्रेम बरसताना 
भावनां न्हाऊ घालतो 

कधी ढग बरसून 
इंद्रधनू प्रकटतो 
त्याच सप्तरंगी जगी 
प्रेम... सुंदर स्वप्ने पाहतो 

मनीचे गूज विजेला 
ढग गर्जून सांगतो 
प्रेम मात्र मूकपणे
हळूच साद घालतो 

दोहोंचही बरसनं 
वेडं‌ ते वेडं‌ असतं 
हवं असतं थांबणं 
पण थांबत नसतं 

ढगाच्या बरसन्यानं
धरणी बहरा येते
प्रेमाच्या बरसन्यानं 
तन्मन मोहरूं येते 

 ©®•देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav ढग आणि प्रेम...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile