Find the Latest Status about असं घडलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असं घडलं.
yogesh atmaram ambawale
माझ्या प्रेमाची व्यथा.. कुणा सांगावी, नि कोण ऐकेल ही रडकथा. नशीब तसे खूपच भारी.. एक गेली की लगेच दुसरी, थांबेना ही गाडी. ओळख होते,छान मैत्री जमते, मैत्रीचे रूपांतर मग प्रेमात होते. पण हे प्रेम फक्त एकतर्फी असते, जाहीर करताच मी,नाते तुटते. एकदा नाही कित्येकदा असं घडलं आहे, प्रेमाच्या बाबतीत नशीब माझं फुटकं आहे. अशी ही माझ्या प्रेमाची व्यथा आहे, जिथे आनंद कमी नि रडकथाच जास्त आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या प्रेमाची व्यथा... #माझ्याप्रेमाचीव्यथा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा.
Santosh Hadapad
असावं असं कुणीतरी आत्तापर्यंत कुठे होता म्हणून हक्कानं विचारणारं.. इतकं कसं रे माझावर प्रेम करतो म्हणून विचारणारं.. मला कधी विसरून नाही जाणार ना म्हणून विचारणारं.. कधी तर माझावर रागव ना म्हणून म्हणणार... आपल्यावर स्वतःपेक्षा ही जीवापाड प्रेम करणारं.. मी तुला कधीच विसरणार नाही असं म्हणणारं... आपल्यासाठी आपल्याला पण विसरून जाणारं, दुःख मनात असूनही ते कधीच न दाखवणारं... खरंच कोणीतरी असावं ना मनमोकळेपणाने सांगणारं.. असावं असं कुणीतरी
कवी - के. गणेश
आयुष्याचं असं होतं.. वाहून गेलेल्या पाण्यासारखं वय कसं निघून जातं.. जगून घेईन म्हणत म्हणत आयुष्य किनाऱ्याला येतं.. चुरगाळलेल्या फुलासारख्या भावना विरून जातात.. मागे वळून पाहताना डोळेही भरून येतात.. ऋतुपरत्वे झाडाची पानं गळू लागतात.. ऊन वाऱ्याच्या झळा आपसूक कळू लागतात.. भूतकाळाकडं बोट करून रडताही येत नाही.. अन् चुकलेलं गणित खोडताही येत नाही.. पार शेवटच्या वळणावर जाणीव खोल होते.. जणू ओस माळरानात बहरायची सल राहते.. @kganesh ९०२८११०५०९ आयुष्याचं असं होतं..
vishnu thore
असं लिहावं जगणं व्हावी जिदंगीची शाई वय सरता सरता मोजू नये रे पुण्याई - विष्णू असं लिहावं जगणं...
Sunil Zarikar
थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं.. कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं.. मग आपणच जाऊन सॉरी म्हणावं.. असं प्रेम करावं.. वर वर तिच्या भोळसट पनाची खूप चेष्टा करावी, पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं.. असं प्रेम करावं... प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं.. पुन्हा त्या बरोबर येणार्या वेदनांना ही सामोरं जावं.. असं प्रेम करावं.. असं प्रेम करावं..
Secret Quotes
मांजर डोळे झाकून दूध पिताना तिला वाटते की,, आपल्याला कोणीच बघत नाहीत. तसं तर.. येथे भीतीला पण कान असतात पण ती वेळ.. अजून तरी आलेली नव्हती जे घडलंय ते समोर आहेत.. -AS Patil✍️ चुकीचं घडलं. जे वाटले नव्हते घडलं. आता मनात गोंधळ नाही सुट-सूटीत डोळ्या समोर साध्य झालंय खरं रूप बाहेर आलेत कुणाचे...
Dr Anand D
घरच्यांच थोडं काम असेल ते करायला तू थकतोस, तिच्या मागे फिरता फिरता तू किती वेळ मुकतोस..? घरच्यांचा काही स्वार्थ नाही त्यांच्या अपेक्षांचं तुला ओझं, कळत नाही मला गाड्या अस कस प्रेम तुझं..? परिवाराला वेळ देण्यासाठी नेहमी मुहूर्त तू बघतोस, तिच्या एक आवाजावर तू घोड्यावर्ती निघतोस..! आई वडिलांना खोत बोलतो ततुला वाटते का रे लाज..? कळत नाही मला गाड्या अस कस प्रेम तुझ? प्रेमाचीही एक वेळ असते पण कर्तव्य कर आधी, करून भविष्य कडे दुर्लक्ष करतोयस स्वतःची बरबादी..! स्वतःला घडवल्यावर मग प्रेमाच्या गीतावर आनंदाचा साज, मग कोणी बोलणार नाही तुला अस कास प्रेम तुझं..? #असं कसं प्रेम तुझं..?