Nojoto: Largest Storytelling Platform

New एकटेपणा चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकटेपणा चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटेपणा चारोळी.

    PopularLatestVideo

✍️Sushil Kedare

एकटेपणा
ह्या हृदयात दुःखाचा सागर वाहून येईल,
जेव्हा मी तुला कायमच सोडून जाईल.
शोधत बसशील मला तू सगळीकडे पण मी दिसणार नाही,
मीच नसेल आयुष्यात तुझ्या बाकी असेल सर्व काही,
राहणार काळोखच सुशिल जिवनात पहाटेच उजेड कसा होईल,
जेव्हा मी तुला कायमच सोडून जाईल. #एकटेपणा

satya patil 😅

माझा एकटेपणा हाच माझी ताकद आहे😊जिथे मी विचार करतो,माझ्यात लपुन बसलेला मी शोधतो🧐 मला स्वतःवर प्रेम करने यानेच तर शिकवले 😇तो माझा असा मित्र आहे की जो मला कधीच सोडून जात नाही😅 #एकटेपणा

Sachin Devade

एकटेपणा #poem

read more
mute video

शब्दवेडा किशोर

एकांत..
ज्याला हवाय त्याला न मिळणारा
अन् ज्याला नकोय त्याची साथ
कधीही न सोडणारा..
एकांत..
नदीकिनारी,निसर्गाच्या सानिध्यात
हवाहवासा वाटणारा
अन् रात्रीच्या वेळी कुत्र्याच्या रडण्याप्रमाणे
काळजात घर करणारा..
एकांत..
मनाला वाऱ्याच्या हिंदोळ्यावर अलगद डोलावणारा
अन् खवळलेल्या समुद्रात त्याच मनाला
हेलकावे घ्यायला लावणारा..
एकांत..
आपणहून सुखाच्या गर्तेत गुंग होऊ पाहणारा
अन् त्याच चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा
केविलवाणा प्रयत्न करणारा.. 
एकांत..
पक्ष्यांचा चिवचिवाट मधुर गाण्यासारखा भासणारा
अन् तोच चिवचिवाट कधीकधी जीवन किती बेसूर बनवतो
याची जाणीव करून देणारा..
एकांत.. 
येणाऱ्या आयुष्याकडे आशेने पाहायला शिकवणारा
अन् आयुष्यभर होऊन गेलेल्या चुकांचा
शोक करत बसणारा.. 
एकांत..
चेहऱ्यावर हास्याची रेघ ओढणारा
अन् तीच रेघ हळूच
आसवांनी मिटवणारा..
एकांत.. 
निर्जीव जीवाला जगणं शिकवणारा
अन् जगणाऱ्याला शांततेत
आतल्या आत मारणारा..
एकांत..

©शब्दवेडा किशोर #एकटेपणा

sagar alhat

एकटेपणा

read more
mute video

शब्दवेडा किशोर

आयुष्याच्या प्रत्येक पाऊली
एक नवा धडा मी शिकतो आहे 
दुःख क्षणाचे स्वागत करताना
अन् सतत जनमाणसात जगताना 
मी खरंच मनातून हसलो आहे 
कितीक पाहिली रंगीत स्वप्ने मी
अन् आहेत कितीतरी अजूनही
माझ्या मनीच्या सुप्त आशा 
त्या जगताकडे जाता जाता
वाट नेहमीच मी चुकलो आहे 
बालपणाच्या गोष्टीत ऐकला होता
एक परी राज्याचा देश मी
आज त्याच देशीच्या वेशीवरी येता
मी किती जास्त थकलो आहे 
महाद्वार बंद अन चोख पहारा
तटाबाहेर अंधार निवारा 
सुप्रभातीचे पहिले कोवळे किरण
येता मी नेहमी तयापुढे झुकलो आहे 
त्या देशाची रमणीय कहाणी
गाऊन सांगे पक्षी गाणी 
त्या दुनियेची अनोखी अनोळखी ती
सफर कराया मी कधीचा बसलो आहे 
जीवन माझे व्यर्थ गेले
अजूनही तिला न डोळ्यांनी पाहिले आहे  
कधी करील का ती मनधरणी माझी
मी तर कधीचा रुसलो आहे 
गोड बोलणे लडिवाळ ते हसणे
अन् नयनांचे ते विभ्रम देखणे 
अशा बहुरूप्यांचे भेद जाणण्या
मी नेहमीच आजवर फसलो आहे
अन् जनमाणसात राहूनी सतत मी
आजही माणसांच्या गर्दीतला एक शापीत जोकर
हीच माझी नित्य ओळख मोठ्या
अभिमानानं जपतो आहे
आयुष्याचा प्रत्येक पाऊली
एक नवा धडा मी शिकतो आहे

©शब्दवेडा किशोर #एकटेपणा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile