Nojoto: Largest Storytelling Platform

New ३७१ आर्टिकल विकिपीडिया Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ३७१ आर्टिकल विकिपीडिया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ३७१ आर्टिकल विकिपीडिया.

    PopularLatestVideo

पूजा शिंपी बागुल

आर्टिकल

read more
प्रिया एका सामाजिक संस्थेशी निगडित एका ऑफिसमध्ये काम करत होती..
ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती म्हणून प्रिया लगबगनीचे सर्व काम पार पाडीत होती. इतक्यात केबिनच्या दरवाजावर  टकssटक झाली.. व पलीकडून आवाज आला..
आत येऊ का? प्रियाने होकार देताच ती व्यक्ती आत आली.. ती एक स्त्री होती.. तिच्या  हातात फाईल्स होत्या चेहर्यावर काहीशी उदासी होती. ती आत येताच प्रिया म्हणाली, या मँडम बसा! पाणी घ्या!  ती बाई जरा घाबरत खुर्चीवर बसली. ती बसल्यावर जर रिलॅक्स झाल्यावर प्रिया म्हणाली,  बोला मँडम काय काम आहे?  ती  बाई हातातील फाईल प्रियाच्या हातात देत म्हणाली,  मँडम आपल्या न्युज पेपर मधील बातमी वाचली  म्हणून शिफारस पत्र घेऊन आले आहे.  अच्छा म्हणजे तुम्हाला पुरस्कार हवा तर ? खरं  प्रिया निष्पाप होती बाहेरचं जग तिला पूर्णतः माहित नव्हतं. नुकतंच शिक्षण पूर्ण करून ती   त्या आँफिस मध्ये लागली होती.
  प्रिया एक सरळ मार्गी मुलगी होती. ऑफिसमध्ये धुर्त मार्गाने  पैसा कमवत, नाव मोठे  करण्यासाठी तिचा मालक खोटा मार्ग अवलंबत होता. याची कल्पना प्रियाला नव्हती. काही लोक तसे म्हणतही होते  पण यावर प्रियाचा विश्वास बसत नव्हता.  ऑफिस वर्कच्या नावाखाली आतून तडजोड करत प्रियाला अंधारात ठेवून तिच्या कडून कामं करून घेत होता. 
समोर बसलेल्या बाईलाही पुरस्कार हवा होता. पण नियमानुसार मुदत संपून गेली होती. तिने तसे समाेर बसलेल्या बाईला सांगितले.. म्हणाली मॅडम, शिफारस पत्र घेण्याची मुदत केव्हाच संपली आहे. तरीही मी सरांना विचारून बघते. त्यांनी होकार दिला तर तस तुम्हाला कळवते. तुम्ही बस इथेच मी सरांकडे जाऊन येते.
काही वेळात प्रिया सरांकडे जाऊन आली व बाईला म्हणाली, मॅडम! सर म्हणाले की पत्रिका आधीच डिझाईन साठी गेलेली आहे. नावेही सिलेक्ट झाली आहेत. पण तरीही तुम्ही इच्छुक असाल तर काही रक्कम द्यावी लागेल. प्रियाच्या प्रस्तावाला ती बाई लगेच तयार झाली. व तिने विचारले की रुपये द्यावे लागतील? त्यावर प्रिया म्हणाली, ते मला माहित नाही. तुम्ही सरांना जाऊन प्रत्यक्ष विचारून घ्या. नंतर आपली माहिती घेऊन माझ्याकडे या. 

प्रियाने म्हटल्या प्रमाणे ती बाई सरांच्या केबिनमध्ये गेली व नंतर हसतमुखाने बाहेर येत प्रियाच्या केबिनमध्ये आली. सरांनी सांगितल्या प्रमाणे तिने आपली माहिती एका कागदावर लिहून शेवटी एक चारोळी लिहून तो कागद तिने प्रियाकडे सुपूर्द केला.. 
प्रियाने तो कागदावरील मजकूर वाचला तसेच शेवटची चारोळी सुद्धा वाचली व तिने त्या बाईला विचारले, मॅडम! आपण कविता लिहता? त्यावर मॅडम हसतमुख म्हणाल्या, हो! म्हणजे अगदी अलीकडेच लिहू लागलीय. 
तिचं नवखेपण तिच्या लिखाणात जाणवत होतं पण तसे न दर्शविता प्रिया म्हणाली,छान आहे लिखाण. त्यावर ती बाई हसली व म्हणाली धन्यवाद. खरं तर मी नवखी असून मला पुरस्कार मिळतोय याचा खूप आनंद होतोय. साहेबांशी याबाबत आधी बोलणं झालं होतं म्हणून मी आले. पण साहेब म्हणाले तसे करून दाखवले. असे म्हणून ती बाई निघून गेली.

ती निघून जातात प्रियाने इतर नामावली पडताळून पाहिली तसेच त्यांचे लिखाणही पाहिले आणि कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण श्रेय नामावलीत एकही दर्जेदार साहित्यिक नव्हता. ती तडक साहेबांच्या केबिनमध्ये गेली व आपली शंका तिने साहेबांच्या कानी टाकली तसे साहेब तिला समजावत म्हणाले. हे बघ प्रिया, इतका मोठा इव्हेंट करणार आहोत आपण की त्यास बरेच मान्यवर येणार आहेत. त्यात सिने कलावंत पण असणार आहेत. मग त्यासाठी निधी पण मोठा लागणार.  
साहेबांच्या म्हणण्यावर प्रियाने होकारार्थी मान हलवली. तसे साहेब पुढे म्हणाले, मग त्यासाठी थोडी तडजोड करावीच लागते शिवाय आपण नवोदितांना व्यासपीठ मिळवून देतोय, त्यांना प्रोत्साहित करतोय. 
साहेबांचं उत्तर प्रियाला पटले नाही व ती म्हणाली,पण साहेब मग दर्जाचं काय? त्यावर साहेब हसून म्हणाले,आता ते नवोदित आहेत. आपण लगेच त्यांच्याकडून दर्जाची अपेक्षा कशी ठेवणार ना. हळूहळू होतील दर्जेदार. त्यावर प्रिया म्हणाली, मग अशा इव्हेंटमुळे साहित्याची हानी नाही? त्यावर साहेब हसत म्हणाले, आपण फायद्याची बाजू उचलून धरली की हानीचे पारडे आपोआप खाली जाते. हे तुला कळणार नाही. तुला त्याचा इतका अनुभव नाही. तू फक्त तुला दिलेल्या कामाकडे लक्ष दे. 
प्रियाच्या परखड प्रश्नांनी साहेबांचा पारा चढला. बिचारी हतबल प्रिया मुकाट आपल्या जागेवर येऊन बसली. काही दिवसात ठरल्याप्रमाणे इव्हेंट समारोह सुरू झाला. प्रिया सुद्धा त्या समारोहाला हजर होती. ती सर्व रंग ढंग पाहत होती. कोणी अभिनेत्री आणून तिच्या हस्ते एक  ट्रॉफी आणि एक सर्टिफिकेट देण्यात आली. पुरस्कार घेणारा आणि देणारा दोघांच्या चेहऱ्यावरचे आनंद पाहून प्रिया मात्र व्यथित होत होती. ती विचार करू लागली की, एवढा थाटमाट अंतर्मनाला खरंच समाधान देतो का? हा दर्जेदार लिहणाऱ्यांवर अन्याय नाही का?खोटंच  बाजारात खपतं
 ते ही जास्त किमतीत
एखाद्या कडे १०० गोष्टी असतात पण दाखवता दहाच येतात
मात्र एखाद्या कडे दहागोष्टीच  असतात त्याला १०० करून 
सत्य कधीही सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं मात्र ओरडून ओरडून सांगतं त्यालाच लोकं सत्य समजतात.  हे निश्चित. साहित्याच्या तळ्यात असे कितीतरी नवोदित मासे आहेत जे स्वतःहून गळाला लागायला आतुर आहेत म्हणूनच आपले उखळ पांढरे करून घेणाऱ्या साहेबाचे फावते आहे. 
आपल्याच विचारात गर्क असता ती ऑफिसमध्ये भेटलेली बाई समोर आली व म्हणाली, मॅडम ही माझी कवितांची फाईल. साहेबांनी कविता संग्रह प्रकाशित करण्याचा शब्द दिलाय. तिची कवितांची फाईल घेऊन तिने ती चाळली आणि तिला अंदाज आला. ती हसली व म्हणाली, बरं ठीक आहे. मला सांगा पुरस्कारासाठी किती तुमच्याकडून किती पैसे घेतले गेले? त्यावर ती बाई म्हणाली, जास्त नाही फक्त पाच हजार. तिचे ते बेफिकरीचे उद्गार ऐकून प्रिया मात्र अवाक झाली. ती मनात म्हणाली, काय  हौस असते. 100 रुपयाच्या पुरस्कारासाठी लोकं पाच हजार मोजायला तयार आहेत. चिखल साचायला सुरवात झालीय पण  त्याची दलदल व्हायला फारसा वेळ लागणार नाही. पुरस्काराचा हा तिरस्कार त्यांनाच लाभ जे हापापलेले आहेत.. इथल्या अंधेर नगरीत सचोटीचं काम नाही प्रिया .प्रकाश पुंजक्याच्या शोधात...
*पूजा शिंपी बागुल* आर्टिकल

Ashok Mishra Comedian (9833241897)

आर्टिकल from magzine #कला

read more
 आर्टिकल from magzine

Komal Ahirwar"मूकनायक2"

आर्टिकल 15 अब रिलीज होगी

read more
खुशखबरी
आर्टीकल 15 
28 जून को 
रिलीज हो रही हैं। आर्टिकल 15 अब रिलीज होगी

Beganaji

आर्टिकल के लिए कांटेक्ट करें #न्यूज़

read more
mute video

sai mahapatra

३७०

read more
 सहर में नया ऐलान हुआ है

हुक़ूमत ने नया फरमान सुनाया है

आज से ३७० हो गया है इस सहर से गायब

अब से तिरंगा फेहेराने से किसी को नहीं रोक पाएंगे इए बड़े बड़े नवाब

अब से केंद्र सरकार की सभी योजनाएं होंगी इस अंचल में लागू

नहीं होगा उसपे वहां के स्थानीय सरकार का कोई काबू

अब से कश्मीर में जाने की यहां पर रहने की मिलेगी सबको आजादी

कोई नेता कोई सरकार लगा नहीं सकेगा उनपर कोई पाबंदी

अब से जम्म्यू और कश्मीर भी होगा भारत का हिस्सा
और

                            

३७० बनके रह जाएगा कुछ तनासाशाओ का नाकाम क़िस्सा ३७०

Lalit Jogi

#३३१

read more
बहुत ग़ुमान है चाँद को अपने होने पे,
तुमको देखे तो आहें भर,जाये। #३३१
loader
Home
Explore
Events
Notification
Profile