Nojoto: Largest Storytelling Platform

New दिवाळी ग्रिटींग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिवाळी ग्रिटींग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवाळी ग्रिटींग.

    PopularLatestVideo

Anisha Dodke

दिवाळी लेख दिवाळी लेख #Diwali #मराठीकविता

read more
दिवाळी लेख.............माझ्या लेखणीतून✍️

पहिल्या दिव्याचे वंदन जिजाऊ मातेच्या पुत्राला 
शिवाजी महाराजांच्या त्यागाला गड किल्ले आणि 
बलुतेदार अलुतेदारांच्या पराक्रमाला 
शेतात राब राब राबणाऱ्या त्या
 माझ्या बळीराज्याला..........!

दुसऱ्या दिव्याचे वंदन 
तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीला 
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या
संघर्ष मय जीवनाला 
त्याग मूर्ती रमा मातेच्या त्यागाला
संविधानातील पाना पानाला.......!

तिसऱ्या दिवाचे वंदन करू
साहित्याच्या बानाला अण्णा भाऊ च्या 
लेखणीला ....
फकिराच्या शौर्य गाथेला ....
लहुजींच्या बलाढय सैन्याला
 आणि मुक्ताईच्या वेदनेच्या निबंधाला......!

चौथ्या दिव्याचे वंदन
समाजाला जुगारून शिक्षणाची 
ज्योत पेटवणाऱ्या फुले
दाम्पत्यांना .....!

पाचव्या दिव्याचे वंदन
तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी दिवाळीचा
 हा दिवस दिला अश्या 
आपल्या आई वडिलांना.....!
या दिवाळीच्या दिव्याचे वंदन 
अमूल्य जीवनातील अमूल्य व्यक्तींना......
तुम्हाला व तुमच्या परिवाराला........💐
दिवाळीच्या अनंद शुभेच्छा....!
   
कवयित्री लेखिका
  कु :अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke दिवाळी लेख

दिवाळी लेख

#Diwali

Vrishali G

दिवाळी

read more
.दिवाळी..... 
 तेजोमय भासणारा.तुझ्या चेहेर्यावरीलप्रकाश.. 
 दोन शांत दिवेच वाटणारे..तुझे ते काळेभोर डोळे.. 
 माझे मन मोहुन टाकणारा..तुझ्या बोलण्यातील गोडवा.. 
 प्रत्येक क्षण सुगंधी करणारा ..तुझा सहवास..!! 
 काळाच्या प्रवाहात कदाचित हे सारे लोपले असेल.. 
 पण तुझ्या आठवणीनीच  रंगुन जातेय.. 
 बघ, माझी प्रत्येक "दिवाळी".. दिवाळी

Vrishali G

दिवाळी

read more
दिवाळी..... 

 तेजोमय भासणारा.तुझ्या चेहेर्यावरीलप्रकाश.. 
 दोन शांत दिवेच वाटणारे..तुझे ते काळेभोर डोळे.. 
 माझे मन मोहुन टाकणारा..तुझ्या बोलण्यातील गोडवा.. 
 प्रत्येक क्षण सुगंधी करणारा ..तुझा सहवास..!! 
 काळाच्या प्रवाहात कदाचित हे सारे लोपले असेल.. 
 पण तुझ्या आठवणीनीच  रंगुन जातेय.. 
 बघ, माझी प्रत्येक "दिवाळी".. दिवाळी

shubhangi gawande

दिवाळी

read more
दिवाळीच्या फराळानी
भरवली यंदा सभा,
कुरकुरीत राहण्याचा प्रश्न
प्रत्येकाच्या मनी उभा !

दिवाळी आली तरी पाऊस
करत नाही परतीचा विचार,
चिवडा, चकली, कडबोळी
आपल्या भवितव्यानी बेजार !

चिवडा म्हणे भाजक्या ऐवजी
आता पोहे भिजके मिळणार,
चकली म्हणे मऊ पडले तर
अंगावर काटा कसा टिकणार !

शंकरपाळ्यांना वाटे आपण
आता मऊ पडणार किती,
अनारस्यांच्या मनात भरली
चिवट होण्याची भिती !

लाडू मात्र त्यातल्या त्यात
थोडासा सुखी होता,
म्हणत होता यंदा मला
लागणार नाही म्हणे बत्ता !

सगळ्यांनी मग देवाकडे
मिळून एक साकडं घातलं,
लाज आपली टिकावी म्हणून
पाऊस थांबवायला सांगितलं !
                शुभांगी गावंडे दिवाळी

Mili

फराळाचा सुगंध
आणि दिव्यांची रोशनाई
तुमच्या घरी दिवाळी ला येतोय
घेऊन तुमच्या साठी मिठाई
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या
 गोड गोड सुभेछ्या
💥💣💣💥
milind  guddnattikar (sutar)

©Mili #दिवाळी

Rohini Pande

#पावसातली दिवाळी# #poem

read more
mute video

Yogesh shinde

दिवाळी #MyPoetry

read more
mute video

Mrunali Mandlik

प्रदुषणमुक्त दिवाळी

read more
नको फटाक्यांचा धुर, 
घेऊ निसर्गाची काळजी. 
पर्यावरणाला हानी न करता, 
करू दिवाळी साजरी.

©Mrunalini Mandlik प्रदुषणमुक्त दिवाळी

shailesh bade

दिवाळी #Diwali #मराठीकविता

read more
|| दिवाळी ||

लागले दिवे दारी
उजळल्या ज्योती 
रंगात रंगली रांगोळी अंगणी
आली दिवाळी ही घरोघरी 
सजले स्वयंपाक घर                                     
गृहिणीच्या हाती रेसिपी                                      
फराळाची ही मेजवानी                                      
आली दिवाळी ही घरोघरी                                       
                      लागला पहिला दिवा दारी
                    ओवाळी बळीराजा गाई पाडसासी
                    आंनदाची अन उत्सवाची
                     आली दिवाळी ही घरोघरी
रोषणाईत सजली नगरी                                   
लक्ष्मीची पाऊले आली दारी                                  
नव चैतन्य घेऊन                                  
आली दिवाळी ही घरोघरी                                    
                      अभ्यंग स्नानाची पहाट ही सजली
                   सुगंधी उटण्यात नाहली
                      फटाक्यांच्या आतषबाजीत रंगली
                      आली दिवाळी ही घरोघरी 
उत्सव नात्यांचा रंगला दारी                                 
ओवाळी बहिन भावासी                                 
हर्ष उल्हासाची                               
आली दिवाळी ही घरोघरी                 शैलेश बदे...✍️✍️

©shailesh bade दिवाळी

#Diwali

PSarang

शुभ दिवाळी #Thoughts

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile