Nojoto: Largest Storytelling Platform

New पावसाळा चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावसाळा चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाळा चारोळी.

    PopularLatestVideo

Supriya Yewale

#uskajaana पावसाळा पावसाळा #मराठीविचार

read more
mute video

STREET WRITER

पावसाळा.... #nojotophoto

read more
 पावसाळा....

संतोष विजय उईके

■ पावसाळा

दावून पाठ पळतो बापास पावसाळा
पाण्याशिवाय छळतो शेतास पावसाळा..!

झालेत खूप गोळा गगनी थवे ढगांचे
कोराच वाटतो हा बकवास पावसाळा..!

दुष्काळ पावसाचा शेतात नेमका हा
अन् चिंब चिंब करतो शहरास पावसाळा..!

शेतातल्या पिकाला वाहून पूर नेतो
नजरेत मग बळीच्या नापास पावसाळा..!

देतो रुजू बियाणे मातीत वावराच्या..
मग मारतो दडी का हमखास पावसाळा..!

दुष्काळ आज ओला हा कोरडा उद्याला
करतो असा तसाही उपहास पावसाळा..!

आहेस तूच त्याचा आधार पावसा रे
 देतो सुहास्य अंती कुणब्यास पावसाळा..!

©संतोषकुमार विजय उईके #पावसाळा

Shankar kamble

*झाकोळले नभ* 
 *पिसाटला वारा* 
 *आसावली धरा* 
 *मीलना अधीरा...* 
                         *अवेळी धिंगाणा* 
                          *अल्लड सरींचा* 
                            *भिजल्या पंखांना* 
                              *ध्यास घरट्याचा...* 
 *गंधाळली माती* 
 *कस्तुरी सुवास* 
 *भेगाळल्या मनां* 
 *अंकुरली आस...* 
                           *कुंभातून आल्या* 
                      *झरझर सरी* 
                        *शिंपले अमृत* 
                           *माळरानावरी...* 
 *ओघळ पाण्याचे* 
 *खळखळ भारी* 
 *नाद उन्मेषाचा* 
 *चेतवला उरी...* 
                    *प्रसवली भूमी* 
                    *तरारले बीजं* 
                    *जपलं उदरीं* 
                           *स्वप्नं तुझं माझं...*

©Shankar kamble #पाऊस 
#पाऊसधारा 
#पाऊसाततुझीआठवण 
#नभ 
#पाऊसाचा 
#पाऊसाला 
#पाऊसावर

Deepak Kambli

लाटापावसाळा #poem

read more
लाटा उधाणल्या या
गेल्या वरी अशा त्या
आल्या धरेवरी मग
जिंकून या जगाला
- डिके लाटा#पावसाळा

its.vedee

शाळा आणि पावसाळा

read more
शाळा नी पावसाळा
Combination च किती भारी वाटतं ना
पावसाळ्यात शाळेत जायचं खास कारण म्हणजे नवीन छत्री आणि नवीन रेनकोट घालायला भेटायचं😁..आणि त्याहून खास म्हणजे शाळेची अर्धी सुट्टी व्हायची ज्याने आपल्या सवंगडीला ही भेटायला मिलायचं आणि शाळेचा कंटाळा ही नाही यायचा.. 😄
कधी पाऊस आला तर वर्गात सरांना "सर पाणी येतंय,खिडक्या बंद करू का??"😂
अस म्हणत खेळायच्या मैदानावर भिजण्याची मज्जाच वेगळी😁😌
ते दिवस च किती भारी होते जेव्हा शाळा सुटायचा वेळेला नेमकी पाऊस यायचा आणि कोणाकडे छत्री नसली की एकाच छत्रीतून दोघं तिघं जायचो आणि जर चुकून जोराचा मग तर मज्जाच मज्जा.. 🤦🏻‍♀️😂
आपल्या मित्रांसोबत मज्जा मस्ती ..अगदी धम्माल!!
आयुष्य किती सोप्पं असायचं!
भेटतील का पुन्हा ते दिवस??🥺
येईल का ती मज्जा पुन्हा??🥰
खरच पुन्हा एकदा ते क्षण जगता आले तर..🤞❤️

©Vedanti Nimbre
  शाळा आणि पावसाळा

umesh prakash salunke

आला आला पावसाळा.....

read more
  आला आला पावसाळा
  ढगाळ वातावरण लागले होईला
   रस्त्याला पाणी लागले जमायला
   लोकं लागले आनंदाने भिजायला....!

   शेतकरी मनातून लागला हसायला
    पेरणीची तयारी लागला करायला
    सुजलाम सुफलाम लागला बघायला....!

    गावांत नदी नाले घेतले गाळ काढायला
    पुराचं पाणी नको कुणाच्या घरात शिरायला
    वादळं वारा  बसलाय फटका देईला....!

     सगळयांनी पावसाची कामे घेतली करायला
      दुकानदारांनी दाडपत्री आणली विकायला
      सगळे लागले डागडुजी घेतली बुजवायला.....!

      आपल्या अंगणात एक झाडं घ्या लावायला
       उदयाची सावली नको वाटती का कुणाला
       फळं येतील झाडाला दुसरे घेऊन जातील स्वतःला....!

     शाळेच्या मुलांची तयारी घेतली करायला
रेनकोट छत्री चाललोय आणायला
पावसामुळे  आजारी नको पडायला
  
आला आला पावसाळा
कधीं संपला उन्हाळा
सुरू झाला पावसाळा.....!

   

   आला आला पावसाळा.....

Rajkumar Nayak

तो एकच पावसाळा #poem

read more
mute video

Prasaad Shendage

#पावसाचा थेंब# #सुचलेल्या ओळी#पावसाचा थेंब#

read more
पावसाचा थेंब हळूच गालावरून ओघळतो..
दमलेला जीव माझा एका क्षणात विरघळतो..
©प्रसाद✍
@| सुचलेल्या ओळी | #पावसाचा थेंब# #सुचलेल्या ओळी#पावसाचा थेंब#

umesh prakash salunke

#solace आला आला पावसाळा

read more
  आला आला पावसाळा
  काळे ढंग लागले रडायला
   रस्त्याला पाणी लागले जमायला
   लोकं लागले आनंदाने भिजायला....!

   शेतकरी मनातून लागला हसायला
    पेरणीची तयारी लागला करायला
    सुजलाम सुफलाम लागला बघायला....!

    गावांत नदी नाले घेतले गाळ काढायला
    पुराचं पाणी नको कुणाच्या घरात शिरायला
    वादळं वारा  फटका बसलाय देईला....!

     सगळयांनी पावसाची कामे घेतली करायला
      दुकानदारांनी दाडपत्री आणली विकायला
      सगळे लोकानीं डागडुजी घेतली बुजवायला.....!

      आपल्या आजूबाजूला एक झाडं घ्या लावायला
       उदयाची सावली नको वाटती का कुणाला
       फळं येतील झाडाला दुसरे घेऊन जातील स्वतःला....!

   शाळेच्या मुलांची तयारी घेतली करायला
रेनकोट छत्री बाजारात निघालो आणायला
पावसामुळे  आजारी नको  वाटतं पडायला.....
  
आला आला पावसाळा
कधीं संपला उन्हाळा
सुरू झाला पावसाळा.....!

   उमेश साळुंके
  पिंपरी गावं
   १९/०६/२०२० #solace आला आला पावसाळा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile