Nojoto: Largest Storytelling Platform

New माडाचे झाड माहिती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माडाचे झाड माहिती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माडाचे झाड माहिती.

Related Stories

    PopularLatestVideo

Narendra

"माडाचे मनोगत" #मराठीकविता

read more
कणा पोखरला तरी,
अजूनही आहे ताठ!
जगण्याची जिद्द मोठी,
जरी मरणाशी गाठ!

माझ्या कण्याकण्यामधे,
किती रहातात पक्षी!
जणू बासरी वाटावी,
अशी काढलेली नक्षी!

त्यांच्या टोचायच्या चोचा,
मला पाडताना भोक!
त्यांची पहायचा कला,
माझा आवरून शोक!

वारा येतो तेव्हा वाटे,
त्यांचे कोसळेल घर!
सरावाचा झाला आहे,
त्यांच्या टोचण्याचा स्वर!

जाता गाठाया आकाश,
नाही जमीन सोडली!
पूल करून देहाचा,
माती-आकाश जोडली!

वय जाणवते आता,
माझा नाही भरवसा!
जगण्याच्या कौलातून,
मरणाचा कवडसा!

घरं सोडा सांगताना,
करकरतो मी मऊ!
पाखरानो शोधा आता,
माझा तरूणसा भाऊ!

सावळांचा भारी भार,
आता मला पेलवेना!
तरी निरोपाचा शब्द,
काही केल्या बोलवेना!

पंख फुटलेले नाही,
नाही डोळे उघडले!
अशा पिल्लासाठी माझे,
प्राण देहात अडले!

जन्म माहेरीचा सरे,
आता चाललो सासरी!
भोकं म्हणू नका देहा,
मी त्या कान्ह्याची बासरी!

कवी - श्री. प्रमोद जोशी - देवगड.

©Narendra "माडाचे मनोगत"

Dadaso v Bankar

 #माहिती....

Dadaso v Bankar

 #माहिती

Dadaso v Bankar

 #माहिती

somnath gawade

एखाद्याची 'माहिती'
विचारली असता
'महती' सांगणारा तो
एक 'चेला' जाणावा.
🤣😂 #माहिती

Shashikant Kendre

आपल्या रशन कार्डवर माहिण्याला किती धान्य मिळत त्या साठी खाली वेब वर आपलया रोशन कार्ड ची माहिती मिळावा....!!
    Mahafood. Gov. In गुगल वर टाईप करा..! 
  	नंतर 
  अॉनलाईन_रास्त भाव दूकानें _क्लिक करा..
  नंतर
AePDS _सर्व जिल्हे _क्लिक करा
  नंतर
  RC Details new _क्लिक करा. 
  नंतर
  SRC No_  येथे आपल बार अंकी रोशन कार्ड नंबर टाका
                  आणि Submit. बटन क्लिक करा..
आपली सर्व राशनकार्ड कुटुंबातील नावे धान्य माहिती दिसेल आपला शशिकांत केंद्रे.......!! #राशनकार्ड #माहिती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile