Find the Latest Status about खटला पुरा की वीडियो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खटला पुरा की वीडियो.
vaishali
$ खटला $ रस्त्यावरून ती , एकटीच जात आहे ! अंधार पाहून जरा , मनात भीत आहे !! नसे कोणी दूरदूर , वाटेवरी त्या आज ! काळीज आता तिचे , जरा काचरत आहे !! अचानक आला , वाटेत आडवा कोणी ! अडकली नौका , जणू वादळात आहे !! टाकला हात त्याने , तिच्या अब्रूवरती ! वाचवा वाचवा असा , ती टाहो फोडत आहे !! करुनि अब्रूची होळी , तो गेला निघून कोठे ! रक्ताच्या थारोळ्यात ती , पडली निपचित आहे !! आजाद फिरतो नराधम , सावजाच्या शोधात ! वर्षोनुवर्षे खटला , न्यायालयात सडत आहे !! _______________________ खटला #मराठीलेखणी #मराठीकविता