Nojoto: Largest Storytelling Platform

New ढग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ढग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ढग.

Related Stories

    PopularLatestVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

ढगं... #संगीत

read more
ढगं..

ढगं गर्जत आले 
मेघ बरसत आले
तहानलेल्या धरणीला
भिजवूनी चिंब केले
ढगं गर्जत आले...

त्या लिंबावरती,
रान कोकीळा गाती
धून एकून ही वेडी,
काळी नाचतीया माती
त्या लिंबावरती..

वाही पाटात पाणी
तुडूंब शिवार जाहले.
पायात पाखर्याच्या
बघ घुंगरू बांधले.
ढगं गर्जत आले..

कवीराज ढगं...

Satish Deshmukh

ढगफूटी #मराठीकविता

read more
आसमानी दैत्य आला शेत गिळतो गटगटा !
क्षितीजाशी टेकल्या सैतान मेघाच्या जटा !

ढगफूटी की जगबुडी काही कळेना लोक हो !
खरडून नेले शेत माझे, कुठून आला भामटा !


सतीश देशमुख
उमरखेड जि.यवतमाळ

©Satish Deshmukh ढगफूटी

नीरज बावरी

्ढगर #न्यूज़

read more
mute video

मयुर लवटे

ढग दाटुनि आले  तुजला भेटण्यासाठी. #ढग_प्रेमाचे

Devanand Jadhav

ढग आणि प्रेम #मराठीकविता

read more
°ढग आणि प्रेम°

ढगात आणि प्रेमात 
एकच साम्य असतं 
भरभरून आलं की 
बरसावंच वाटतं 

तो ढग बरसताना 
धरणी चिंब करतो 
नि प्रेम बरसताना 
भावनां न्हाऊ घालतो 

कधी ढग बरसून 
इंद्रधनू प्रकटतो 
त्याच सप्तरंगी जगी 
प्रेम... सुंदर स्वप्ने पाहतो 

मनीचे गूज विजेला 
ढग गर्जून सांगतो 
प्रेम मात्र मूकपणे
हळूच साद घालतो 

दोहोंचही बरसनं 
वेडं‌ ते वेडं‌ असतं 
हवं असतं थांबणं 
पण थांबत नसतं 

ढगाच्या बरसन्यानं
धरणी बहरा येते
प्रेमाच्या बरसन्यानं 
तन्मन मोहरूं येते 

©®•देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav ढग आणि प्रेम

Vishal Chavan

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile