Nojoto: Largest Storytelling Platform

New शाहनामा इस्लाम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शाहनामा इस्लाम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाहनामा इस्लाम.

    PopularLatestVideo
e4012472662009cb81eec7cbb5c05e30

#Princewrite...

(फातिमा ज़ेहरा a.s)
वो ज़ब दरबार मे कदम रखती थी सारे सर ताज़ीम को  झुक जते थे
खुद रसूल उनकी ताज़ीम को उठ जातें थे
 बुगज़ मे इतने गिर चुके थे वो लोग या  खुदा अपने ही रसूल की बेटी को दरबार मे झूठलाते थे
😭💔😭

©#princewrite... #इस्लाम
aae1d2043645cfa9bcd2134a69f9ed2f

Faisal Khan

इस्लाम की चारग को बुझाने कि बात करते, हो,
 सूरज से आँख मिलाने कि
 बात करते हो।

©Faisal Khan इस्लाम

इस्लाम #शायरी

5 Love

7ef0277d129b68e7e384da43a7d7459b

islam

जिंदगी की राह चलते चलते हमने कदम पीछे कर लिए कुछ अपने छोड़ गए कुछ गैरों ने छोड़ दिया अब ना रहा दम इस जिंदगी में जीने का क्या करें हम फिर जिंदगी ने कहा ए जिंदगी तू चलता जा जहां तेरा कदम चले कहीं ना कहीं वह मोड़ मिलेगा तुझे जहां आराम मिलेगा

©Yahuda Yahuda इस्लाम

इस्लाम #ज़िन्दगी

3 Love

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

तुझे बोल येताच ओठी
सूरही प्रेमाचे ओले झाले ...
झंकारली तार हृदयाची 
सप्तसुरात सूर न्हाऊन गेले ... #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

 #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

पुरुषाला असतात भावना
पण व्यक्त करायचा नसतो अधिकार ..
त्यालाही येत रडू
पण आसवे गिळून असतो तो निर्विकार ..
त्यालाही वाटते हसावे
खळखळून एखाद्या झऱ्यासारखे ..
हवेत अलगत तरंगावे
स्वछंदी आनंदी फुलपाखरूसारखे ..
पण तो होतो दगड
कठोर आणि कणखर ..
कारण त्याला सोसायचा असतो
हतोडयाचा घाव छातीवर .. #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

एका पक्षाने धरलाय
दुसऱ्या पक्षावर नेम
फोडाफोडीच्या खेळात
जनतेचा झालाय गेम

जो तो म्हणतोय
मीच होणार राजा
गलिच्छ या राजकारणात
होरपळतेय मात्र प्रजा

तत्व निष्ठा स्वाभिमान
टांगून ठेवला खुर्चीला
माझा शेतकरी मात्र
मिठी मारतोय फाशीला #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

आकाशी प्रेमाचा खेळ खेळे
चांदण्या संगे हा चांदवा ...
एकटा मलाही झोंबतो हा
धुंद मधुंद शीतल गारवा ....


@शिवराम #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

हे माझ्या प्रीत पाखरा
नको फिरु अशी सैरावैरा 
सुटलाय झोंबणारा वारा
ये मिठीत हळुवार जरा 

बघ कसा छेडीतो वारा
तुझ्या नाजूक पदरा
नको जाऊस थांब जरा
यौवनाची तू अप्सरा #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

हे माझ्या प्रीत पाखरा
नको फिरु अशी सैरावैरा ....
सुटलाय झोंबणारा वारा
ये मिठीत हळुवार जरा .... #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

जिधर दिलपे दिमाग हाबी होता है
उधर हमेशा धोका होता है
और जीधर दिल हाबी होता है 
उधर प्यार और सिर्फ प्यार ही बसता है #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

नाही जमत मला
माणसे ओळखायला
मुखवटे तर असतात
खरा चेहरा झाकायला #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

तू सोचता है सारी दुनिया 
तेरे सामने झुक जाये ...
लेकिन मेरी तमन्ना है की
दुनिया मेरे गले लग जाये ... #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

वासना अन द्वेषाचा तुझ्यातला
दुर्योधन तुला जाळणे गरजेचे आहे
रंगांची उधळण करण्याअगोदर
तुला प्रथम कृष्ण होणे गरजेचे आहे #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

भावनांचा लाव्हा
खदखडतोय आत
पण शब्दच
संपावर गेलेत आज #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

तोच सूर्य आजही उगवला
चेहरा मात्र वेगळा भासला

काल जाताना नाराज दिसला
आज येताना गालात हसला

जणू देतोय तुला गुरुमंत्र
जगण्याचे हेच आहे तंत्र

काल सर्व गेले काळाच्या पोटी
आजचा दिस फक्त तुझ्यासाठी

@शिवराम #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

प्रेम करावे असे
नदीचे पाणी जसे
गोड रूप असूनही
खारट सागरा संगे

प्रेम करावे असे
चंद्र चकोरा जसे
भेटीची आस अंतरी
जरी कोस दूर असे

प्रेम करावे असे
राधा कृष्ण जसे
एकरूप होऊनही
जगा वेगळे कसे

प्रेम करावे असे
कृष्ण सुदामा जसे
राजा रंक असूनही
मैत्रीत बाधा नसे #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

चार दिवस स्वतःसाठी 
जगायचे काय ठरविले ..
माझ्याच माणसांनी मला 
स्वार्थी मनाचा ठरविले .. #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

काही ठिकाणी काही वेळा
पुन्हा एकदातरी जायचे असते
तिथल्या जुन्या पाऊलखुणांना
पुन्हा जाऊन खुनवायाचे असते #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

आठवण तुझी
आठवता आठवता
मीच हरवलो आठवणीत #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

तुला डोळ्यात भरायचे म्हटले
डोळेच भरून आले
तुला शब्दात मांडायचे म्हटले
शब्दच मुके झाले #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

कशाला हवी 
फक्त पानांची प्रेमपत्र
हवा कशाला 
नुसत्या शब्दांचा खेळ 
थेट भीड जाऊन 
तिच्या काळजाला
जर जुळला असेल 
तुझा तिचा मेळ

नको फक्त 
शब्दांतली तळमळ
हृदयातही होउदे 
जरा जळजळ
तुझ्याजवळील 
सर्वकाही दे तिला
मनात असेल जे 
ते बोलून टाक तिला #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

ना कधी वाटली
गरज शब्दांची ...
ना भासली कधी
गुंफण बंधनांची ...
तुझ्या माझ्या या 
अनोख्या नात्याला साथ 
फक्त मुक्या भावनांची ...

@शिवराम #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

मंदिर-मस्जिदमे चर्च-गुरुद्वारामे
आज उधरभी भगवान नहीं है ..
उनको देखना है तो हॉस्पिटलमे देखो
डॉक्टर बन के वो सेवा कर रहे है .. #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

आजकाल माझ्या कवितेला
काय झाले माहीत नाही
शब्दच एकमेकांच्या बाजूला
बसायला तयार नाहीत

बहुतेक ते घाबरले असावेत
चायनीज कोरोना वायरसला
म्हणाले मेल्या..दोन दिवस ठेव
बाजूला तुही तुझ्या भावनेला

पण मीही तेवढाच हट्टी
प्रेमवीर माझ्या कवितेचा
असे कित्येक आले नी गेले
अंत न झाला कवी मनाचा #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

असे काही जरुरी नाही
समांतर रेषा कधीच भेटत नाही
त्याही भेटू शकतात
एकमेकांना बिलगु शकतात
गरज आहे ती त्यांच्यातील 
तेवढे अंतर संपविण्याची #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

तिचे सौदर्य 
तिचे औदार्य

ती सोशिक
ती सात्विक

ती शीतल
ती कोमल

ती सोज्वल 
ती निर्मळ

तिची वेदना
तिची संवेदना

कधी कुचंबना
कधी विटंबना #शिवनामा
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

किती भाग्य थोर माझे
जन्म घेतला तुझ्या पोटी 
आई त्याहून आणिक धन्य
दुसरी माझी माय मराठी 

किती भाग्य वर्णू मी हिचे
थोरवी गाती सह्याद्रीचे कडे
ओठातुन माझ्या सदा पडती
मराठी शब्दांचे सुवर्ण खडे

माझ्या शिवरायांचे स्वराज्य 
अभिमानाची मोलाची माती
जन्म घेतो जो इथल्या भूतीत
जन्म घेते त्याची पोलादी छाती

तेजोमय तारकांचे हे आकाश
माझी मराठी जनन जन्मभूमी 
तुझ्या कुशीत अन या मातीत
मरूनही पुन्हा पुन्हा जन्मेन मी #शिवनामा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile