Nojoto: Largest Storytelling Platform

New रागावले का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रागावले का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रागावले का.

Related Stories

    PopularLatestVideo
55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

शब्दांनी या अर्थामागे का लागावे
कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ?
भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे
उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे?
- विष्णू थोरे शब्दांनी या अर्थामागे का लागावे
कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ?
भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे
उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे?
- विष्णू

शब्दांनी या अर्थामागे का लागावे कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ? भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे? - विष्णू

4 Love

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

दिवा विझण्याआधी वाचवा
अंधाराला उजळून टाकण्यासाठी
चटका बसणार नाही ना
हे बाकी आपणच पाहायचं
जेवढी काळजी  त्याची घेऊ
तो साथसंगत करेल आपली
तो माणसासारखा अजिबात नाही
आपणांस निरंतर देत राहिल 
अगदी विझेपर्यंत 
प्रकाश आणि साथ दोन्ही

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे #गातच राहावे

जीवनगाणे #गातच राहावे #मराठीकविता

136 Views

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

#जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

आदरणीय राष्ट्रपती साहिबा.....

 आम्हां सर्व महिला वर्गाला 
.
आपल्याबद्दल प्रचंड 

अभिमान वाटतो 🙏👍

आपले मनापासून

 खूप खूप अभिनंदन 🙌💐

पुढील वाटचालीस 

हार्दिक शुभेच्छा 👍

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

श्रावणमासी हर्ष मानसी
 हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर  शिरवे 
क्षणात फिरुनी ऊन पडे

             बालकवी
🌾🌱🌿🍃☘️🪴🌴🌳🌲

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

निसटत चाललं आहे
सारं काही
पण अजूनही वेळ आहे
सावरण्याचा प्रयत्न करुया
आवरुया स्वतःला 
आणि
गुंतलेल्या पाशातून
मुक्त करुया
मोकळा श्वास घेण्यासाठी 
सारं संपण्याआधी
फक्त एकदाच
प्रयत्न करुया...

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

खुर्चीचा मोह काही आगळाच
मी मी म्हणणाराला
झटकन उतरवती
कधी पैशाचा लोभ दाखवून
तर कधी....
पैशांचीच 
घालून भिती
कैक गारद होती 
खुर्चीच्या मोहापायी
भारुन टाकते अंतर्बाह्य
हे येड्या गबाळ्याचे
काम नसे नक्कीच 
किती आले अन् किती गेले
गिनतीच नाही उरली

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

येणारी प्रत्येक सकाळ
न्हाऊन निघू दे
सुगंधी फुलांसारखी
मोहरु दे
प्रत्येक क्षण
फुलोऱ्यासारखा
आकाशी जाऊ दे
बहर फुलांचा
आसमंतात
दरवळू दे
जीवनगाथा
निरभ्र होऊ दे
माझे जीवनगाणे
स्वच्छंदी होऊ दे
सर्वांचेच जगणे
💫🙌

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

किती मनमोहक
किती ते आरस्पानी
नैसर्गिक सौंदर्य
एकटक पहात रहावं
डोळ्यात साठवून ठेवाव
अनोखं रुप तुझं
गंधाळलेले

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

आपल्याला सर्वजण 
सोडून गेले तरी ...
आपल्या सोबत 
सदैव साथ जिची
ती आपली सावली ...
सावली कधी गडद
तर कधी फिकी
सावली कधी लहान 
तर कधी मोठी ....
आपल्याच सावलीला
घाबरुन कसं चालेल
तीच करेल सोबत
शेवटच्या श्वासापर्यंत

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

हा प्रकाश मज वाटे
शीतल अन् हवाहवा...
जणू या झाडामागे
चंद्र असे झोपलेला...
ते चांदणे टिपोरे 
चंद्रमाही पौर्णिमेचा...
उजळून आले सारे 
 अवघेअंधारलेले जग...
लख्ख प्रकाश सारा
काळोख कुठेच नसे...
तेजोमय धरती सारी
मजला खुणावते आहे ...

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao


अगदी मधासारखे
बोट असावे माझे
अन् टिपावा मकरंद
निरागस फुलपाखराने
नकळत जडेल नाते
सुगंधी फुलासारखे
अवघे मधाळ होईल 
सारे जीवन माझे
गट्टी होता घट्ट त्याशी
सदा बरसती हर्ष राशी
स्वच्छंदी कसे जगावे
त्याच्याकडून शिकावे

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे #गातच राहावे

जीवनगाणे #गातच राहावे #जीवनअनुभव

88 Views

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

अलगद स्पर्श हाताचा
झाले वलय पाण्याचे
जणू  शुभ्र लाटांप्रमाणे
तरंग उठती तयाचे
किमया की जादूगिरी
या मनमोहक दृश्याची
पारणे फिटे डोळ्याचे
साठते प्रतिमा नयनी

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे #गातच राहावे

जीवनगाणे #गातच राहावे #मराठीविचार

46 Views

37e608ddd8a20a1996a96d857763bad8

Yogesh shinde

!! तु रागावलीस तर  !!

#chaandchupa

!! तु रागावलीस तर !! #chaandchupa

1,706 Views

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

पेटू दे दिवा , अंधारातील राती
देऊ दे साथ , दिव्याला वाती
राहू दे अतूट , चराचरांतील नाती
जाऊ दे न्हाऊन , गंधाने माती
पक्षी सुस्वरे , अवीट गीत गाती
⭐             ⭐            ⭐

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

परिस्थितीला शरण
जाण्यापेक्षा
आहे त्या प्राप्त
परिस्थितीत
काळाची पावले ओळखून
मार्गक्रमण करत
राहाणेच इष्ट
👍

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

किती सहज आणि सोपं
असतं
सूर्यफुलासम जगणं
सूर्य ज्या दिशेने पुढे
मार्गक्रमण करतो
त्याच दिशेने वाटचाल करायची
सदैव हसतमुख चेहरा
जसा फुलोरा
पण......
लक्षात कोण घेतो!
आपल्याला फुलणं मुळी
माहितीच नाही
उगाच चिंतेत राहायचं
सगळ्या जगाचं दु:ख
आपल्या पाठीवर घ्यायचं
सतत उत्साही व आनंदी
राहता यायला हवं
या सूर्यफुलासारखं
🌻🌻🌻🌻

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

स्वप्न उद्याचे
उराशी बाळगून
निघताना
अनेक प्रश्न
अन् अडचणी 
आल्या खऱ्या
पण.......
कुठेच थांबलो नाही
आत्मविश्वासाने
प्रत्येक पाऊल
पुढे टाकले
निश्चितच स्वप्न
सत्यात साकारेल
खात्री आहे 👍

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

 भरली ओंजळ गंध फुलांनी
चहूकडे सुगंध दरवळला 
गुलाबास वेढले काट्यांनी
हा वेडा तरीही फुलला
सुगंधी फुलांची गंमतच न्यारी
मोहरुन उठतो सारा आसमंत
 उजळून येतात दाहीदिशा
🥀🥀🥀🥀
आज मात्र रिकामी ओंजळ
तरीही सुगंध दरवळलाच
कालचा सुकलेला गुलाब
अस्तित्व मागे ठेवून गेला
पुन्हा आसमंत मोहरला
माझेही असेच होईल का ?

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे #गातच राहावे

जीवनगाणे #गातच राहावे #मराठीकविता

89 Views

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

नवीन पालवी फुटण्यासाठी
पानगळ ही होणारच ....
शेवटी निसर्ग नियम आहे हा
सापही कात टाकतोच ना 🐍
नवीन रुप धारण करण्यासाठी.....
मग आपणच का नाही सोडत
बुरसटलेले विचार व कल्पना....
अंधश्रद्धेला खतपाणी घालून
किती वर्षे जगत राहायचं...
लोभ , मोह , माया , मत्सर
या साऱ्याला तिलांजली देऊन
आपणही कात टाकून
नवीन रूप धारण करुया

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे #गातच राहावे

जीवनगाणे #गातच राहावे #मराठीकविता

89 Views

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

सूर्याची कोवळी किरणं
म्हणजे
जीवनाचा आशावाद जणू......
प्रकाशमान होणारी शलाका
म्हणजे
नव्याने जगण्याची प्रेरणा .....

सूर्योदयासम सारी सृष्टी
न्हाऊन निघू दे , अन् ..
सृजनशीलता उजळू दे 
आयुष्याच्या प्रवासासाठी....

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

तू सोबत असशील

तर .......

ना बुडण्याची भिती 

ना पडण्याचे भय

फक्त......

कायम असाच सोबत राहा 

सतत अशीच साथ दे 

पैलतीरावर जाऊन

दोघे सोबतीने

परतवू संकटांना

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao


मज आवडणारी
झुकझुक गाडी... 
झाडे पळवित 
रस्ता तोडी.....
मौजमजा करीत
गावा सोडी......

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

पुढच्याचं समजून घेतलं तर
सारे गैरसमज दूर होतील ....

नाहीतर गुंता वाढतच जाईल
अन् कायमची वाताहात होईल...

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

हो मोकळी मनाने
हितगुज सांग मनीचे..
नको घाबरुस आता
सारी खोल  गुपिते..
हा खेळ सावल्यांचा
अविरत चालतो आहे..
चाचपडू नको कधीही
चाल पुढे निर्धाराने..
या निष्पर्ण वृक्षांनाही
पालवी फुटते नव्याने..
मग तूच थांबतेस का गं
भर ओंजळ नवऊर्जेने..
जग आता स्वाभिमानाने
 जग तू नवविचाराने..

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

भवताली अंधार झाला दाट
हरवली धुक्यातील वाट 
चाचपडे दाहीदिशांनी
होताच बंद आड पापणी 
उजळली  जेव्हा पणती
प्रकाशली अवघी धरती
समाधान चेहऱ्यावरती
सोडले बंधपाश , आसक्ती
 शिकूनी जगण्याचे बारकावे
काजव्यांसारखे चमकावे
इतरांना सदा आधार देती 
जेव्हा मिणमिणती पणती 
सार्थकी जन्म हा सारा
अंगीकारली जीवनधारा

❄️⭐🕯️🔮

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

समोर बसलेली व्यक्ती
प्रत्येक क्षणी
तुमचं ऐकत असतेच असं नाही
त्याच्या कानावर जे जे पडतं
ते ते मनावर उमटेनासं झालं की
समजून जावं आपलं आपणच
आता संवादाला पूर्णविराम 
द्यायला हवा ! 
कारण .......
बोलणारालाही भान हवं .

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

शब्दाविना कळणारी असते ती मैत्री , 
हास्याचा अर्थ कळणारी असते ती मैत्री
 आसवांना ओळखणारी असते ती मैत्री
शब्दांच्या पलीकडली  असते ती मैत्री 
निखळ , सळसळता झरा म्हणजे मैत्री 
आनंद , उत्साह ओसंडणारी असते  मैत्री 
उत्कट भावना प्रकट होणारी असते मैत्री
भावभावनांचा सुंदर मिलाफ म्हणजे मैत्री
राग , लोभ , मोह , मद , मत्सर , द्वेष  , या पलीकडली असते मैत्री
कधीही न संपणारी , चिरंतन सत्य असते मैत्री 
सर्वांना मैत्रीदिनाच्या
खूप खूप शुभेच्छा 
😊👍👏💫💞

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile