Nojoto: Largest Storytelling Platform

New पोर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोर.

Related Stories

    PopularLatestVideo

Rupesh Gogawale

पोरका..

read more
mute video

Rupesh Gogawale

mute video

Rupesh Gogawale

# पोरका

read more
mute video

शब्दवेडा किशोर

काळ हा सुखाचा बालपणाचा
रंगी बेरंगी फुलपाखरांचा
हसत खेळत बागडण्याचा
नसे विचार भविष्याचा......             
फुल कळीचे येता उमलून
मन सुगंधी जाई उन्मादून
भृंग हा करी भोवती गुणगुण
सांगे पोरी टाक पदे जपून......
स्वच्छ निरभ्र अवकाशात
स्वच्छंदी विहारे जणु यौवनात
उगा उणीव भासे तेव्हा जीवनात
भेटण्या सखा आस अन् हुरहुर लागे मनात......
हाच तो चंद्रमा दूर नभात
खुलवी मग तिच्या मनास त्या पौर्णिमेच्या चांदण्यात 
गुंते जीव शुक्राच्या चांदणीत
कंठ दाटे उरी तिच्या त्याला भेटण्यात......
उमजेना काही वेड्या मनाला
सावरू कसे उन्मादी यौवनाला
रातराणी करी धुंद मनाला
मिलनाची आस असे वेड्या जीवाला..

©शब्दवेडा किशोर #पोरीजराजपून

aniket rajendra mendjoge

पोरीचं लग्न

read more
पोरीचं लग्न

पोरीचं लग्न जमलं अनं
बापाच्या काळजाचा ठोका चुकला,
जावयामध्ये सुद्धा त्या बापाले 
स्वतःच पोर दिसला!

पोरीच्या लग्नाची तयारी पाहतांना
त्या बापाच्या डोळ्यात अश्रू आले,
पोरीला लहानाची - मोठी करतांना
कळलंच नाही त्याला ते दिवस कशे गेले!

अक्षदा पडल्या -लग्न झालं
आनं पोरगी सासुरवाडी गेली,
क्षणो-क्षणी त्या बापाले
त्याच्या चिमुकलीची आठवण आली!

वरात पोरीची जाताना
बापाच्या डोळ्यात अश्रू आले,
एक बाप म्हणून पोरीसोबत
मनसोक्त जगाचेच राहून गेले!

                 लिखाण
   अनिकेत राजेंद्र मेंडजोगे पोरीचं लग्न

Shayeri_lover

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile