Find the Latest Status about बोबडे टाकळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोबडे टाकळी.
yogesh atmaram ambawale
रूप ते प्रेमाचे,खूप सुंदर दिसत असे. तान्हुळ्याला आपल्या मांडीवर घेऊन, आई जेव्हा बोबडे बोल बोलत असे. सर ह्या प्रेमाची कुठल्याच प्रेमास नसे. अजाण ते तान्हुले बाळ, आईचे बोबडे बोल बरोबर ओळखत असे. रूप ते प्रेमाचे प्रत्येक रूपात सुंदर असे. अनुभवले हे प्रेम नजरेसमोर ज्याने जगी सर्वात सुंदर रूप प्रेमाचे,हेच मानत असे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रूप ते प्रेमाचे... #रूपतेप्रेमाचे हा विषय
sandy
*बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा* उमलू दया या कळयांना अंगण आपले सजवू या... बोबडे गोड बोल मुलाचे कानी आपल्या पडू दया... चला मुलांनो सर्व मिळूनी
yogesh atmaram ambawale
बाप मी माझ्या ही मनात विचार येऊ लागले, लग्न करावे लागेल आता तिचे शिक्षण बरेच झाले. सुरुवात केली मुले शोधायला चांगले एक स्थळ ही आले, ठरवले लग्न साखरपुडा ही झाले, हळदी समारंभ चेहऱ्यावर खूपच आनंद पण मनात बापाचे मन रडवे झाले. लग्नाचा दिवस नुसतीच लगबग नि धावपळ लक्ष सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांकडे पण मन मात्र फक्त लेकीकडे. इतक्या गर्दीत आपल्या लोकांस शोधत असताना ही डोळे सतत लेकीला पाहत होते. झाल्या सर्व लग्नविधी "लेक चालली सासरला" देताना निरोप तिला सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या. लेक सासरी जात असताना पाहून, लहानपणा पासूनच्या तिच्या आठवणीने मन भरून आले होते. अशा ह्या "लेक चालली सासरला" च्या क्षणाला सर्वांचेच डोळे पाणावले होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे. एक भारी विषय. आजचा विषय आहे लेक चालली सासरला.. #लेकचालल
Yogesh Ambawale
आनंद इतका की गगनात मावेना, लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना. बापाचे मन हे असतेच असे, ह्या मनाच्या भावना कुणाच कळेना. लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही, किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही. बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात, तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात. आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं, तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण. वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी, जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची. आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा, लेक माझी खूप काळजी घ्यायची. लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती, लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती. ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते, गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते. लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता. कन्यादानाचा तो सोहळा पाहता, डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता. आठवण तिची कायम रहावी बालपणाची, म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. #कन्यादान#लाडकी_लेक#बाप आनंद इतका की गगनात मावेना, लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना. बापाचे मन हे असतेच असे, ह्या मनाच्या भावना कुणाच कळे
yogesh atmaram ambawale
लग्नात लेकीच्या,सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो सर्वात हळवा क्षण होता. कन्यादानाचा तो सोहळा पाहता, डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता. आठवण तिची कायम रहावी बालपणाची, म्हणून ठेवलीत जपुन खेळणी तिच्या लहानपणाची. (कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. कन्यादान.. #कन्यादान1 हा विषय @पूजा डोमाळे यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
"लेक चालली सासरला" साऱ्या लग्नविधी झाल्या देताना निरोप तिला सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या. "लेकीचे लग्न" पाहून, लहानपणा पासूनच्या तिच्या आठवणीने मन भरून आले होते.... . (कॅपशन मध्ये वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे लेकीचं लग्न... #लेकीचंलग्न चला तर मग लिहूया. हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. #collab #
yogesh atmaram ambawale
बापाचे मन हे असतेच असे, ह्या मनाच्या भावना कुणाच कळत नसे. लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही, किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही. बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात, तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात. आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण. वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी, जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची. आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,लेक माझी खूप काळजी घ्यायची. लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती, लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती. ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते, गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते. लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता. कन्यादानाचा तो सोहळा पाहता,डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता. आठवण तिची कायम रहावी बालपणाची,म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान #कन्यादान चला तर मग मस्त मस्त लिहुया.