Nojoto: Largest Storytelling Platform

New छळून घ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about छळून घ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छळून घ्या.

    PopularLatestVideo

....

लपून छपून

read more
वाटतं, असच तुला लपून बघावं
तू मागे वळताच ,मी लपवा
माझा या खोडकरपणाला
तुही वैतागून हसावं
वेडी आहे ही हिला कधी कळावं
अस तू उगाचच गुनगुनाव
मनातून तुलाही वाटत 
मी असच राहावं
तू काढलेल्या फोटोमध्ये
मी खळखळून हसावं
आणि मी तुला असच 
लपून छपून बघावं लपून छपून

कवी - के. गणेश

आयुष्य कळून जातं..

read more
आयुष्य कळून जातं..

एक चुराडा झालेलं स्वप्न
थरथरत्या ओंजळीतून गळताना.
फाटून जातं मनाचं आभाळ
अश्रू स्वाभिमानाचे ढाळताना..

इथं रक्ताची नातीही
परक्यासारखी वागू लागतात..
सावत्र आईच्या नजरेने
दुरून बघू लागतात..

पाण्यावाचून वाळलेल्या झाडाचं
उन्हालाही काही कळत नाही..
ढग भरून आल्याशिवाय
खाली थेंबही गळत नाही..

गिळून घेतलेला आपमान
धमन्यातून उसळत राहतो..
इथं दुनियेच्या ईर्षेनं
जीव तळमळत राहतो..

निव्वळ वाऱ्याच्या वणव्यात
अख्खं वय जळून जातं..
शून्यातून वर येताना
आयुष्य कळून जातं..!
copyright @kganesh
9028110509 आयुष्य कळून जातं..

Vilas Bhoir

एकदा वळून मागे पहा....... #LoveYouDad #poem

read more
एकदा वळून मागे पहा 
गुंतलेले ह्रदय कसे सोडवु 
दुर जाताना तुला पाहून 
ओघळणारे अश्रु कसे आडवु 

व्याकुळ होतोय जीव माझा 
भंगुन जाईल स्वप्न उद्याचे 
समजुन नाही घेतलेस तू तर 
बंद होईल कवाड मनाचे 

नातं आपलं मैत्री पलिकडचं
तुझ्या माझ्या श्वासात विरघळतं 
रुसवे फुगवे काही नसतानाही 
कुणास ठाऊक का? हिरमुसतं

पाहिलेस तु वळून माझ्याकडे 
पाणावळ्या डोळ्यात आनंदाश्रू न्हाले
कवेत घेशील मजला म्हणून 
तुझ्या हातात हात दिले 

बोलून बघ एकदा माझ्याशी 
प्रेमरंगात बहरून येईल काही 
तुही म्हणशील पुन्हा नव्याने 
मैत्रीची साथ सोडणार नाही 

                              ~ विलास भोईर 
                           ( एकदा वळून मागे पहा )

©Vilas Bhoir एकदा वळून मागे पहा.......

#LoveYouDad

padvishal...Mumbai maharashtra

#MainAurMaa आनंद घ्या त्या दिवसाचा.. #मराठीविचार

read more
mute video

Sachin dute_official

poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

read more
"मी निपुत्रिक बरी होते.

होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा.
सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा.
केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे.
जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...!
 
चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला.
बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला.
आईने दंडवत देवी,जगदंबा घातला.
नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!!

फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा.
उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा.
आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया.
जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!!

येता यौवन बाळा तू, घात कसा केला.
आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला.
आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली.
क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!!

बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले.
तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले.
जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन.
गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!!

असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते.
जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते.
सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला,
कमी पडलं असेल काही,माफ कर तू  आम्हाला..!!!
                           
                                               सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

R.K.

पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।

read more
आजकाल मुलींबरोबर मुलांना जास्त संस्कार देण्याची गरज आहे कारण प्रत्येक घरात मुलींना सांगितलं जातं की घरी लवकर येत जा म्हणून पण त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की 8 च्या आत घरात पाहिजे।
R.K. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile