Nojoto: Largest Storytelling Platform

New चिमणी पाखरं मराठी पिक्चर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चिमणी पाखरं मराठी पिक्चर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिमणी पाखरं मराठी पिक्चर.

    PopularLatestVideo

Ganesh Shinde

पाखरुच ते, घरट्यात राखिले जे,
आज ना उद्या उडायचे होते,
विसरलो आपले पाश प्रेमाचे,
वेळीच वेगळे तोडायचे होते,

गुंतलो त्यात इतुके ऐसे की 
मनी ओढ फार लागली,
भुर्रकन उडून जाता ते ऐसेची,
मनी ओढाताण फार झाली,

क्षणाक्षणाच्या जोडूनि नाना काड्या,
मनामनातून विणल्या चित्त रमाय,
भावनांचे किती रेखिले घरटे सुरेख,
चित्त पाखरू कधी तेथे स्थिरते काय? #पाखरू #विरह #मराठी #कविता #yq_gns

Kailas Tidke

ते बघ, सूर्यान पृथ्वीला बाहुपाशात घेतलं...
या घायाळ चिमनीला
का तू एकट सोडलं?
                       ®कैलास #चिमणी

Kailas Tidke

ओसाड माळरानावरचा निष्पर्ण वृक्ष कानात कुजबुजला त्याचे अश्रू वेचतांना../
"मन मोकळं करावं जेव्हा पाखर मुक्कामी असतात..
कारण परतीचा प्रवास नसतो काही पाखरांना.."//
®कवी कैलास #पाखरं

SK

पाखरं

read more
निर्भीडपणे वावरणारी,
जणू या जगाची ठाकरं..
खिडकीत मला दिसलेली,
ती पावसातली पाखरं..!!

पावसात चिंब भिजणारी,
पंखाने ती धडपडणारी..
मधुर कल्लोळ करणारी,
ती पावसातली पाखरं..!!

थोडीशी ती शहारलेली,
खिडकीमध्ये बहरलेली..
आडोशाला बिथरलेली,
ती पावसातली पाखरं..!!

जाण्यासाठी आवरलेली,
दाण्यासाठी सावरलेली..
पिल्लांस भेटण्या आतुरलेली,
ती पावसातली पाखरं..!!

अचानक पाऊस थांबला,
मग यांची उडण्याची नखरं...
नुकतीच खिडकीत मी पाहिली,
ती पावसातली पाखरं...!!!
✍🏻💖 पाखरं

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

Silkesha S.

चिमणी स्वप्न....

read more
...................... चिमणी स्वप्न....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile