Nojoto: Largest Storytelling Platform

New सावळा मुरलीवाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सावळा मुरलीवाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावळा मुरलीवाला.

Related Stories

    PopularLatestVideo

Jain Saroj

mute video

सुमन

घन सावळा....

read more
घन सावळे दाटून येता
राधा का व्याकूळ होते,
संभार सरींचा झेलत
क्रुष्ण रंगाने न्हाते...

कर धारांचे होऊन
क्रुष्ण अलिंगन देतो,
आषाढ अंगोपांगी
क्रुष्णमय होऊन जातो... घन सावळा....

Archana Pol

मेघ सावळा #मराठीकविता

read more
भाळावरुनी मेघ सावळा,
कृष्णनभाच्या आला.
क्षण भेटूनी मनास माझ्या,
मृदगंधाचा गेला.

तरारलेला थेंब टपोरा,
विसावलेला भाळी,
स्पर्शासाठी आतुरलेली,
अधीर धरणी काळी.

प्रणय सुखाच्या आठवणींनी,
रोमांचित तन ओले.
स्पर्श लाजरा मनात दाटे,
अधर गुलाबी झाले.

मेघ सावळे उतरुन रानी,
सुगंध पसरत  गेले.
धुंद मोहरुन आली काया,
भिजले तनमन ओले.

अवघ्या देही रुतली माया,
कृतार्थ जीवन झाले.
गर्भातुन कोवळे धरेच्या,
कोंब तरारुन आले.

©Archana Pol मेघ सावळा

Sunil Zarikar

रंग तुझा सावळा ...

read more

रंग तुझा सावळा ...
  तुझ्या रूपाचे
    नयनी काजळ..!!
करिते अर्पण तुला..
  मुग्ध मनाची
    करुनी ओंजळ..!!! 
रंग तुझा सावळा ...

Deepali Ghoge

सखा सावळा..
कधी इंद्रायणी काठी 
कधी यमुनेच्या तीरी..
कधी होऊन सावळा घनी
बरसतो मनोमनी... #कृष्णसखा #सावळा #विठ्ठलविठ्ठल

shivani dhote.

सावळा श्री हरी.‌..😇 #Janamashtmi2020

read more
मोरपीस डोक्यावरी डौलत भारी...
आला अंगणी कृष्ण मुरारी.

यमुनेच्या तीरी घेऊन बांसरी..
साद घालीत असे बांवरी.
लावण्या वेड आला अंगणी कृष्ण मुरारी.

कारुण्य मनी जपण्यास,
राधेचं प्रेम मनी अनुभवण्यास..
जोडण्या सावळ्या रेशीमगाठी..
आला अंगणी कृष्ण मुरारी.

करुनी कृष्णलीला अगाध..
घेतो सवंगड्यांची साथ.
गोकुळ सारे त्याच्याच प्रतिती..
मज शामसुख मिळाले भारी
आला अंगणी कृष्ण मुरारी..
                                                                                               -शिवानी...💖 सावळा श्री हरी.‌..😇

#Janamashtmi2020

Shankar kamble

आसावला जीव।ओसंडला भाव।
अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।।

कातर मनाला।आठवं क्षणाला।
काकडा ओवला।देहरूपी।।२।।

मनं ओढावते।दर्शनांते आस।
जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।।

तोडीयले बंध।पाश मायारुपी।
अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।।

काय करू सांग।चित्त उसवले।
पाहतो वाटुले।पंढरीची।।५।।

अंतरी उमाळा।तोची घननीळा।
सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।।

नाद प्रसवला।परब्रह्म देहीं।
मनाचियां डोही।नाद रंगे।।७।।

देहादेही एक।भाव समरूप।
पापांचे कळप।सुटती बां।।८।।

मागणें न दुजें।आतां उरे काही।
मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।।

श्री. शंकर नागनाथ कांबळे

©Shankar kamble #वारी 
#विठ्ठल 
#पंढरपूर 
#माऊली 
#वारी_जांऊ 
#पांडुरंग 
#विठ्ठल_रखुमाई 
#सावळा

अल्पेश सोलकर

नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे सावळा रंग हा माझा... चला तर मग लिहा पटपट... #सावळा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating wit

read more
सावळा रंग हा माझा..
सांग तुला शोभेल का..?
 जत्रेत तू माझ्या सोबत
बिनधास्त तू फिरशील का...?
          हाच माझा जीवनसाथी..
          ठाम पणे सांगशील का..?
          होईल जेव्हा रंगावरून विनोद
         सांग त्यांना तू आवर घालशील का..?
सखा साजना तुझा सखे सावळा ग..
सांग सुखाने नांदशील का..?
वाटलं चुकीचं काही /हवा बदल थोडा
थेट माझ्याशी मांडशील का..?
        लाखात एक असा तुझ्याच पसंतीचा..
        सांग आता आपलासा करशील का..?
        नको प्रियशी आता..नको बायको म्हणून घेऊ..
       " कारभारी न " अशी हाक माझी ऐकून घेशील का..?
 नमस्कार मित्रांनो
आजचा विषय आहे
सावळा रंग हा माझा...
   चला तर मग लिहा पटपट...
#सावळा 
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating wit

Shilpa ek Shaayaraa

#Sawalaa_Rang #Kuchh_Taarife_Apni_Bhi #Shilpa_Ek_Shayaraa #वेणी_जणू_नागीन असे काळी त्यात मोगरा तू माळला सखे सावळा रंग तुझा वेड लावी मला तुझ् #translation #ShilpaSalve358

read more
वेणी जणू नागीन असे काळी
त्यात मोगरा तू माळला सखे
सावळा रंग तुझा वेड लावी जीवा
तुझ्यावर जीव हा भाळला सखे
#Shilpa #Sawalaa_Rang #Kuchh_Taarife_Apni_Bhi
#Shilpa_Ek_Shayaraa
#वेणी_जणू_नागीन असे काळी
त्यात मोगरा तू माळला सखे
सावळा रंग तुझा वेड लावी मला
तुझ्

Prakharlikhtehain

कृष्ण की लीला कृष्ण ही जाने सभी गोपिकाएं उसे अपना ही माने मटकी फोड़ खाता है वो माखनचोर माखन खाकर छुप सा जाता जब कोई मचाता शोर।। बड़ा नटखट है #Love #Krishna #janmashtami

read more
कृष्ण की लीला कृष्ण ही जाने
सभी गोपिकाएं उसे अपना ही माने
मटकी फोड़ खाता है वो माखनचोर
माखन खाकर छुप सा जाता
जब कोई मचाता शोर।।

बड़ा नटखट है ये मुरलीवाला
पूछे राधा क्यों गोरी
 मैं क्यों काला

ब्रज में खड़ा पकड़े गोपियों की बईयां
थामे मुरली कहलाया 
कृष्णा कन्हैया रास रचैया कृष्ण की लीला कृष्ण ही जाने
सभी गोपिकाएं उसे अपना ही माने
मटकी फोड़ खाता है वो माखनचोर
माखन खाकर छुप सा जाता
जब कोई मचाता शोर।।

बड़ा नटखट है
loader
Home
Explore
Events
Notification
Profile