Find the Latest Status about तयार राहावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तयार राहावे.
Sujata Bhalerao
दिवा विझण्याआधी वाचवा अंधाराला उजळून टाकण्यासाठी चटका बसणार नाही ना हे बाकी आपणच पाहायचं जेवढी काळजी त्याची घेऊ तो साथसंगत करेल आपली तो माणसासारखा अजिबात नाही आपणांस निरंतर देत राहिल अगदी विझेपर्यंत प्रकाश आणि साथ दोन्ही ©Sujata Bhalerao जीवनगाणे #गातच राहावे
Sujata Bhalerao
आदरणीय राष्ट्रपती साहिबा..... आम्हां सर्व महिला वर्गाला . आपल्याबद्दल प्रचंड अभिमान वाटतो 🙏👍 आपले मनापासून खूप खूप अभिनंदन 🙌💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे बालकवी 🌾🌱🌿🍃☘️🪴🌴🌳🌲 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
निसटत चाललं आहे सारं काही पण अजूनही वेळ आहे सावरण्याचा प्रयत्न करुया आवरुया स्वतःला आणि गुंतलेल्या पाशातून मुक्त करुया मोकळा श्वास घेण्यासाठी सारं संपण्याआधी फक्त एकदाच प्रयत्न करुया... ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
खुर्चीचा मोह काही आगळाच मी मी म्हणणाराला झटकन उतरवती कधी पैशाचा लोभ दाखवून तर कधी.... पैशांचीच घालून भिती कैक गारद होती खुर्चीच्या मोहापायी भारुन टाकते अंतर्बाह्य हे येड्या गबाळ्याचे काम नसे नक्कीच किती आले अन् किती गेले गिनतीच नाही उरली ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
येणारी प्रत्येक सकाळ न्हाऊन निघू दे सुगंधी फुलांसारखी मोहरु दे प्रत्येक क्षण फुलोऱ्यासारखा आकाशी जाऊ दे बहर फुलांचा आसमंतात दरवळू दे जीवनगाथा निरभ्र होऊ दे माझे जीवनगाणे स्वच्छंदी होऊ दे सर्वांचेच जगणे 💫🙌 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
किती मनमोहक किती ते आरस्पानी नैसर्गिक सौंदर्य एकटक पहात रहावं डोळ्यात साठवून ठेवाव अनोखं रुप तुझं गंधाळलेले ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
आपल्याला सर्वजण सोडून गेले तरी ... आपल्या सोबत सदैव साथ जिची ती आपली सावली ... सावली कधी गडद तर कधी फिकी सावली कधी लहान तर कधी मोठी .... आपल्याच सावलीला घाबरुन कसं चालेल तीच करेल सोबत शेवटच्या श्वासापर्यंत ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
हा प्रकाश मज वाटे शीतल अन् हवाहवा... जणू या झाडामागे चंद्र असे झोपलेला... ते चांदणे टिपोरे चंद्रमाही पौर्णिमेचा... उजळून आले सारे अवघेअंधारलेले जग... लख्ख प्रकाश सारा काळोख कुठेच नसे... तेजोमय धरती सारी मजला खुणावते आहे ... ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे