Nojoto: Largest Storytelling Platform

New आजकालचे राजकारण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आजकालचे राजकारण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आजकालचे राजकारण.

    PopularLatestVideo

Rushikesh Ujawala Maharao

राजकारण..

read more
ज्यांची योग्यता नव्हती 
ते पंतप्रधान झाले.... 
अच्छे दिन आयेंगे म्हणता म्हणता 
त्यांचे अच्छे दिन आले... 

पंतप्रधान होण्यासाठी त्यावेळी चहाच भांडवल झाल... 
जरा आठवुन सांगा चहाच्या टपरीवर कोण चहा पिल... 
 राजकारण..

prayag pawar

राजकारण...

करतात सत्तेसाठी नुसती हाव-हाव
शेतकऱ्यांच्या मालाला नसे काडीचा भाव
निवडणुका जश्या येतील तोंडी,
करतील प्रचाराची नुसतीच कोंडी

लाखो मतांतून निवडून येते एक नाव 
अन् गुलाल उधळतो गावो गाव
नेता आमचा काही पाच वर्षे टिकेना
जसा ताजा भाजीपाला मार्केट ला विकेना...

अतरंगी राजकारण्यांच्या अतरंगी खेळ्या
मात्र, पोलिस दादांच्या रात्र-दिवस पाळ्या
पडलेत यांचे विक्रमी आघाडीचे गट
अन् नुसतेच करतात एकमेकांवर कट

यांच्या नादात माझा देश पाठी राहतोय
सामान्य माणूस मात्र भरडला जातोय
दूरवर राहिलाय माझ्या देशाचा विकास
इतके 'राजकारण' चाललंय भकास...

©prayag pawar #राजकारण

somnath gawade

राजकारण

read more
     राजकारणात
'पोपटपंच्छी' करणाऱ्यांना
  कुठल्यातरी 'पक्षाच्या'
पिंजऱ्यात अडकविले जाते!
 राजकारण

Ganesh Divekar

राजकारण

read more
"निवडणुका जवळ येताच लबाड माकड जागी होतात
या पक्षातुन त्या पक्षात माकड उडया घेतात
वा-याची दिशा ओळखुनच ही चालतात
जनतेच्या हितासाठी वरुन अस बोलतात"

भ्रष्टाचाराने होरपळली जनता नसत कुणा देण घेण
नसत दुसर कारण
सत्तेच्या खुर्चिसाठी चालत फक्त राजकारण
चालत फक्त राजकारण....

पक्ष एकमेकांचे वाभाडे काढतात लोकांमध्ये गट तट पडतात
तेव्हा आमचे नेते घडतात 
मागे कोण हटेना ना कोणीच येईना शरण..

शासकीय शैक्षणिक सामाजिक क्षेञांचे बाजारीकरण झाले
सामान्य जण गोर गरीब कष्ट उपसुन मेले
सांगा आर्थिक विषमतेची दरी केव्हा भरण
ज्याच्या अन्नधान्यावर देश जगतो
त्याचेच बेकारीच्या आगीने जळत इथ सरण..

पैसा उधळुन निवडणुका लढल्या जातात
पुन्हा हिच गिधाड समाज तोडुन खातात
समाजसेवेच्या  पाघरुना   खाली-गुदमरुण लोकशाहीचे होत आहे
मरण...
सत्तेच्या खुर्चिसाठी चालत फक्त राजकारण..
चालत फक्त राजकारण
                         @गणेश दिवेकर@ राजकारण

DIPRESH SAWANT

mute video

9it book

राजकारण #विनोदी

read more
mute video

suresh pawar

सत्तेची ओढाताण 
नेमकं कोण टाकतयं गुगली
धोनी विराट पण झाले हैराण
टीम मध्ये कसा आला गांगुली
सुरेश पवार #राजकारण

Devanand Jadhav

राजकारण #मराठीकविता

read more
°फंद फितुरी° 

फंद फितुरी खूपच झाली 
गेला उभ्या सह्याद्रीला तडा !
गेले कावळे नी उरले मावळे  
सैनिकांनो आता जोमाने लढा ! ॥ धृ ॥ 

सुरा जहरी खुपसून पाठी 
सत्तेसाठी तो पहा उलटला !
खाल्ल्या घरचेच वासे मोजून 
मातेवरच कसा पलटला ? 
म्हणूनच म्हणतो...
गेले कावळे नी... जोमाने लढा ! ॥ १ ॥ 

अमिष आणि धाक दाखवून 
एकेक कसून बांधली मुळी
शिवबंधन दिले झुगारून 
जन्मा घातली लाचार टोळी 
म्हणूनच म्हणतो...
गेले कावळे नी... जोमाने लढा ! ॥ २ ॥ 

मातेचे दूध विसरले त्यांनी 
शिवबंधन उमगले नाही 
निमिष खुर्चीच्या मोहापायी 
मारून टाकली लोकशाही !
म्हणूनच म्हणतो...
गेले कावळे नी... जोमाने लढा ! ॥ ३ ॥ 


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav राजकारण

Devanand Jadhav

राजकारण #मराठीकविता

read more
°सत्तांतर° 

सत्तापिपासू कसे खेळती खेळी 
सामान्यांचा जातोय रोजच बळी 
सर्व काही अळी मिळी गुप चिळी 
आता तुझी पाळी मीच देतो टाळी 

बंडखोरांच्या बंडाला झाली घाई 
सगळे भरभर सुटले पायी
बाप्यांच्या गोतावळ्यात एकच बाई 
मेंढ्यांच्या कळपात ती गाई अंगाई 

बाराभाईं करणार कारभार 
देवून बुडतीला काडीचा आधार 
इथे रात्र थोडी पण सोंगे फार 
खायला कहार नी भुईला भार  

कार्यकर्ता घालून थकला गाद्या 
एक ना धड भाराभर चिंध्या 
सगळंच दिसल आज ना उद्या 
शेखचिल्ली कसं तोडतंय फांद्या 

ऊसा बरोबर एरंडाला पाणी 
कसायाला गाय होणार धार्जिणी
मनी ना ध्यानी नी तूच माझा धनी 
नकटीच्या लग्नाला सतरा जनी 

कुक्कुलं बाळ झोळीत वाढवलं 
मोठं झाल्यावर डोक्याव बसलं 
सगळं काही जमवून आणलं 
गंगेत एकदाचं घोडं बुडवलं 

कोण सुभेदार नी कोण शिलेदार 
आयजीच्या जीवाव बायजी उदार
जमला सारा उठावळांचा बाजार
उंडगीला मिळाला आयता शेजार 


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav राजकारण

somnath gawade

राजकारण

read more
   'प्रेमात' आणि 'युद्धात'
  सर्व काही माफ असतं.
 आता त्यात 'राजकारणाने'
       प्रवेश केलाय.
 राजकारण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile