Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवणकाम व्यवसाय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवणकाम व्यवसाय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवणकाम व्यवसाय.

    PopularLatestVideo

Shivram Masurkar

मनी नाचला मोर
पाहुनी आंब्याचा मोहर..
सुगंध पसरला दूरदूर
मनी फुलला गुलमोगर.. #शिवराम

Shivram Masurkar

हरवलेल्या माझ्या नात्यांना
या मीडियाने जवळ आणिले
आणुनी फक्त दावणीला बांधले
नात्यातले संवाद मुकेच राहिले

पूर्वीची पत्रे साधीच होती
शब्दांत मात्र ओलावा होता
दूर कोसवर असलो तरीही
नात्यात मात्र गोडवा होता

कितीही वेळा वाचले तरीही
पत्र पुन्हा पुन्हा वाचायचो
कधी वाटले एकटेपण तर
पत्रच घट्ट उराशी धरायचो

हृदयाचे भाव शब्दांत मांडणारी
आपुलकीची पत्रे हरवून गेली
मृगजळासम आभासी दुनियेत
जवळची नाती मात्र सुकून गेली #शिवराम

Shivram Masurkar

तू माझ्या जीवनात यावे
अपेक्षा नाही माझ्या मनाची
मात्र तू माझे जीवन व्हावे
हीच इच्छा माझ्या जीवनाची #शिवराम

Shivram Khatik Shivram

शिवराम #लव

read more
mute video

Shivram Masurkar

जगातल्या साऱ्याच अपरिचित गोष्टी
गूगल काढतो खोदून ...
माझ्यातला फक्त मी नाही सापडला
तोही थकला शोधून ... #शिवनाम

Shivram Masurkar

सुंदर दिवस होते
तुझ्या सोबतच्या क्षणांचे
नकळत धागे गुंतले
तुझ्या माझ्या मैत्रीचे 

आठवण येता तुझी
अचानक तुला भेटणे
पाहताच मला तुझे 
ते खळखळून हसणे

पाहून हसरा चेहरा
हृदयात माझ्या बसलीस 
फुलवून क्षणांचा वसंत
भुर्रकन उडुनही गेलीस

येशील सखे पुन्हा
मनात एकच आशा
उजळून टाकूया पुन्हा
गोड मैत्रीच्या दाहीदिशा #शिवनाम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile