Find the Latest Status about देशाच्या राजधानी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देशाच्या राजधानी.
Dharmendra Gopatwar
📝 दगडाचा दैव -✍️ दगडाचा दैव तो , हृदय त्याचे पाषाण फुटेना घाम दाटेना अश्रू दगडाचा दैव हा., त्याचे हृदय जणू पाषाण .. भक्ती भावाने पूजिले मी त्याला त्यासी काय ठाव माझी तहान तळमळतो जीव हा गहिवरते प्राण , मनुज मी दैव तो तळमळ माझी निवांत बघतो दगडाचा दैव तो हृदय त्याचे पाषाण.. हृदयस्थ जप त्यासी ऐकू न जाई., केला तप त्यासी उरे न मूल्यमाप अळकला कंठस्त प्राण ह्रदयशून्य दैव माझा - भावशुन्य विधाता.. दगडाचा दैव माझा काळीज त्याचे पाषाण संकटांशी झुंज जिवी लिहिली त्याने विधान जीव सारे मोहरे त्याची लिहीली त्याने जीवा या सुख दुःखाची विधी विधान ; जगी या रंगमंचावर सुख दुःखाच्या दोरीवर खेळविनाऱ्या त्या देवाला बघण्याची जाब विचारायला खेळ हा कशासाठी ! संधी मजला मिळेल काय ? त्याला बघण्याची जल्मी या तहान मिटेल काय ? जरी असला तो दगडाचा दैव आणि काळीज त्याचं पाषाण परि या जीवाची हाक ., तोच श्रेष्ठ महान , लिहिली त्याने सुख दुःखाची कलमे जरी बनविला संविधान ; दगडाचा दैव माझा हृदय मात्र त्याचे पाषाण. कवी _ ध . वि . गोपतवार 📔कवि मन - मनातलं ओझं पानावर ©Dharmendra Gopatwar #दगडाच्या दैव
शब्दवेडा किशोर
किणकिणता जेव्हा ती सुरेल घंटा निनादे गगनी मग श्रवणीय नांदीचा तो सुर मलमली तो रेशमी पडदा हलकेच होता दुर रंगाची उधळण होते मग रंगकर्मीच्या चेहऱ्यावर जीवनानुभवाचे मग नाट्यस्वरूपी दर्शन घडते तेव्हा रसिकांसमोर कधी गणोबा कधी श्रीरंग कधी अकबर व पिटर कधी मानसी कधी मेहरूनिसा कधी ॲलेक्सा कधी माधवी तर कधी चक्क नटश्रेषष्ठ गणपतराव बेलवलकर अशा विविधांगी रूपाचे तो रंगकर्मी रसिकांना सतत दर्शन देई त्या रंगभुमीवर कधी हसु तर कधी आसवांचा आणीता महापुर शेवटच्या श्वासापर्यंत रंगकर्मी सत्वर रंगभुमीवर करीतसे निष्ठेने सर्वकलांचा जागर करावया लोकांचे मनोरंजन तो कायम जपतसे स्वतःमध्ये मग चौसष्ठकलेचे हे अद्भुत माहेरघर सर्व रसिक प्रेक्षक अन् माझ्या चाहत्यांना माझ्याकडून जागतिक रंगभुमी दिनाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा सर्वहक्क लेखकाअधीन आहेत. copy pest केल्यास कडक कायदेशीर कारवाई होईल. ©शब्दवेडा किशोर #रंगमुभुमी दिनाच्या शुभेच्छा
Rohini Pande
स्मरणगंधित त्या लाघव वेळा मोगऱ्यासम दरवळणाऱ्या, कुंतलात त्या माळताना तव स्पर्शात विरघळणाऱ्या..! मिठास मिठीची भारीच मिठी रोमांच तनावर येई न्यारा, क्षण धुंदीतले बेधुंदसे फुलतो मनाचा प्रीतपिसारा..! रंग प्रणयी मिठीत सजता तुझ्यात माझा विरघळ व्हावा, श्वास कंपने तनामनांची क्षण क्षण तो रोमांचित व्हावा..! अभिलाषी त्या क्षणी न तृप्तता ओढ मिठीची तुझ्या प्रवाही, अवीट मधुर प्रणयगंधाची मिळे मधु मिठीत ग्वाही.. रोहिणी पांडे मिठी दिनाच्या शुभेच्छा
अश्लेष माडे (प्रीत कवी )
मैत्री 1)नुसतं दिलासा देऊन हे मन मानत नसतं, कारण, मैत्रीचं खरं स्थान हे खांद्यावरच्या हातात असतं.. 2)कधीकधी छळतो हा एकांतवास त्या जिवलग मित्रांविना, आयुष्यात मज्जाच राहिली नाही त्या खोडकर मित्रांविना.. 3)नको अशी मैत्री नुसती गरजेपूर्ती हाक देणारी, मैत्री असावी तर फक्त सुखदुःखात साथ देणारी.. 4)तुझं आणि माझं मैत्रीचं नातं असंच निस्वार्थ सदैव राहू दे, लोकं जळायला हवेत आपल्या मैत्रीला अशी अतूट मैत्री कायम राहू दे.. 5) बालपणापासून, तारुण्यपण तारुण्यापासून ते म्हातारपण, आपली मैत्री कधी तुटणार नाही मित्रा, तुझ्यासाठी कधीपण आणि काहीपण..... (अश्लेष माडे, प्रीत ) गोंदिया मैत्री दिनाच्या शुभेच्छा
dipali kumawat
रमले ज्यांच्या सवे मी, रंगले ज्यांच्यात मी, त्यांची सोबत आहे म्हणून.. लॉक डाऊन मध्ये सुद्धा घेते जगण्याचा आनंद मी... रंगबिरंगी ज्यांची दुनिया स्वप्नाहूनही निराळी कधी रहस्य तर, कधी भीती मय, कधी प्रेम, तर कधी अशांत. कधी असते अगदी निरामय... सोबत ज्याच्या मन हे रमते.. काळवेळ न जाणे कधी संपते, कधी करतो निसर्ग वर्णन, तर कधी सांगतो आत्मचिंतन.. कधी रेखितो चित्र मनाचे, कल्पनांचे, भावनांचे... भयं, प्रेम, चिंता, लोभ, मोह राग, माया.. सर्वच मिळ्ते पाहावया.. कधी आरोग्यदायी, तर कधी ज्ञानदायी, कधी मनोरंजक तर कधी प्रेरणादायी.. असे आहेत माझे सोबती.. "पुस्तकं "ज्यांना सगळे म्हणती.... पुस्तकं दिनाच्या शुभेच्छा *** पुस्तकं दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ***