Nojoto: Largest Storytelling Platform

New अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अभंग.

Related Stories

    PopularLatestVideo

Shankar kamble

*तत्वज्ञान सार।आयुष्याचे सोपे।* 
 *उपकारा तापे।तोची धन्य।* 

 *दुःखाला फुंकर।मायेची झालर।* 
 *दुबळ्याला धीर।होय खरा।* 

 *भुकेलेल्या घास।तहानेल्या नीर।* 
 *रहावे खंबीर।सत्यमार्गी।* 

 *साऱ्यांप्रती मनीं।जपा प्रेमभाव।* 
 *किल्मिषाचे डाव।उलथावे।* 

 *काम, क्रोध रिपू।जाळावे अंतरी।* 
 *निर्मळ उदरी।गंगाजळे।* 

 *कष्टाची भाकरी।नको लाचखोरी।* 
 *असावी पदरी।रूपे चार।* 

 *मृदू वाचा मुखी।नीतं नम्र वदे।* 
 *पावन ती पदे।त्रैलोक्यात।* 

 *निरवावे मनं।सज्जनाची खूण।* 
 *आपला तो जाण। म्हणा सदा।* 

 *भंगुर जीवनी।शाश्वत हे सुखं।* 
 *उल्हासित मुख।स्वकारणे।* 

 *रीते हाती आलो।रितेच जायचे।* 
 *कस्तुरी गंधाचे ।प्रेम ठसे।*

©Shankar kamble #अभंग #संत #रचना #अभंगगाथा #अभंगवाणी 

#Butterfly

Rajendrakumar Jagannath Bhosale

संतांचे विचार, जो करी स्वीकार
जीवनाचे सार,अनुभवे ll धll 

जुन्याकवणात,शब्द गोंजारत,
अहंम जपत, नित्य बसे ll1ll

अभंग रचना, ईश्वरी कामना,
अंतरी प्रेरणा, येत असे ll2ll

वेची हरी कण,झाकोनि नयन, 
न उमजे मन,राजे म्हणे ll3ll

©rajendrakumar bhosale #अभंग4

#MereKhayaal

Rajendrakumar Jagannath Bhosale

आजचा अभंग

अहंमाचा मेरू, विषयाने घेरू,
अविवेकी येरू, निरर्थक ll धृ ll

उघडे निर्गुण, संत आचरण
निर्मळ सु-मन, मोक्ष रेघे ll 1ll

जाणते न भाजे, हरिनाम वाजे
विठ्ठल विराजे, राजे म्हणेll2ll

कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले 
मो. क्र.9325584845

©Rajendrakumar Jagannath Bhosale #अभंगवेद

#Advance

Rajendrakumar Jagannath Bhosale

mute video

Ganesh Shewale

#krishna_flute अभंगपुरुष

read more
mute video

Devanand Jadhav

अभंगवाणी~विठ्ठलाचे नाम... #मराठीकविता

read more
°अभंगवाणी~विठ्ठलाचे नाम° 

विठ्ठलाचे नाम l घेता हो मुखानी ll 
समाधान मनी l पावे शांती ॥ १ ॥ 

काय गोड नाम l तुझे असे देवा ll
मजसी केशवा l तुझा छंद ॥ २ ॥ 

कीर्ती तिन्ही लोकी l तुझी आहे अशी ll 
भेट द्या मजसी l विठू राया ॥ ३ ॥ 

मकर कुंडले l देखिताची कानी ll
वसे ध्यानी मनी l तो श्रीरंग ॥ ४ ॥ 

कौस्तुभाचा मनी l रूळताहे कंठी ll
टिळा तो लल्लाटी l चंदनाचा ॥ ५ ॥ 

चार वेद जणू l असे तुझे भाट ll
असा थाटमाट l नाही कोठे ॥ ६ ॥ 

चारी मुक्ती तुझ्या l करिताहे सेवा ll
तुजसम देवा l नसे जगी ॥ ७ ॥  

राई रुखमाई l सेवेस तत्परी ll
हरी हो श्रीहरी l तो वल्लभ ॥ ८ ॥ 

कर्तव्याची जाण l सदा असे तुज ll
मनीचिये गुज l जाणताहे ॥ ९ ॥ 

तुझा तो महिमा l असे हो महान ll 
तूचि किर्तीवान l पांडुरंगा ॥ १० ॥ 

देवा मागताहे l घडो तुझी सेवा ll 
एकमेव ठेवा l द्या मजसी ॥ ११ ॥ 

✍🏻©•देवानंद जाधव• 
•धामणी, पुणे.•
• jdevad@gmail.com• 
•9892800137•

©Devanand Jadhav अभंगवाणी~विठ्ठलाचे नाम...

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

Archana Pol

अभंग #poem

read more
मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह।
संसाराचा मोह । सुटो आता ।।१।।

नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध 
मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।।

वासनेचा जाळ । आगीचे मोहळ
देहाचा विटाळ । जळो आता ।।३।।

भावनांचा खेळ। सुखाचे साधन
गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।।

भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा
संतसंग जीवा । जडो देवा ।।५।।

तुझीया भेटीने । उजळो जीवन
हरपावे भान । आनंदाने ।।६।।

©Archana Pol अभंग

vaishali

# अभंग #

read more
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼

मनमंदिरात | तूच आहे देवा || 
सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| 

कर जोडुनिया | तुला विनविते || 
साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| 

सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे ||
आहे हे सांगणे | तुजपाशी ||३||

कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || 
दरवळे गधं | चोहीकडे ||४||

तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ ||
साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #

Mohan Somalkar

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile