Nojoto: Largest Storytelling Platform

New शेतकरी अडचणीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेतकरी अडचणीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेतकरी अडचणीत.

    PopularLatestVideo

शब्दाचा जादूगार

कित्येकांच्या अडचणी हिमतीने सोडवणारा माणूस मात्र स्वतःच्या अडचणीत अडकलेला असतो.!#philosophy #मराठीविचार

read more
कित्येकांच्या अडचणी हिमतीने सोडवणारा माणूस मात्र स्वतःच्या अडचणीत अडकलेला असतो.!

©शब्दाचा जादूगार कित्येकांच्या अडचणी हिमतीने सोडवणारा माणूस मात्र स्वतःच्या अडचणीत अडकलेला असतो.!#philosophy

Shankar kamble

सुगी सराईचं दिस नाही इसावा पायाला माय माळ तुडविते                   चार मोत्याच्या दाण्याला..   
भर उन्हाचा काहूर भिजं घामानं पदर
 आग पोटात पेटली  चिल्या-पिल्याचा इचार...
  धाटं-धाटं जमवूनी भारा जोंधळ्याचा डोई लयी तापली ढेकळं भार संसाराचा वाही...
  काट्या-कुट्यात चालता देह -मनाला जखमां* 
  *घाली फुंकर स्वतःच चिंधी बांधते त्या कर्मा* ...
    अंग मोडूनियां काम नाही घडीचा आराम* 
   वात तीळ तीळ जळे दिव्यासंग ज्योत ठाम...* 
 *घोट पिऊनिया पाणी दूर सारते भुकेला* 
  शिळ्या तुकड्या संगती पचविते नशिबाला...* 
 सांज ढळता-ढळता रास सरली-सरली* 
 ऊत आला तुझ्या दारी झोळी अर्धी भरली...* 
   मोती झोळीत की डोळा    दोन्ही नाहीत येगळा* 
 * घास भरविते माय सारा अमृत सोहळा...*

©Shankar kamble #सुगीचे #रास #शेतकरी #🎑शेती #शेती 

#SunSet

Abhijeet Jagtap

निसर्ग अन् शेतकरी

 निसर्गाला वाटते दमला आहे
  माझा शेतकरी...
तेव्हा तो बरसवतो सरी आपुलकीने..
किलबिलाट तव उठतो पावश्या घुम पावश्या घुम्
जणू धरणीमाय कवटाळते त्याला लेकराप्रमाने..

साथीला येतात बुबुळासारखे ढग..
अन् कथ्थक करतो तो मोर नाचरा..
बरसतात सरी एकामागून एक..
जणू वसुजानकीचा तो कृष्ण हासरा..

शेतकरी आणि निसर्ग म्हणजे जणू सख्खे भाऊ..
एकत्र आले तर बनतील हे अख्ख्या गावाचे राव..
अन् गेले विरोधी एकमेकांच्या..
तर यांना रंकाचाही मिळणार नाही भाव..

साथ दे निसर्गा , वाट दे निसर्गा..
कष्टाची होऊदे चीज त्याच्या..
आजवर झेलली खूप दुःखे त्याने..
त्यास दिसुदे एकदा सुखाची पहाट निसर्गा...
त्यास दिसुदे एकदा सुखाची पहाट निसर्गा...

                                   -अभि...✍ #मायमराठी #मराठी #मराठीकविता #शेती #शेतकरी #गावाकडची_रानफुलं #कष्ट

VishakhaBorkar

लढत होतो जीवनाशी जेव्हा गरिबीत उपाशी जगत होतो
काम मिळेना पोटाले तेव्हा माणसातल्या माणूस शोधत होतो
लेकर रडत होते लहान भूक त्यांची लयं मोठी
दोन घासाच्या भाकरीसाठी वावरात राबराब राबत होतो

जीव सोकुन जाई सारा अनवाणी नांगर हाकत होतो
रगत गाळूनी घामाचे उन डोईवर झेलत होती
सपान डोयात उद्याच्या चांगल्या दिसाच
याच सुखाच्या सपनात मी रमून जात होतो

दिस भराभर निघून उपाशीच घालवत होतो
कर्जाचा सावकार रोज उंबरठ्यावर पायत होतो
आज देतो उद्या देतो पैसा देऊ तरी कुठून 
आजचा दिवस फक्त उद्यावर टाकत होतो

जगाच्या नजरीतला काय त मग मी पोशिंदाच होतो
मायाच लेकरासाठी मी जवारी उधार मागत होतो
पैश्यापायी मले कोणी दे ना जवरी
आसवे पुसत मी माणसातला माणूस शोधत होतो #शेतकरी

कवी - के. गणेश

शेतकरी...

read more
mute video

Sachin Zanje

शेतकरी....

read more
विषय - व्यथा शेतकऱ्यांची.

पैसा मिळवण्याचे
सर्व साधन आता थांबले.
जगण्याचे महत्व किती आहे 
हे प्रत्येकाने जाणले.

हौस मज्जेच्या जगण्याचे
सुत्रे गेलीत बदलून.
जगण्यासाठी काय लागते 
हे प्रत्त्येकास आले कळून.

नाही प्रतिष्ठा मोठी आमची
तरी दिन रात्र आम्ही राबतो.
पिकाचा अन त्या भुकेलेल्याचा विचार मनी 
म्हणून समाजाशी आम्ही जास्त नाही लढतो.

नाही करत वाढावे वेतन
असा आम्ही प्रचार.
भाजीपाल्याचा  वाढला दर आमच्या 
 तर समाज चार पैशाला होतो तेव्हा लाचार.

खते,पिक,इत्यादी आर्थिक किंमतीचे
दर असतात तुमच्याच हातात.
त्यावेळी सुचत नाही का ? 
किंवा येत नाही ? हा विचार तुमच्या मनात.

निसर्गाशी लढतो आम्ही
आणि परिस्थितीशी करतो दोन्ही हात.
सांगत नाही कधी कुणाला
आर्थिकतेवर आम्ही कशी करतो तेव्हा मात.

काळया मातीची लेकरं आम्ही
म्हणून जग म्हणत आम्हाला भुमीपुत्र.
अन्नदाता आहे तो सर्वांचा 
समजु नका त्याला एकतीळमात्र.

कवी - कु सचिन सदाशिव झंजे.
          कोल्हापूर.. शेतकरी....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile