Nojoto: Largest Storytelling Platform

New वलय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वलय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वलय.

Related Stories

    PopularLatestVideo

राजाराम कंटे

जुनी स नवं वलय

read more
माझ्यापासून असं दूर- दूर राहणं तुला भारी जमतं
मग मी ही समजवतो माझ्या मनाला.....
पण मन माझं वेडच ते-------
ते तुझ्याशिवाय तरी कुठे रमतं ?
राजाराम कंटे जुनी स
नवं वलय

राजाराम कंटे

जुनी सय नवं वलय

read more
बहरुनी आला मनी वसंत
 फुटे चैत्राची पालवी
 साद घालीते वनी प्रियाला
 कोकिळा मी हळवी

नवं प्रेमाचे बीज अंकुरले 
नवा हर्ष हा मनी
ध्यास नवा हा, गंध नवा हा
 सुर नवे जीवनी

वैशाख सरला 
हर्ष हा भरला 
मेघ दाटले अंबरी 
आतुरली मनी वसुंधरा ती
 बरसूनी घेण्या उरी

इंद्रधनूची कमान पसरे  
फुले बहरली वनी 
स्वागत करण्या मज प्रियाचे 
हर्ष वाटे हा मनी

बरसूनी घे आता हवे तेवढे
प्रसन्न होऊदे जीवनी
आभाळ भरले मेघ पांघरले
तृप्त झाली अवनी
                       @राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय

राजाराम कंटे

जुनी सय नवं वलय

read more
चिंब भिजावे           
झिम्माड पावसात   
       तुझ्याच सवे          

तुला पहावे
लाजुनी चूर व्हावे
रंगुनी जावे

तुज सांगावे
गूज माझ्या मनाचे
तू शहरावे

बेधुंद व्हावे
तुझ्या आठवणीत 
तुला स्मरावे
                  @ राजाराम कंटे

©राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय

राजाराम कंटे

जुनी सय नवं वलय

read more
आज तुझ्याकडे पाहिल्यावर वाटतं
तुझ्या आयुष्यात वैशाख वणवा येईल
तसं असेल तर सांग.....
तुझ्या आयुष्यातील वसंत पाहण्यासाठी
मी कायम श्रावणसरी बरसून राहील
                @राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय

राजाराम कंटे

जुनी सय नवं वलय

read more
तुझी वाट पाहून 
दिवस काय तो पुरता सरला
माझ्या शिणलेल्या डोळ्यांना
फक्त तुझाच सहवास उरला
@राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय

राजाराम कंटे

जुनी सय नवं वलय #मराठीकविता

read more
ये सखये परत फिरुनी तू
कलत्या सांजवेळी
वाट पाहती तुझी बहरण्या
त्या अबोल पुष्पवेली.......

                  ठिबक चांदणे ओठावर
                  अनं गालावरती  खळी
                    पहाटेच्या दवातं न्हाली जणू
                   तू प्राजक्त पाकळी..........

   प्राजक्ताच्या देठा परी ओठ तुझे 
ते टेकविशी मम भाळी
तूझ्या चांदण्याच्या हाती घे भरुनी
माझ्या काळजातली शहाळी.........

                 शुक्राची चांदणी परी तू
              स्वप्नांच्या आभाळी
                     रात्रीच्या एकांती बहरलेली
                    तू धुंद अबोल प्रितकळी....
                                                  -राजाराम कंटे

©राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile