Nojoto: Largest Storytelling Platform

New पाखरं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाखरं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाखरं.

Related Stories

    PopularLatestVideo

Kailas Tidke

ओसाड माळरानावरचा निष्पर्ण वृक्ष कानात कुजबुजला त्याचे अश्रू वेचतांना../
"मन मोकळं करावं जेव्हा पाखर मुक्कामी असतात..
कारण परतीचा प्रवास नसतो काही पाखरांना.."//
®कवी कैलास #पाखरं

SK

पाखरं

read more
निर्भीडपणे वावरणारी,
जणू या जगाची ठाकरं..
खिडकीत मला दिसलेली,
ती पावसातली पाखरं..!!

पावसात चिंब भिजणारी,
पंखाने ती धडपडणारी..
मधुर कल्लोळ करणारी,
ती पावसातली पाखरं..!!

थोडीशी ती शहारलेली,
खिडकीमध्ये बहरलेली..
आडोशाला बिथरलेली,
ती पावसातली पाखरं..!!

जाण्यासाठी आवरलेली,
दाण्यासाठी सावरलेली..
पिल्लांस भेटण्या आतुरलेली,
ती पावसातली पाखरं..!!

अचानक पाऊस थांबला,
मग यांची उडण्याची नखरं...
नुकतीच खिडकीत मी पाहिली,
ती पावसातली पाखरं...!!!
✍🏻💖 पाखरं

Vilas Bhoir

हरवलेली पाखरं

read more
इवलासा चिमुकला जीव
त्यात माझा काय गुन्हा 
पाहायची होती सृष्टी सारी 
मानव जन्म देशील का? पुन्हा

अग्नितांडव कुठून आला 
ते काही मला माहित नाही 
पण माझ्या रडण्याणे 
कुणीच कसं जाग झालं नाही

नाव तर अतिदक्षता कक्ष
मग तिथे का नव्हता रक्षक
असतं तिथे कुणीतरी तर
अग्निचे नसतो आम्ही भक्षक

जन्मदात्री आई माझी
आज प्रश्न तरी कुठे मांडेल
कुणास ठाऊक पुन्हा तिला 
माझ्यासारखं बाळ मिळेल

हे देवा निष्पाप लेकरू मी
माझ्या माईला न्याय दे
डोळ्यात अनंदाश्रु म्हणून 
मानव रूपी पुन्हा जन्म दे

                    ~ कवी :  विलास भोईर
                     ( मानव जन्म देशील का? पुन्हा )

©Vilas Bhoir हरवलेली पाखरं

Sambhaji Gejage

आता पाखरंही माझ्या #मराठीकविता

read more
mute video

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ही पाखरं वेडी.... #हीवेडी हा विषय Mukesh Alone यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ही पाखरं वेडी जिद्दीने पेटून उठलेली 
मनाला गोड कोड्यात टाकून जातात 
ना शब्द बोलता काहीच ते,
किलबिलाटाने सारं आयुष्य नांदतात ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ही पाखरं वेडी....
#हीवेडी
हा विषय
Mukesh Alone यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Ramesh Patil

कधी कधी जोंधळ्याच्या शेतातील वेङ्या पाखरांकडे बघतांना आयुष्याचा भास होतो..." बहुतांशी पाखरं अपयशाच्या बुजगावण्यांना घाबरून संधीच्या शेतात उत

read more
 कधी कधी जोंधळ्याच्या शेतातील वेङ्या पाखरांकडे बघतांना आयुष्याचा भास होतो..."
बहुतांशी पाखरं अपयशाच्या बुजगावण्यांना घाबरून संधीच्या शेतात उत

Vrishali G

पाखरू...

read more
mute video

Atul Shingade

पाखरू....... #nojotophoto

read more
 पाखरू.......

कवी - के. गणेश

मन पाखरू

read more
कधी कधी वाटतं
पाखरासारखं राहावं,
माळरान फिरून सारं
पानाफुलांना पहावं.! मन पाखरू

कवी - के. गणेश

मनाचं पाखरू

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile