Find the Latest Status about बंधुभाव नित्य वसु दे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बंधुभाव नित्य वसु दे.
Dileep Bhope
उठवू नकोच आता कुणाला शक्तीमान अंधारात लोपले अनंत सारे शोधीत येण्याआधी उद्या कोणी उगवेल नित्य तो, पुन्हा सुटेल पहाट वारे ©Dileep Bhope #नित्य
Vasundhara Jadhav
माणसाचं मन विशाल सागरासारखं असते. त्याचं त्याचं साचणं असतं, त्याचं त्याचं घुटमळणं असतं, त्याची त्याची वादळं असतात, त्याची त्याची भरती-ओहोटी असते, त्याचा त्याचा विस्तार असतो, त्याची त्याची खोली असते. त्याच्याही खोलवर अंधार असतो, त्याचं भरकटणं असतं तर त्याचा किनारा असतो. त्याची त्याची निळाईही असते, त्याच चमकणंही असतं, त्याचं सामावून घेणंही असतं, त्याच दूर लोटणंही असतं, त्याचे त्याचे शंख, शिंपले आणि मोतीसुद्धा असतात. वसुंधरा जाधव ©Vasundhara Jadhav #वसु# मी समुद्र
Vasundhara Jadhav
तुझ्या मोकळ्या केसांचं गच्च आभाळ दाटलं काठ काजळी गहिरे त्यात तुफान उठलं श्वास थांबती मंदसा झुले मनाचा हिंदोळा वारा खट्याळ धुंदसा घन मनाचा सावळा चाल सावळ्या मनाची फेर धरती भोवती लडीवाळ बट तुझी अशी अधीर सोबती मुग्ध रेशीमस्पर्श रोमरोमात फुलती आडखळणारे ओठ श्वास निशब्द गुंफती शब्द मौनाचे लाजरे रान पिसाट गाठलं तुझ्यामाझ्यातल्या वेळी दुर चांदणं सांडलं वसु ©Vasundhara Jadhav # दूर चांदण सांडलं#वसु#
Shankar Kamble
*एकमेकां करां साह्य* *बंधुभाव वाढवावा* *भेद विसरून सारे* *गुंता, भ्रम सोडवावा* *विस्तारले आज पात्र* *हव्यासाच्या सरितेचे* *कोण घालणार बांध?* *पूर लोटले विषाचे* *सत्य, शाश्वत अमर* *लख्ख प्रकाशा सारखे* *नको संग अंधाराचा* *होय स्वतःस पारखे* *घाव सोसता घणाचे* *देवपण ये पाषाणा* *उपकारा झिजवावा* *देह धनी तो शहाणा* *दोर तुटता श्र्वासाचा* *खेळ सारा हा संपला* *आखलेल्या परिघाचा* *व्यास क्षणांत लोपला* *मृगजळ हे फसवे* *सार जगण्याचे सोपे* *जग उजळण्या रवी* *संथ निरंतर तापे* ©Shankar Kamble #Flower #मैत्री #जग #माणुसकी #वागणं #प्रेम #बंधुभाव #भाईचारा #देश