Nojoto: Largest Storytelling Platform

New अंगणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अंगणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंगणी.

Related Stories

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

अंगणी बरसल्या श्रावणसरी #citysunset

read more
नवी पालवी बहर नवा
श्रावणात वाहे बेधुंद हवा
सुन्या प्रहरी गार गारवा 
ऋतू नेसला शालू हिरवा 

वनात फुलले फुल फुलोरे
नटुन बसले रान गोजिरे 
क्षणांत हसरे लाजरे बुजरे
धरतीच्या कुशीत हिरवळ पसरे

हर्ष मानसी खेळ मांडला 
श्रावणात घन दिसे निळा 
सप्तरंगात रंगुनी रंग उधळला
रंगीबेरंगी इंद्रधनु नभी झळकला 

ऊन कोवळे मिरवीत पंखांवरती
पाखरांचे थवे आकाशी फिरती 
कुजबुज ऐकूनी गोड गोड ती
मंजुळ स्वर कानात गुंजती

झिलमिल झिलमिल सरसर सरी
श्रावणात डोलते विश्व अंबरी 
तुळस हसली लाजली मंजिरी
अंगणी माझ्या बरसल्या श्रावणसरी
      
                          ( अंगणी बरसल्या श्रावणसरी )
                        ~ विलास भोईर अंगणी बरसल्या श्रावणसरी 

#citysunset

Vilas Bhoir

माझिया अंगणी सुखाचा मोहर....... #poem

read more
मायेच्या मातीत रुजलेलं घर
आभाळाची छाया घालते पांघर 
तुळशीचे रोप शोभते सुंदर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

जाई जुईसवे मोगऱ्याची वेल
सुगंधी फुलांनी भरावी ओंजळ
उधळूणी गंध जाय नभपार
माझिया अंगणी सुखाचा मोहर

सांजवेळी रोज लागतसे दिप 
सदनाचे माझ्या मोहक हे रूप 
अनमोल सौख्य नांदते अपार 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नवख्या नात्यांची प्रीत उंबऱ्यात
जपलेली आहे संस्कारांची ज्योत 
पाहुनिया वाटे नवासा प्रहर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नजरेत सारे ओळखीचे झाले 
मनातले शब्द ओठांवर आले 
अंगावर येते वाऱ्याची फुंकर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

                     कवी - विलास भोईर 
                    ( माझिया अंगणी सुखाचा मोहर )

©Vilas Bhoir माझिया अंगणी सुखाचा मोहर.......

बी.सोनवणे

उपक्रम विषय :- दरवळली फुले अंगणी वसंत ऋतूची ती पालवी माेहरुन अशी गंधाळली, दरवळली फुले अंगणी अबोल्यात प्रीती बहरली ।।

read more
दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।। 

वेचूनी ठेवलयं सुख परडीत 
हिरव्या रानोमाळ शिवारात, 
त्या नयनी दाटलेल्या स्वप्नांचे 
योग्य भाव लाभू दे बाजारात।। 

आस ह्या मनात आहे कित्येक
वाटते फक्त कष्टाचं व्हावे ते चीज, 
वाटचाल रे ह्याच जीवनाची अशी 
अन् नियतनी सांगितले झीज।। 

आभाळभर सुखाच पांघरूण
नि कस्तुरीचा जणू गंध चंदनी,
ओंजळीत पसा पसा दाण्यांनी
सौख्यं दरवळली फुले अंगणी।। 

बी. सोनवणे 
        मुंबई

©बी.सोनवणे उपक्रम 
विषय :- दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।।

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लस आली अंगणी... #लस हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लस आली अंगणी 
जणू जीवन संजिवनी
जरी भीती गेली पळुनी
तरी लस घ्यावी टोचूनी
कोरोनाला दूर सरुणी
स्वतःचे रक्षण करुनी
सुजाण नागरिक बनूनी
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लस आली अंगणी...
#लस

हा विषय
Himani Bagore  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे कधी खेळेल अंगणी... #कधीखेळेलअंगणी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य # #YourQuoteAndMine

read more
सरला हा काळ बागडायचो अंगणी भटकंती ओढ्या नाल्यांची.....
‌‌‌  सारा घोळका कसा अंगणी बिलगुणी असायचा.....
सांगड त्या वेळची काही औरच असायची.....
‌‌  गलका सारा गल्ली बोळांत रंगायचा भांडण मोठ प्रेमाने मिटायचे.....
 भेदभाव नाही कोणाच्या मनी खाऊ एकत्र त्या मायेचा....
    एक झाड धरलेल सारा गाव निजायचा गलका आमचा नी पक्ष्यांचा वावर असायचा......
सावलीत त्या गर्द दाटिवाटिचा सारा पसारा....
   आंबा ,चिंच, करवंद फळांचा पुर यायचा...
 तुटवडा आता बाजारात मोठा किमतींत फरक मोठा.....
       सारा गाव आनंदात वावरायचा.......
अंगणात माझ्या सारी गर्दी जमायची.......
     रंगलेला खेळ ना कधी मोडायचा......
अंगणात डाव माझ्या रमायचा......
   ‌‌गलका सारा खुप ऐकायला यायचा, गाव सारा आनंदाने जगायचा......
    बोल ते लहानग्यांचे बोबड्या बोलके.......
             नटलेली अंगणी स्वप्न वेडे.... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कधी खेळेल अंगणी...
#कधीखेळेलअंगणी
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे सुखाचे चांदणे... #सुखाचेचांदणे चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
सुखाचे चांदणे दिसावे माझ्या अंगणी
लखाखी त्याची राहावी सदैव माझ्या जीवनी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सुखाचे चांदणे...

#सुखाचेचांदणे

चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile