Find the Latest Status about indian village from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, indian village.
Mananjay Yadav
Jaymala Bharkade
असच हे सूनसान गाव दुपारच्या पारी गावात मारली चक्कर गल्ली त होती कुत्रे भटकत भणभन सारे माणसे कुठं नव्हती गावाचं नक्षा सारा सूनसान भासे पारा वरती ही माणसे होती मोजकी राहवलेच नाही मला ही हुरहूर माणसे गेली कुठं विचारले की राव गाव असं सूनसान का ? एवढ्यात म्हणे एक पोटापाण्याचा प्रश्न हाय गावात राहून करतील तरी काय बोट बोट ओळीचे वावर आपले त्यातही कधी पिकत तर कधी चिबडते मजुरांची संख्या बी अफाट गावात गावात बी धंदा पाणी काय नाय गेले कुणी कापसले कुणी ऊसाच्या फड्यावरती म्हणून लागे सूनसान हे गाव गावाचं बी काया दिसेंनदिस काय बरी नाय कुठच विकास न कुठच काय कुठ बी लोक झोपड्या मांडून आपला संसार च चादर शिवत हाय सूनसान गाव इथ नीट नेटवर्क पण नाय शिक्षणा साठी इथ मास्तर बी नाय कसेबसे चालते इथ प्राथमिक शिक्षण असच सार याचं कसं होइल काय माहित नाय ©Jaymala Bharkade # असच हे सूनसान गाव....true reality of Indian villages....think about it...?